Lokshahi Marathi live  Lokshahi Marathi live
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Update live : महापलिकेच्या निवडणूकचं बिगूल वाजलं

Marathi Live Headlines Updates: आज सोमवार, दिनांक 15 डिसेंबर 2025, हिवाळी अधिवेशन, राज्यातील थंडी, महापालिका निवडणुका अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..

Dhanshree Shintre

Maharashtra Politics: मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का

ठाकरे गटातील माजी नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर भाजपच्या वाटेवर

उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती

गेल्या काही दिवसांपासून त्या ठाकरे यांच्या सेनेत नाराज असल्याची चर्चा

भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत उद्या होणार प्रवेश

दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात होणार प्रवेश

Sangli: उद्या सांगलीत पार पडणार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण लोकार्पण सोहळा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण

उद्या सांगलीत पार पडणार लोकार्पण सोहळा

मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार लोकार्पण

अहिल्यादेवी होळकर चौकात पार पडणार सोहळा

अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दी दिनी सोहळा

Ramdas Athawale: 'राज ठाकरेंना सोबत घेणं उद्धव ठाकरेंची मोठी चूक' केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचं वक्तव्य

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने उद्धव ठाकरेंचं नुकसान होणार असून राज ठाकरेंना सोबत घेणं उध्दव ठाकरेंची मोठी चूक असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले आहे.

तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मुंबईत एकत्र आल्यामुळे मुंबईतील नॉन मराठी मते महायुतीला मिळतील.

मुंबईतील मराठी मते महायुती,काँग्रेस आणि ठाकरे बंधूंना मिळणार आहेत, त्यामुळे मराठी मतात मोठी फूट होणार आहे.

त्याच बरोबर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे उद्धव ठाकरे यांचे मोठे नुकसान होणार आहे.

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांचा ट्विटमधून पश्चिम बंगाल सरकारला चिमटा

एक्स पोस्टवर मुंबईकरांचे मानले आभार

पश्चिम बंगालमध्ये झाला होता राडा

मुंबईकरांनी दाखवले शिस्तबद्धतेचे दर्शन

मुंबईकरांचे आभार मानत मुख्यमंत्र्यांचा ममता यांना चिमटा

मुंबईच्या कांदळवनात बांगलादेशी आणि रोहिंग्यांचे बस्तान! आजपासून कोम्बिंग ऑपरेशन

मुंबईतील मालाड, मालवणी, मनोर, गोराईत कांदळवनांमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करून राहिलेल्या बांगलादेशी, रोहिंग्यांना हटवण्यासाठी उद्यापासून दोन दिवस गृह विभाग आणि वन विभागाकडून संयुक्त कारवाई केली जाणार आहे.

तसेच कांदळवनांचे गुगल मॅपिंगही येत्या सहा महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत दिले.

Maharshtra Politics: भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांची नियुक्ती

भाजपच्या पार्लामेंटरी बोर्डाकडून नियुक्ती

नितीन नबीन पटना येथील बांकिपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार

बिहारमधील एनडीए सरकारमध्ये त्यांनी नगर विकास, गृहनिर्माण, नागरी प्रशासन यांसारखी महत्त्वाची खाती सांभाळली

भाजपमध्ये कुशल संघटक म्हणून नबीन यांची ओळख

भाजपकडून कार्यकारी अध्यक्षपदाचा चेहरा बिहारमधून पुढे

Parbhani: परभणीतील १.६० लाख शेतकरी पीक नुकसान भरपाईपासून वंचित

परभणी जिल्ह्यासाठी शासनाने ४२५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असतानाही महसूल विभागाच्या अनास्थेमुळे सुमारे १ लाख ६० हजार शेतकऱ्यांना अद्याप पीक नुकसान भरपाई मिळालेली नाही. जवळपास ८३ कोटी रुपये अजूनही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पडून असल्याचा गंभीर मुद्दा आमदार राजेश विटेकर यांनी विधानसभेत उपस्थित केला.

Political News: परभणीत भाजपकडून महापालिका निवडणुकीची तयारी सुरु

महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर परभणीत भारतीय जनता पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागला असून, परभणीत आज भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, माजी आमदार सुरेश वरपूडकर आणि भाजप महानगर जिल्हाप्रमुख शिवाजी भरोसे यांच्याकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मोठ्या संख्येने इच्छुकांची यावेळी गर्दी पाहायला मिळाली.

Dhule Weather: धुळे जिल्ह्यामध्ये 5 ते 6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

सध्या धुळे जिल्ह्यामध्ये पाच ते सहा अंश सेल्सिअस इतकं तापमानाची नोंद करण्यात आली आहे

यातच शेतातील भाजीपाला पिकांना याचा मोठा फटका जाणवत आहे

थंडीमुळे भाजीपाला पिकामध्ये घट झाली असून बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचे उत्पन्न घटलेला आहे

परिणामी भाजीपाल्याच्या दरांमध्ये देखील वाढ झाली आहे

टोमॅटो सध्या एक हजार रुपये कॅरेट प्रमाणे विक्री होत आहे

Marathi News Live: ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा उद्या मेळावा

संध्याकाळी 6 वाजता वरळी डोमला होणार मेळावा

'उद्यापासून मुंबईचा राजकीय पट बदलणार, हे निश्चित'

सत्य आता मुंबईकरांसमोर येणार- अखिल चित्रे

Radhakrishna E. Vikhepatil: मंत्री विखे पाटील आज नांदेड जिल्हा दौऱ्यावर

नांदेड- मंत्री विखे पाटील नांदेड दौऱ्यावर आहेत,

उद्या सर्व आमदार जिल्ह्यात असतील शिंदे सेनेचे नाराज माजी आजी पदाधिकारी व माजी नगरसेवक आमदार हेमंत पाटील यांच्यापुढे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या एकाधिकार शाहीची कैफियत मांडणार आहेत.

Kolhapur Politics: कोल्हापुरात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप अलर्ट.

भाजपने कोल्हापूर महापालिकेसाठी काल दिवसभर इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.

परंतु, वेळ न पुरल्याने आता पुन्हा आज तीन वॉर्डातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.

खासदार धनंजय महाडिक, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव आणि प्रदेश सचिव महेश जाधव यांनी या मुलाखती घेतल्या.

यानिमित्ताने भाजप कार्यालय इच्छुकांच्या गर्दीने फुलून गेले होते. तब्बल ३०० हून अधिक जणांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे.

Beed: बीडमध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची 76 वी जयंती साजरी

स्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त रामतीर्थ एमआयडीसी पेठ बीड विभाग येथे आरोग्य तपासणी शिबिर ,रक्तदान शिबीर व शैक्षणिक साहित्य वाटप आयोजन भाजपा अनुसूचित जाती प्रदेश उपाध्यक्ष अनिल चांदणे यांनी केले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्यावर आरोप

माढा तालुक्यातील टेंभुर्णी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते भारत पाटील यांच्या अंगावर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काळया रंगाचे ऑइल ओतून त्यांना आंघोळ घातली.

दोन दिवसांपूर्वी त्यांनी वाळू माफियांनी वकिलाला केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला होता

त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची यांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप मराठा क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे

याचा राग मनात धरून या कार्यकर्त्यांनी भारत पाटील यांच्या अंगावर काळे ऑइल ओतल्याचा प्रकार घडला आहे

Mumbai Politics: मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी पहिली बैठक पार पडणार

- महायुतीच्या जागावाटपाचा मुहूर्त ठरला

- मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी पहिली बैठक पार पडणार

- भाजपकडून ४ तर शिवसेनेकडून ६ नेते वाटाघाटी करणार

- अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी दोन्ही पक्षांचा आग्रह

- मुंबईत भाजप १५० जागांवर लढण्याच्या तयारीत तर शिवसेनाही शंभर जागांवर आग्रही असल्याची सूत्रांची माहिती

Mumbai Weather: मुंबईतील काही भागातील हवा धोकादायक

गोवंडीचा एक्युआय 230 वर

नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस आणि डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीचे काही दिवस मुंबईतील हवा वाईट ते अतिवाईट

त्यानंतर हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली

मात्र आज पुन्हा शिवाजी नगर परिसरातील हवेची गुणवत्ता ढासळली

समीर ॲप नुसार ही गुणवत्ता 230 इतकी

त्यामुळे या परिसरातील हवा वाईट श्रेणीत नोंदवली गेली आहे

यापूर्वी 16 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत तेथील हवा वाईट स्वरूपात नोंदवली गेली होती

Siddhivinayak Temple: सिद्धिविनायक मंदिराच्या सुशोभीकरणासाठी 500 कोटी रुपयाचा निधी देण्यास विरोध

राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिकेने मंदिराच्या सुशोभीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे

यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद रद्द करावी आणि कोणतीही निविदा प्रक्रिया पुढे येऊ नये यासाठी महापालिकेला कायदेशीर नोटीस बजावली

वेळ पडली तर उच्च न्यायालयात देखील जाऊ असा संघटनेने दिला इशारा

आम्ही करदाते आहोत. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत योगदान देतो

Marathi School: मराठी शाळांच्या मुद्यावर 18 डिसेंबरला मोर्चा

मुंबई महानगरपालिकेवर निघणार मोर्चा

मराठी शाळांच्या मुद्द्यावर मराठी अभ्यास केंद्राचा कार्यक्रम

मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांची घोषणा

मराठी शाळांचे भूखंड स्वस्त दरात विकल्याचा आरोप

मराठी अभ्यास केंद्राच्या परिषदेत मराठी शाळांच्या अस्तित्वाच्या प्रश्नावर ठोस उपाययोजना शोधण्यासाठी आणि वस्तुस्थितीबाबत चर्चा

मराठी शाळांचे भूखंड स्वस्त दरात घेऊन, बिल्डरांना देऊन त्या जागांवर मॉल-टॉवर उभारण्याचा धंदा महाराष्ट्रात सुरू असल्याचा दीपक पवार यांचा आरोप

Accident News: पातूरजवळ टिप्पर–एसटी बसची धडक; दोन महिला जखमी

अकोला वाशीम महामार्गावरील बोडखा गावाजवळ टिप्पर आणि राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा अपघात झाला.

गिट्टी खदानातून मुरूम घेऊन जाणाऱ्या टिप्परला पातूरहून वाशीमकडे जाणाऱ्या एसटी बसने मागून जोरदार धडक दिली.

या अपघातात बसमधील दोन महिला जखमी झाल्या.

स्थानिक युवकांनी जखमींना तात्काळ पातूर येथे उपचारासाठी हलवले.

Prakash Ambedkar: दोन-तीन महिन्यात पाकिस्तान सोबत युद्ध होईल, प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवलं भाकीत

उल्हासनगरमध्ये बहुजन वंचित आघाडीचे जाहीर सभा पार पडली.

प्रकाश आंबेडकर हे जाहीर सभेला संबोधित करत होते. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी एक भाकीत वर्तवलं,येत्या दोन ते तीन महिन्यात एक युद्ध होईल आणि तेही पाकिस्तानशी,

मात्र आज पाकिस्तानला इंग्लंड, डोनाल्ड ट्रम्प पुतीन आणि चायना हे शस्त्र पुरवण्यासाठी तयार आहेत,

त्यामुळे एकाच वेळी तुम्ही चार जणांशी लढणार आहात असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Maharashtra Weather: राज्यात थंडीचा कडाका वाढला

महिनाभर थंडीची लाट राहण्याचा अंदाज

तापमानाचा पारा 15 अंशांच्या आपसास

31 डिसेंबरपर्यंत हवामान थंड राहील

हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Chess Compitition: यवतमाळमध्ये आंतरराष्ट्रीय खुली फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन

जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच आंतरराष्ट्रीय खुली फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा पोदार प्रेप आणि पोदार इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आली होती.

या स्पर्धेत देशभरातून आलेल्या ५०० च्यावर विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता.

प्रत्येक खेळाडूला आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत खेळण्याची प्रेरणा मिळावी व जिल्ह्यातून नवीन बुद्धिबळपट्टू घडावेत यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती श्रेयस निकम यांनी दिली.

रत्नागिरीतील लांजा तालुक्यात सुरज मोरे यांची रत्नागिरीजिल्हा न्यायाधीश पदी निवड

लांजा तालुक्यातील पुणस गावचे सुपुत्र सुरज सदानंद मोरे यांची रत्नागिरीबजिल्हा न्यायाधीश पदी निवड झाली

यावेळी त्यांच्या पूनस मूळ गावी त्यांचं भव्य स्वागत करण्यात आले.

Solapur:सोलापुरात ऊस दर जाहीर करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

- उत्तर सोलापूर तालुक्यातील लोकमंगल साखर कारखाना स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी बंद पाडला

- लोकमंगल साखर कारखान्याच्या गव्हाणीत उड्या मारून चालू कारखान्याचे गाळप बंद पाडले

- काल दुपारपासून साखर कारखाना बंद पाडला असून रात्री देखील स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी कारखान्यात मुक्काम केला

- जोपर्यंत साखर कारखाना उसाला दर जाहीर करत नाही तोपर्यंत कारखाना सुरु करू देणार नसल्याची स्वाभिमानीची भूमिका

- कडक्याच्या थंडीतही पदाधिकाऱ्यांनी कारखान्यातच जेवणावळी घालत उसदर जाहीर करण्यासाठी आंदोलन सुरूच ठेवले

Hardik Pandya: भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याचा नवा विश्वविक्रम

हार्दिक पांड्याने नुकताच (डिसेंबर २०२५ मध्ये) आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये १०००+ धावा आणि १००+ विकेट्स घेणारा पहिला भारतीय खेळाडू बनून नवा विक्रम केला आहे,

तसेच असा पराक्रम करणारा तो जगातील चौथा खेळाडू ठरला आहे.

या ऐतिहासिक कामगिरीमुळे तो T20 आंतरराष्ट्रीयमध्ये १००० धावा आणि १०० बळी घेणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज (pacer) बनला आहे.

Nagpur: नागपूर खंडपीठाचा महावितरणला दणका

शेतकऱ्यांना वीज जोडणी न दिल्याने जनहित याचिका

अमरावतीच्या धारणी तालुक्यातील ६२ शेतकऱ्यांचा वीज जोडणीचा प्रश्न

नागपूर खंडपीठाची राज्य सरकार, महावितरणला नोटीस

9 जानेवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर

पुण्यातील ३ हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे करणार भूमिपूजन आणि लोकार्पण

आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून विकासकामांच लोकार्पण आणि भूमिपूजन केले जात आहे

दुपारी तीन वाजता गणेश कला क्रीडा येथे आयोजित कार्यक्रम आहे

यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील माधुरी मिसाळ आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत

Railway: इंडिगो प्रमाणेच देशातील रेल्वेसेवा कोलमडण्याची शक्यता

सद्यस्थितीत लोको पायलटशी अनेक पदे रिक्त असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर येत आहे ताण

याच मुद्द्यावरून लोको पायलट आक्रमक

अनेकदा पत्रव्यवहार करूनही समस्येकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा लोको पायलट संघटनेचा आरोप

संपूर्ण देशभरात 1 लाख 47 हजार लोको पायलटची आवश्यकता असताना सध्या मात्र 1 लाख 15 हजार लोको पायलट कार्यरत

जवळपास 30 हजार लोको पायलटची कमतरता

राज्यात महिन्याला साडे तीन लाख दस्त नोंदणी

जवळपास महिन्याला पाच हजार कोटी मिळतात महसूल विभागाला

गेल्या आठ महिन्यात ३७ हजर कोटी रुपये महसूल दस्त नोंदणी मधून मिळाला आहे

शासनाने ६३ हजार कोटी रुपयांचं उद्दिष्ट ठेवला आहे त्यापैकी ६० टक्के पूर्ण झाल आहे

मुंबई आणि पुणे शहरात होणारी बांधकाम वाढ लक्षात घेत उद्दिष्ट देण्यात आला आहे

Pune: पुणे शहरात आणखी नवीन 5 पोलीस ठाणी

नवीन दोन परिमंडळांची निर्मिती देखील होणार

अखेर गृहविभागाकडून पोलीस ठाण्यांना मंजुरी

शहराचा वाढता विस्तार विचारात घेऊन निर्णय

नवीन पोलीस ठाण्यांसाठी 830 पदांना देखील मंजुरी

Vasai School: उठाबशांची शिक्षा देणाऱ्या वसईच्या शाळेला दणका

उठाबशांची शिक्षा देणाऱ्या शाळेची मान्यता रद्द

गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी केंद्रप्रमुखांवरही कारवाई

उठाबशांची शिक्षा केल्याने मुलीचा झालेला मृत्यू

मुख्य आरोपी शीतल तेजवानीला करणार कोर्टात हजर

पुणे पोलीस शीतल तेजवानीला करणार कोर्टात हजर

शीतल तेजवानीची पोलीस कोठडी आज संपणार

शीतल तेजवानीचा ताबा आज बावधन पोलीस घेणार

Pune News: मेट्रोसाठी उड्डाणपूल फोडण्याआधीच विद्युतरोषणाईवर दोन कोटींचा खर्च

सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल चौक ते फन टाइम थिएटरदरम्यान नव्याने उभारलेला उड्डाणपूल नियोजित मेट्रो मार्गासाठी तब्बल ६६ ठिकाणी फोडला जाणार आहे.

येत्या काही महिन्यांत हे काम सुरू होणार असतानाही पुणे महापालिकेच्या विद्युत विभागाने या उनणपुलाच्या आकर्षक विद्युतरोषणाईसाठी १ कोटी ८० लाख रुपयांचा खर्च करण्याचा प्रस्ताव तयार केला असून, या प्रस्तावाला महापालिकेच्या स्थायी समितीने नुकतीच मंजुरी दिली आहे.असा आरोप रेखा कोंडे यांनी केलाय.

पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण; मुख्य आरोपी शीतल तेजवानीला करणार कोर्टात हजर

मुंढवा जमीन घोटाळ्यातील संशयित मुख्य आरोपी शीतल तेजवानीला आज पुणे पोलीस न्यायालयासमोर हजर करणार असून शितलची पोलीस कोठडी आज संपणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाची आज दुपारी 4 वाजता सह्याद्रीवर पत्रकार परिषद

महापालिका निवडणुका जाहीर होण्याची शक्यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर

पुणे महापालिका निवडणुकीसाठी राजकीय नेंत्याची तयारी सुरू

देवेंद्र फडणवीस यांच पुण्यावर विशेष लक्ष

महापालिका निवडणुकीसाठी आता पासूनच कसली कंबर

आज ३ हजार कोटीच्या कामाच करणार उद्घाटन

तर उद्धव ठाकरे १९ तारखेला पुणे दौऱ्यावर येणार

राज ठाकरे यांचा पण पुढील आठवड्यात पुणे दौरा असणार आहे

सगळ्याच महत्वाच्या नेत्यांचे पुणे दौरा आहे

आतापासून मुंबई नंतर पुण्यावर सगळ्या नेत्यांनी लक्ष केंद्रित केल आहे

Mumbai: संपूर्ण मुंबईत मराठी माणसा मुंबई वाचावं या आशयाचे लागले फलक

मराठी माणसांकडून हे फलक लावण्यात आल्याचा मनसेचा दावा

पायाखालची जमीन एकदा गेली की ती परत मिळत नसते मराठी माणसा मुंबई वाचव अशा आशयाचे फलक

Marathi School: मराठी शाळांच्या मुद्यावर 18 डिसेंबरला मुंबई महानगरपालिकेवर निघणार मोर्चा

मराठी शाळांच्या मुद्यावर 18 डिसेंबरला मोर्चा

मुंबई महानगरपालिकेवर निघणार मोर्चा

मराठी शाळांच्या मुद्द्यावर मराठी अभ्यास केंद्राचा कार्यक्रम

मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांची घोषणा

मराठी शाळांचे भूखंड स्वस्त दरात विकल्याचा आरोप

2-3 महिन्यांत पाकिस्तानसोबत पुन्हा युद्ध होईल, प्रकाश आंबेडकर यांचे मोठे विधान

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कालावधीत विश्वगुरूच्या नादात त्यांनी भारताला एकही मित्र ठेवला नाही.

ऑपरेशन सिंदूर युद्धाच्या वेळेस एक देश सुद्धा आपल्या सोबत उभा राहिला नाही. दोन-तीन महिन्यात पुन्हा एक युद्ध होईल. ते युद्ध सुद्धा पाकिस्तान सोबत होईल." असे गंभीर विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते उल्हासनगर शहरात आयोजित सभेत बोलत होते.

मुंबईतील काही भागातील हवा धोकादायक

गोवंडीचा एक्युआय 230 वर

नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस आणि डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीचे काही दिवस मुंबईतील हवा वाईट ते अतिवाईट

त्यानंतर हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली

मात्र आज पुन्हा शिवाजी नगर परिसरातील हवेची गुणवत्ता ढासळली

समीर ॲप नुसार ही गुणवत्ता 230 इतकी

त्यामुळे या परिसरातील हवा वाईट श्रेणीत नोंदवली गेली आहे

यापूर्वी 16 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत तेथील हवा वाईट स्वरूपात नोंदवली गेली होती

ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा उद्या मुंबईत मेळावा

द्यापासून मुंबईचा राजकीय पट बदलणार हे निश्चित...

सत्य मुंबईसमोर येणार असल्याचं अखिल चित्रेंचं ट्वीट.

Kolhapur: कोल्हापुरातील इचलकरंजीत छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याचं अनावरण

कोल्हापूरातील इचलकरंजी इथं होणार छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याचे अनावर

इचलकरंजी इथल्या मलाबादे चौकात उभारण्यात आलायं छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा

पुतळा अनावरानंतर इचलकरंजी महापालिकेच्या विविध विकास कामांचा होणार उद्घाटन

तानाजी सावंतांचा मुलगा भाजपकडून निवडणूक लढवण्याची शक्यता

शिवसेना आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा भाजपकडून निवडणूक लढवणार?

शिवसेनेतून लढणार का या प्रश्नावर महायुतीतून लढणार असे दिले संकेत

गिरीराज सावंत यांना पुणे महानगरपालिकेची निवडणूक कात्रज भागातून लढायची आहे

काही दिवसांपूर्वी सावंत यांनी भाजप कार्यालयाकडून अर्ज ही घेतल्याची होती चर्चा

उमेदवारांना 6 महिन्याच्या आत जातवैधता प्रमाणपत्र देणं बंधनकारक

29 महापालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार

मुंबईत 10 हजार 111 मतदार केंद्रं असणार

1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरली जाईल -  निवडणूक आयोग

उमेदवारी अर्ज ऑफलाईन पद्धतीनं स्वीकारली जातील -  निवडणूक आयोग

11 लाख दुबार मतदारांची नोंद होती-निवडणूक आयोग-निवडणूक आयोग

'मताधिकार' मोबाईल अॅप तयार केला आहे-निवडणूक आयोग

मुंबई पालिकेत 11 लाख दुबार मतदारांची नोंद होती- निवडणूक आयोग

29 महानगरपालिकांच्या निवडणुका होणार

15 जानेवारी महापालिकेच्या निवडणूका, 16 जानेवारीला मतमोजणी

महापलिकेच्या निवडणूकचं बिगूल वाजलं

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा