मुंबईच्या चेंबूर परिसरात आज मतदानादरम्यान मतदार यादीतील घोळ उघडकीस आला आहे. चेंबूर वॉर्ड क्रमांक १५२ मधील अनेक मतदारांची नावे यादीत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे चेंबूर नाका येथील चेंबूर हायस्कूलमधील मतदान केंद्रावर मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त करत गोंधळ घातला. मतदानासाठी आलेल्या नागरिकांना परत जावे लागल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासन आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला असून, यादीतील त्रुटी तपासण्याचे काम सुरू आहे.
नाशिकच्या देवळाली गावातील एका मतदान केंद्रावर आज मतदानादरम्यान गोंधळ निर्माण झाला. शासकीय कर्मचारी मतदानासाठी पैसे वाटप करत असल्याचा आरोप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या आरोपानंतर संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी संबंधित व्यक्तीला चोप दिल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच नाशिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. संबंधित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज शहरात मतदान प्रक्रिया सुरू आहे. सकाळी ९.३० वाजेपर्यंत केवळ ७ टक्के मतदान नोंदवण्यात आले आहे. सुरुवातीच्या तासांत मतदारांचा प्रतिसाद अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे दिसून येत आहे. काही मतदान केंद्रांवर मतदारांची तुरळक उपस्थिती पाहायला मिळाली. प्रशासनाच्या वतीने मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पुढील तासांत मतदानाचा टक्का वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत असून नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू आहे. सकाळी ९.३० वाजेपर्यंत शहरात केवळ ७.८७ टक्के मतदान नोंदवले गेले आहे. सुरुवातीच्या तासांत मतदानाचा वेग मंद असल्याचे चित्र दिसत आहे. काही मतदान केंद्रांवर मतदारांची तुरळक उपस्थिती पाहायला मिळत असून, पुढील तासांत मतदानाचा टक्का वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी अधिकाधिक संख्येने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
29 महानगरपालिकांमध्ये मतदान आज होणार आहे. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून असून संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी–चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली–मिरज–कुपवाड, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड–वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर, उल्हासनगर, कल्याण–डोंबिवली, भिवंडी–निजामपूर, मीरा–भाईंदर, वसई–विरार, पनवेल या 29 महानगरपालिकांमध्ये मतदान होणार आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मतदान प्रक्रिया सुरू असताना काही ठिकाणी गैरप्रकारांच्या तक्रारी समोर येत आहेत. अशाच एका तक्रारीची गंभीर दखल घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी थेट कारवाईसाठी पुढाकार घेतला आहे. भाजप उमेदवाराच्या एका बुथवर कथित ‘लिक्विड’ प्रकरणासंदर्भात मिळालेल्या माहितीच्या आधारे रूपाली चाकणकर यांनी पोलिसांसह त्या बुथला भेट देत संबंधितांना जाब विचारला.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली असली, तरी सुरुवातीच्या तासांत मतदानाचा उत्साह अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे चित्र समोर आले आहे. सकाळी ९.३० वाजेपर्यंत मुंबईत केवळ ६.९८ टक्के मतदान नोंदवले गेले असून, या कमी मतदान टक्केवारीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. सामान्यतः सकाळच्या सत्रात ज्येष्ठ नागरिक, महिला आणि नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडतो. मात्र यावेळी अनेक मतदान केंद्रांवर शांतता आणि मोजकीच गर्दी पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी मतदान केंद्रांवर कर्मचारी सज्ज असूनही मतदारांची संख्या अत्यल्प असल्याचे दिसून आले. प्रशासनाकडून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मतदान केंद्रांवर ईव्हीएम यंत्रणा व्यवस्थित कार्यरत असून, कोणतीही तांत्रिक अडचण नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच पोलीस बंदोबस्त, होमगार्ड्स आणि स्वयंसेवकांच्या माध्यमातून सुरक्षिततेचीही योग्य व्यवस्था करण्यात आली आहे.
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे मुंबईच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मुंबईकडे केवळ राज्याचंच नाही, तर देश-विदेशातील अनेकांचं लक्ष लागलं असल्याचा दावा करत त्यांनी सत्ताधारी महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला. संजय राऊत म्हणाले, “मुंबईकडे आज अनेकांचे लक्ष लागले आहे. कदाचित अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचेही लक्ष लागले असेल. कारण मुंबई काही लोकांना त्यांच्या लाडक्या उद्योगपतींच्या घशात घालायची आहे.” या वक्तव्यातून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर उद्योगपतींच्या फायद्यासाठी मुंबई विकण्याचा आरोप केला.
( Ganesh Naik) 29 महानगरपालिकांमध्ये मतदान आज होणार आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी–चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली–मिरज–कुपवाड, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड–वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर, उल्हासनगर, कल्याण–डोंबिवली, भिवंडी–निजामपूर, मीरा–भाईंदर, वसई–विरार, पनवेल या 29 महानगरपालिकांमध्ये मतदान होणार आहे. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून असून संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
मुंबईसह राज्यातील महानगरपालिकांसाठी सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते मतदानाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना दिसत आहेत. याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सना मलिक यांनी मतदान, पैसे वाटप, दुबार मतदान तसेच निवडणुकीतील विजयाबाबत आपली ठाम भूमिका मांडली आहे. सना मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधताना सर्वप्रथम मतदानाचे महत्त्व अधोरेखित केले. “प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा अधिकार बजावलाच पाहिजे. अधिकाधिक मतदान झाले, तर लोकशाही अधिक मजबूत होईल,” असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. निवडणूक हा लोकशाहीचा सण असून, या सणात प्रत्येकाने सहभागी व्हावे, असे त्या म्हणाल्या.
मुंबईसह राज्यातील महानगरपालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया उत्साहात पार पडत आहे. या लोकशाहीच्या उत्सवात सामान्य नागरिकांबरोबरच राजकीय नेते, माजी मंत्री आणि नामवंत व्यक्तींनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. याच पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांनी आज मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील पहाडी शाळा संकुलातील मतदान केंद्रावर सकाळच्या सत्रात मतदान केले. राम नाईक मतदानासाठी दाखल होताच परिसरात उत्साही वातावरण पाहायला मिळाले. सकाळपासूनच या मतदान केंद्रावर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच तरुण मतदार मोठ्या उत्साहात मतदानासाठी घराबाहेर पडले होते. प्रशासनाच्या वतीने मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मुंबईसह राज्यातील अनेक महानगरपालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांसह अनेक कलाकार आणि प्रसिद्ध व्यक्ती मतदानाचा हक्क बजावत लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेताना दिसत आहेत. यामध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेता सुमित राघवन यांनीही आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे. अभिनेता सुमित राघवन यांनी मुंबईतील विले पार्ले परिसरातील मतदान केंद्रावर सकाळी मतदान केले. मतदानानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले. लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान अत्यंत महत्त्वाचे असून, प्रत्येक मतदाराने आपला हक्क नक्कीच बजावला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
BMC Election 2026 च्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी गुरुवारी (15 जानेवारी) मतदान प्रक्रिया पार पडणार असून प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. मतदान आणि त्यानंतर होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अनेक महत्त्वाचे रस्ते तात्पुरते बंद ठेवण्यात येणार असून, नागरिकांसाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे.
राज्यात सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात माझा कोणत्याही राजकीय आघाडीला पाठिंबा नाही, असे ठाम मत जरांगे पाटील यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, महाविकास आघाडी असो वा महायुती – दोन्हींपैकी कोणालाही माझा पाठिंबा नाही. सध्या निवडणूक प्रचारादरम्यान सोशल मीडियावर जरांगे पाटील यांचे काही जुने व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमधून वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात असून, काही जण त्यांचा वापर पक्षीय प्रचारासाठी करत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी हे सर्व व्हिडिओ जुने असून त्यांचा सध्याच्या निवडणुकांशी कोणताही संबंध नाही, असे स्पष्ट केले आहे.
राज्यातील महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि सुरक्षित पार पडावी यासाठी निवडणूक आयोगाकडून कडक नियम लागू करण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणून मतदान केंद्रावर मोबाईल फोन नेण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. मतदारांनी मतदानासाठी जाताना मोबाईल फोन सोबत नेऊ नये, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. मतदान केंद्रावर मोबाईल फोन वापरल्यास गोपनीयतेचा भंग होऊ शकतो. विशेषतः मतदान करतानाचे फोटो, व्हिडीओ काढणे किंवा ईव्हीएमजवळ मोबाईल वापरणे हे निवडणूक नियमांचे उल्लंघन ठरते. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी ही बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मतदारांवर कायदेशीर कारवाई, दंड किंवा मतदानाचा हक्क रद्द होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
नागपूर महानगरपालिकेच्या मतदानाला सकाळी साडेसात वाजता पासून सुरुवात झालेली आहे. नागपूर शहरातील लकडखंड झोन क्रमांक 8 प्रभाग क्रमांक 24 मधील मतदान केंद्र क्रमांक 65 मध्ये पिंक बूथ तयार करण्यात आलं आहे. महिलांच्या मतदानातील टक्केवारी वाढावी, या दृष्टीनं निवडणूक आयोगानं ही संकल्पनेतून हा पिंक बूथ तयार केली आहे. आता या पिंकबूत मतदान केंद्रावर हळूहळू मतदार मतदानाचा हक्क बजावताना बघायला मिळत आहे.
राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान सुरु..2,869 जागांसाठी 15,931 उमेदवार रिंगणात
सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान होणार ..सर्वांना मतदान करण्याचं लोकशाही मराठीचं आवाहन
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुंबई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक सुरक्षा व्यवस्था राबवण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी मुंबईत १० अतिरिक्त पोलीस आयुक्त, ३३ पोलीस उपायुक्त (DCP) आणि ८४ सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) तैनात असणार आहेत. यासोबतच ३,००० हून अधिक पोलीस अधिकारी आणि तब्बल २५,००० पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी व होमगार्ड्स रस्त्यावर असणार आहेत. संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला असून, ड्रोन आणि सीसीटीव्हीद्वारे सतत नजर ठेवली जाणार आहे.
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी–चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली–मिरज–कुपवाड, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड–वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर, उल्हासनगर, कल्याण–डोंबिवली, भिवंडी–निजामपूर, मीरा–भाईंदर, वसई–विरार, पनवेल या 29 महानगरपालिकांमध्ये मतदान आज होणार आहे. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार असून असून संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत असून, सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. ही प्रक्रिया सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत चालणार आहे. देशातील सर्वात श्रीमंत आणि महत्वाची मानली जाणारी ही महानगरपालिका असल्याने, या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. मुंबईत मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तब्बल 25 हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी या निवडणूक प्रक्रियेसाठी तैनात आहेत. यामध्ये 10 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 33 डीसीपी, 84 एसीपी यांच्यासह होमगार्ड्स, एसआरपीएफ आणि क्विक रिस्पॉन्स टीम्सचा समावेश आहे. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारेही नजर ठेवली जात आहे.
(Election) राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी–चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली–मिरज–कुपवाड, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड–वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर, उल्हासनगर, कल्याण–डोंबिवली, भिवंडी–निजामपूर, मीरा–भाईंदर, वसई–विरार, पनवेल या 29 महानगरपालिकांमध्ये मतदान आज होणार आहे.
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज (दि. 15) मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी 7 :30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार असून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. राज्यातील प्रमुख शहरे, औद्योगिक केंद्रे आणि महानगरांमध्ये ही निवडणूक होत असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.
मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, नाशिक, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), नागपूर, अमरावती, कोल्हापूर, सोलापूरसह 29 महानगरपालिकांमध्ये मतदान होत आहे. या निवडणुकीत हजारो उमेदवार रिंगणात असून कोट्यवधी मतदार आपला कौल देणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता कोणाच्या हाती जाणार, याबाबत मोठी उत्सुकता आहे.