Lokshahi Marathi live  
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Update live : वानखेडे स्टेडियमवर मेस्सीचं जंगी स्वागत, मेस्सीच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवाचा शुभारंभ

Marathi Live Headlines Updates: आज सोमवार, दिनांक 14 डिसेंबर 2025, हिवाळी अधिवेशन, राज्यातील थंडी , महापालिका निवडणुका अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..

Varsha Bhasmare

अमृता फडणवीसांनी घेतला मेस्सीसोबत सेल्फी

वानखेडे स्टेडियमवर मेस्सीचं जंगी स्वागत

मेस्सीच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवाचा शुभारंभ.

लातूर जिल्ह्यातील वानवडा शिवारात चारचाकीला भीषण आग

लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील वानवडा शिवारात मध्यरात्री एक भीषण घटना घडली आहे...

स्कोडा कंपनीची चारचाकी गाडी अचानक पेट घेऊन पूर्णपणे जळून खाक झाली...

या आगीत गाडीतील चालकाचा होरपळून मृत्यू झाला आहे...

मृत चालकाचे वय अंदाजे ३५ वर्षे असल्याचे सांगितले जात असून, संपूर्ण शरीर जळाल्याने त्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे...

घटनेची माहिती मिळताच औसा पोलीस घटनास्थळी दाखल झाले...

महसुल विभागाचे कर्मचारी बावनकुळेंविरोधात आक्रमक

महसूल विभागातील सर्व संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात

बावनकुळेंनी केलेल्या कारवाईनंतर संताप

'राजकीय कुरघोडीमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लक्ष्य'

महसूल विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा दावा

पुण्यात ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची बैठक

-मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांचा चहापान कार्यक्रम आणि बैठक

-पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाच्या नेत्यांची एकत्रित बैठक

-दोन्ही पक्षाचे स्थानिक नेते आज एकत्रित येत करणार महानगरपालिका निवडणुकीची चर्चा

-पुण्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या पक्ष कार्यालयात बैठकीला सुरुवात

-आज पहिल्यांदाच पुण्यातील दोन्ही पक्षाचे नेते करणार निवडणुकीची चर्चा

ऑस्ट्रेलियाच्या सिडनीत बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार, 10 जणांचा मृत्यू

पोलिसांनी 2 संशियातांना ताब्यात घेतल्याची माहिती

ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध

भारतावरील 50 टक्के टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव

भारतावरील टॅरिफचा निर्णय रद्द करण्याचा प्रस्ताव

अमेरिकेच्या संसदेत काँग्रेस सदस्यांकडून प्रस्ताव सादर

नागपुरात शालार्थी शिक्षक संघर्ष समितीचं आंदोलन उग्र

लोटांगण घालणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी रोखलं

'वर्षभरापासून थांबलेला पगार सुरू करा'

आंदोलनकर्त्या शिक्षकांची मागणी

महाविकास आघाडीची उद्या पुण्यात महत्त्वाची बैठक

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक

पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये बैठक

महापालिका निवडणुका कशा पद्धतीने लढवायच्या यावर होणार चर्चा

नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून खासदार सुरेश म्हात्रे आक्रमक

डोंबिवलीतून जनजागृती रॅलीला सुरुवात

'लाखोंच्या संख्येत 22 डिसेंबरला पायी दिंडी मोर्चा काढणार'

मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार-सुरेश म्हात्रे

'नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव द्या'

खासदार सुरेश म्हात्रेंची मागणी

मुंबईत पहिल्यांदाच सनबर्न फेस्टिव्हलचं आयोजन....

मुंबईत पहिल्यांदाच सनबर्न म्युझिक फेस्टिव्हल आयोजित केला जात आहे. हा कार्यक्रम १९ ते २१ डिसेंबर दरम्यान होणार आहे. आशियातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक (EDM) कार्यक्रमांपैकी एक असलेल्या या कार्यक्रमावरून मुंबईत वाद सुरू आहे. विविध ठिकाणी निदर्शने होत आहेत. लोक सनबर्न फेस्टिव्हलला विरोध करत आहेत.

मुंबईच्या तिन्ही मार्गांवर जम्बो मेगाब्लॉक

मुंबईची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलच्या तिन्हीही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या मार्गांवर विविध तांत्रिक आणि अभियांत्रिकी कामांसाठी जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

नवी मुंबई विमानतळ 10 दिवसात होणार सुरू

नवी मुंबई विमानतळ 10 दिवसात होणार सुरू

मुंबईच्या तुलनेत नवी मुंबई विमानतळावरील तिकिटांच्या दरात मोठी तफावत

नवी मुंबई विमानतळाचे तिकिटांचे दर मुंबई विमानतळाच्या तुलनेत अधिक

दोन्ही विमानतळाच्या तिकिटाचा दर सारखाच असावा यासाठी प्रयत्न सुरू

हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस

आज सभागृहात अंतिम आठवडा प्रस्ताव सादर होऊन त्यावर चर्चा होणार आहे. याशिवाय काही शासकीय कामकाजही सभागृहाच्या अजेंड्यावर आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा