अमरावतीत पक्ष विरोधी काम करणाऱ्या भाजपा पदाधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता... भाजपमधून 15 पदाधिकाऱ्यांना सहा वर्षासाठी निलंबन.. पक्षविरोधी कारवाई केल्याने भाजपचे निवडणूक प्रभारी संजय कुठे यांनी निलंबनाची केली कारवाई
सेल्फीचा मोह न आवरलेल्या कार्यकर्त्याची इच्छा केली पूर्ण..सेल्फी काढतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल...
कंटेनर आणि ट्रॅक्टर पुलावरून खाली कोसळला ....
नदीपात्रालगत ट्रॅक्टर आणि कंटेनर कोसळला ....
प्राथमिक माहितीनुसार दोन ते तीन लोक मृत्युमुखी तर ट्रॅक्टर आणि कंटेनर खाली जखमींचा शोध सुरू....
पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या आहिल्या पुलावर घडली घटना ....
ट्रॅक्टर आणि कंटेनर पुलावर एकत्र आल्याने अंदाज न येता पुलाखाली पडले.....
ट्रॅक्टर मध्ये 15 ते 20 मजूर असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.....
अतिउत्साही पर्यटकांचा उत्साह आला अंगलट. पालघरच्या चिंचणी येथील समुद्रात पर्यटकांची गाडी अडकली . नवी मुंबईतून चिंचणी समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेल्या तीन पर्यटकांची गाडी समुद्राच्या भरतीच्या पाण्यात अडकली. समुद्राला भरती आल्याने नवी मुंबईतून आलेल्या पर्यटकांची ईरटीका गाडी समुद्राच्या पाण्यात अडकली. स्थानिकांच्या मदतीने पोलीस प्रशासनाला गाडी बाहेर काढण्यात यश .
पिंपरी चिंचवडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या रोड शो दरम्यान आग
भोसरी-दिगी परिसरात फडणवीसांच्या रोड शोवेळी आगीची घटना
फटाक्यांमुळे इमारतीला आग लागल्याचा अंदाज
आग लागल्यामुळे रोड शोमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांमध्ये गोंधळ
व्हायब्रंट गुजरात प्रादेशिक परिषदेमुळे पश्चिम गुजरातमध्ये गुंतवणूक आणि औद्योगिक विकासाला नवी गती मिळेल
व्हायब्रंट गुजरातच्या यशस्वी मॉडेलची व्याप्ती आणि प्रभाव आणखी वाढवण्यासाठी संपूर्ण गुजरातमध्ये चार व्हायब्रंट गुजरात प्रादेशिक परिषदा आयोजित केल्या जात आहेत
व्हायब्रंट गुजरात प्रादेशिक परिषद 11 ते 12 जानेवारी 2026 पर्यंत आयोजित
जपान, दक्षिण कोरिया, रवांडा आणि युक्रेनचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होत आहेत.
या परिषदेत सिरॅमिक्स, अभियांत्रिकी, बंदरे आणि लॉजिस्टिक्स, हरित ऊर्जा, पर्यटन यासह इतर प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाईल
भोसरी विधान सभा मतदान संघातील मोशी परिसरात अजित पवारांची जाहीर सभा......
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत अजित पवार विरुद्ध भाजप आमदार महेश लांडगे यांच्यात रंगलाय शाब्दिक आरोप प्रत्यारोप असा सामना.....
आता त्याच आमदार महेश लांडगे यांच्या मतदार संघात अजित पवारांची जाहीर सभा....
महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारातील शेवटचा रविवार अर्थातच सुपर संडे सर्वच राजकीय पक्षांनी सार्थकी लावत प्रचार फेरी,रॅली, डोअर टू डोअर प्रचार करून सत्कारणी लावला.भिवंडीत प्रथमच भाजपा निवडणूक लढवित असलेल्या प्रभाग क्रमांक एक व सहा येथील निवडणूक पक्षाने प्रतिष्ठेची केली आहे.प्रभाग क्रमांक सहा या जुन्या भिवंडी शहरात भाजपाने मीना कुंटे,अँड वैभव भोईर,
दक्षाबेन पटेल,विशाल डुंबरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून माजी महापौर जावेद दळवी यांच्या भिवंडी विकास आघाडी समोर आव्हान उभे केले आहे .रविवारी त्यांच्या प्रचारासाठी आयोजित प्रचार रॅलीत माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील सहभागी झाले होते.ब्राह्मण आळी,कासार आळी बाजारपेठ,
टिळक चौक,वाणी आळी या मुख्य शहराच्या परिसरात आयोजित या प्रचार रॅलीला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद ठिकठिकाणी मिळत होता.
सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने व सामाजिक कार्यकर्त्या रीना संदीप इंगळे यांच्या पुढाकाराने शालेय विद्यार्थिनींसाठी कराटे व लाठीकाठी या पारंपरिक स्वसंरक्षण कलेचे प्रशिक्षण शिबिराचे आयोजिन करण्यात आले होते. विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, शारीरिक तंदुरुस्ती तसेच आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे संरक्षण करण्याची क्षमता विकसित व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या शिबिरात मोठ्या संख्येने विद्यार्थिनी सहभागी झाल्या आहे.
रोड रोलर च्या चाकाखाली येऊन रस्ता बनवणाऱ्या सुपरवायझर चा मृत्यू झाला आहे, या अपघाताची धक्कादायक दृश्य सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये कैद झाली आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी रेल्वे स्टेशन ते गंगानगर रोड या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असताना ही धक्कादायक घटना काल दुपारी चार वाजता घडली आहे. या प्रकरणात निगडी पोलीस स्टेशनमध्ये रोड रोलरच्या चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई- 6 प्रभागांमध्ये ठाकरेसेना, मनसे उमेदवारांबाबत संभ्रम
काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून अपक्ष लढण्याची तयारी
उमेदवारांबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न
अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचं केलं आवाहन
- नाशिकच्या गोदा घाटावर सभेचे आयोजन
- ठाकरे बंधूंनी नाशिकमध्ये केलेल्या टीकेवर देवेंद्र फडणवीस काय उत्तर देतात याकडे लक्ष
- याच बरोबर आगामी सिंहस्थ कुंभमेळा, तपोवनातील प्रस्तावित वृक्ष तोड यावर देखील भाष्य करण्याची शक्यता
५ हजार रुपयांवरून ५० हजार रुपये करणार
महायुतीच्या जाहीरनाम्यात महत्त्वाचे आश्वासन
लाखो मुंबईकरांना होणार मदत
मुख्यमंत्री सहाय्यता निधी प्रमाणे मुंबईत महापौर निधीची होते मदत
नवी मुंबईमध्ये सध्या राजकीय वातावरण तापले असून , आरोप प्रत्यारोप सुरू आहेतझ त्यातच महायुतीतील घटक पक्ष भाजप व शिंदे गटातील अंतर्गत वाद देखील चव्हाट्यावर आले आहेत. आता हारामाचा पैसा वाटायला सुरुवात होईल अस वक्तव्य वन मंत्री गणेश नाईक यांनी केल होत.. त्यानंतर शिंदे गट चांगलाच आक्रमक झाल.. तर नवी मुंबईत हारामाचा पैसा नेमक कोण वाटत आहे हे जनतेला नाहीत आहे, अस म्हणत शिंदे गटाने देखील प्रत्युत्तर दिले आहे..
कल्याम क्राइम ब्रांचची मोठी कारवाई.. गावठी दारुच्या हातभट्ट्या पोलिसांकडून नष्ट.. याप्रकरणी दोघांना अटक तर चार आरोपींचा शोध सुरु..
काल श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री पंकजा मुंडे आमदार धनंजय मुंडे आमदार सुरेश धस या सर्वांनी गहिनीनाथ गडावर हजेरी लावली होती अनेक कार्यकर्त्यांनी या नेत्यांबरोबर सेल्फी देखील काढल्या मात्र सोशल मीडियावर एक व्हिडिओ जो व्हायरल होत आहे
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका करत त्यांना थेट विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याचे आव्हान दिले आहे. मुंबईत संभ्रम निर्माण करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सातत्याने वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबईकर जनतेला भावनिक मुद्द्यांवर दिशाभूल करता येणार नाही, जनता विकासालाच मत देईल आणि आगामी निवडणुकांमध्ये महायुतीच विजयी होईल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.
मुंबई महानगरपालिकेसाठी महायुतीचा बहुप्रतीक्षित जाहीरनामा (वचननामा) आज रविवारी, 11 जानेवारी रोजी अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले, मुंबई भाजपाध्यक्ष अमित साटम यांच्यासह महायुतीतील विविध घटक पक्षांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा वचननामा जाहीर करण्यात आला. प्रचाराच्या तोफा थंडावत असतानाच महायुतीने मुंबईकरांसाठी विकास, पुनर्विकास आणि मराठी माणसाच्या हक्कांवर आधारित आश्वासनांची मोठी यादी सादर केली आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका करत त्यांना थेट विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याचे आव्हान दिले आहे. मुंबईत संभ्रम निर्माण करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सातत्याने वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबईकर जनतेला भावनिक मुद्द्यांवर दिशाभूल करता येणार नाही, जनता विकासालाच मत देईल आणि आगामी निवडणुकांमध्ये महायुतीच विजयी होईल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.
मुंबई महापालिका निवडणूक जवळ येत असताना राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट खुले आव्हान दिले असून, निवडणूक धर्माच्या आधारावर न लढता दाखवा, असे त्यांनी म्हटले आहे. याआधी उद्धव ठाकरे यांनी भाजपला “विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवा” असे म्हणत बक्षीस जाहीर केले होते. त्यात आता संजय राऊत यांनी स्वतःची रक्कम जोडत हे आव्हान थेट ११ लाख रुपयांपर्यंत नेले आहे. धर्म, जात किंवा देश-विदेशाचे मुद्दे बाजूला ठेवून निवडणूक जिंकून दाखवा, असे त्यांचे म्हणणे आहे.
लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे एकाच वेळी देण्याचा विचार असल्याची चर्चा होती. मकर संक्रांतीच्या निमित्ताने 14 जानेवारीला रक्कम जमा होईल असे संकेत होते. मात्र 15 जानेवारीला महापालिका निवडणुकीचे मतदान असल्याने सध्या आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे अशा निर्णयामुळे मतदारांवर परिणाम होऊ शकतो, असा आक्षेप काँग्रेसने घेतला आहे. निवडणूक झाल्यानंतरच निधी द्यावा, अशी मागणी करत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे पत्र दिले आहे.
मुंबईतील अंधेरी पश्चिम विधानसभेतील प्रभाग क्रमांक ६७ मध्ये गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी अखेर दूर झाल्याचे चित्र दिसून आले. या नाराजीबाबत मनसे उमेदवार कुशल धुरी यांनी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत आज शिवसेना खासदार संजय राऊत हे कुशल धुरी यांच्या निवडणूक प्रचाराच्या उद्घाटनासाठी डी. एन. नगर येथे प्रत्यक्ष उपस्थित राहिले.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय प्रचाराला वेग आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. नाशिकमधील ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या गंगा घाटावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा दुपारी ४ वाजता होणार असून, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. नाशिक ही उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाची राजकीय आणि सांस्कृतिक केंद्र मानली जाते. त्यामुळे येथे होणारी मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे, तर राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून प्रचाराचा सूर अधिक आक्रमक होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील ही सभा भाजपच्या रणनीतीचा एक महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा एकदा मोठी घडामोड घडणार असून, ठाकरेंच्या शिवसेनेतील ज्येष्ठ आणि नाराज नेते दगडू दादा सकपाळ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटातील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हा पक्षप्रवेश आज सकाळी १० वाजता मुंबईतील नंदनवन येथे पार पडणार असून, दगडू दादा सकपाळ यांच्यासोबत शेकडो कार्यकर्तेही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
सध्या थंडीची लाट उत्तर भारतासह देशातील अनेक भागांमध्ये कायम आहे. राजधानी दिल्लीत या हिवाळ्यातील आतापर्यंतची सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून, काश्मीर खोऱ्यात काही ठिकाणी पारा शून्याच्या खाली गेलाय. त्यामुळे नागरिक कडाक्याचा गारठा अनुभवत आहेत. तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामानात मोठे बदल होणार आहेत. महाराष्ट्रावर नेमका कसा परिणाम होणार, पाहूया हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार रविवार, 11 जानेवारी 2026 रोजी राज्यातील वातावरणात बदल होणार आहे. अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरातील हवामान घडामोडींचा प्रभाव महाराष्ट्रावर जाणवत असून, विविध भागांमध्ये हवामानात चढउतार जाणवू शकतो.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना आणि रिपब्लिकन पक्ष (रिपाइं) यांचा संयुक्त जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार आहे. मुंबईतील आगामी पालिका निवडणुकीसाठी महायुतीकडून सादर होणारा हा वचननामा आज दुपारी १२ वाजता अधिकृतपणे जाहीर केला जाणार असून, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
या जाहीरनाम्यातून मुंबईकरांसाठी विकासाचा आराखडा, नागरी सुविधांचे आश्वासन, पायाभूत सुविधांवर भर आणि भविष्यातील मुंबईचे व्हिजन मांडले जाण्याची शक्यता आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने येथील पालिका निवडणूक केवळ स्थानिक राजकारणापुरती मर्यादित राहत नाही, तर राज्य आणि देशपातळीवर तिचे महत्त्व मोठे असते. त्यामुळे महायुतीचा हा वचननामा आगामी निवडणुकीच्या दृष्टीने निर्णायक ठरू शकतो.
राज्यात सुरू असलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेच्या अंमलबजावणीदरम्यान मोठ्या प्रमाणात गैरप्रकार उघडकीस आले आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंग केल्याच्या तब्बल १८६ तक्रारी दाखल झाल्या असून, या कालावधीत ८ कोटी ३२ लाख रुपयांची रोकड विविध ठिकाणांहून जप्त करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेशी संबंधित ३८ गुन्हे देखील दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. गृह विभागाकडून आचारसंहितेच्या कालावधीत राबवण्यात आलेल्या कारवायांचा सविस्तर अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला आहे. या अहवालात रोख रक्कम, दारू, अमली पदार्थ आणि अवैध शस्त्रसाठा यांच्यावर करण्यात आलेल्या कारवायांचा तपशील देण्यात आला आहे. निवडणूक काळात कोणत्याही प्रकारचे प्रलोभन, दहशत किंवा गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलल्याचे स्पष्ट झाले आहे.
सध्या थंडीची लाट उत्तर भारतासह देशातील अनेक भागांमध्ये कायम आहे. राजधानी दिल्लीत या हिवाळ्यातील आतापर्यंतची सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून, काश्मीर खोऱ्यात काही ठिकाणी पारा शून्याच्या खाली गेलाय. त्यामुळे नागरिक कडाक्याचा गारठा अनुभवत आहेत. तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामानात मोठे बदल होणार आहेत. महाराष्ट्रावर नेमका कसा परिणाम होणार, पाहूया हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार रविवार, 11 जानेवारी 2026 रोजी राज्यातील वातावरणात बदल होणार आहे. अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरातील हवामान घडामोडींचा प्रभाव महाराष्ट्रावर जाणवत असून, विविध भागांमध्ये हवामानात चढउतार जाणवू शकतो.
राज्यातील राजकारण तापले असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कोथरूड मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन करत राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत दिले आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघात अजित पवार यांनी केलेल्या तुफान रोड शोमुळे पुण्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
काल रात्री उशिरा अजित पवार यांनी कोथरूड आणि बावधन परिसरातून रोड शो काढत आपल्या उमेदवारासाठी प्रचार केला. रस्त्याच्या दुतर्फा जमलेली गर्दी, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जोरदार घोषणाबाजीमुळे संपूर्ण परिसर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रंगात रंगलेला दिसत होता. अजित पवारांचा हा रोड शो केवळ प्रचारापुरता मर्यादित न राहता, भाजपला थेट आव्हान देणारा राजकीय संदेश मानला जात आहे.
मुंबई ही केवळ महाराष्ट्राचीच नव्हे, तर संपूर्ण देशाची आर्थिक नाडी मानली जाते. कोट्यवधी लोकांची स्वप्नं आपल्या कुशीत सामावून घेणाऱ्या या महानगराला ‘धावणारी मुंबई’ अशी ओळख आहे. साहजिकच, या शहरावर आपली राजकीय पकड असावी, अशी अपेक्षा सर्वच राजकीय पक्षांची असते. त्यामुळेच मुंबई महानगरपालिका निवडणूक नेहमीच वेगळ्या महत्त्वाची ठरते. मात्र, यंदाची निवडणूक अधिकच लक्षवेधी ठरत असून तिच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुंबईत मोठ्या घडामोडी घडल्या. विशेषतः पायाभूत सुविधांच्या बाबतीत मुंबईत मोठे बदल झाले असल्याचे चित्र दिसून येते. २०१४ ते २०१९ या कालावधीत मुंबई मेट्रोचे जाळे, कोस्टल रोडची आखणी आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (अटल सेतू) यांची पायाभरणी झाली. या विकासाला ‘रॉकेट गती’ असे संबोधले गेले.
महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. नाशिकमध्ये ठाकरे बंधूंची पहिली सभा पार पडली. आता आज छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर ठाकरे बंधूंची सभा होणार आहे. आज ठाकरे बंधूंची मुंबईतील पहिली राजकीय सभा छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर होणार असून पालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. रविवारी संध्याकाळी 7 वाजता ही सभा होणार असून या सभेतून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कोणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्त्वाचे असणार आहे.