काल दिवसभर बंडू आंदेकरच्या घरी पोलिसांची छापेमारी, छापेमारीत 17 लाखांपेक्षा अधिकची रोकड,2 पिस्तूल आणि एक एअर गन जप्त
संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला गेले असून निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.
सुप्रिया सुळे आज अमित शाहांची भेट घेणार आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदारही अमित शाहांना भेटणार असून शौर्य पाटील आत्महत्या प्रकरण, विमा कंपन्याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.
माधुरी हत्तीणीला नांदणीत आणण्याचा मार्ग मोकळा झाला असून मठाच्या जागेत पुनर्वसन केंद्र उभारण्यास परवानगी मिळाली आहे. उच्चाधिकार समितीसमोर मुंबईत यावर सुनावणी पार पडली.
पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ हडपसर मधील डॉक्टरांकडून पोलीस स्थानकावर मूक मोर्चा काढण्यात आला असून शेकडो डॉक्टर्स या मूक मोर्चा मध्ये सामील झाले आहेत.
पुणे महापालिका तारखा जाहीर होताच मनसे आणि ठाकरे गट कामाला लागले आहेत. दोन्ही पक्ष एकत्रित येत बैठका घेणार असून उद्या आणि परवा अशा दोन दिवस मनसे आणि ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांच्या बैठक होणार आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज वसमत दौऱ्यावर आहेत. वसमत परिषदेच्या निवडणुकीच्या नगराध्यक्षासह नगरसेवकाच्या प्रचारर्थ महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची आज वसमत येथे सभा होणार आहे.
लवासा प्रकरणाची अंतिम सुनावणी आज पार पडणार आहे. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि ईतर अधिकाऱ्यांवर CBI मार्फ़त चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची याचिकेतून मागणी करण्यात आली आहे