काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना भारतीय जनता पार्टीची फार काळजी आहे...
काही महिन्यांमध्ये यशोमती ताई ठाकूर भाजपमध्ये येणार आहे - आमदार रवी राणा यांचा यशोमती ठाकूर यांच्या बाबत पुन्हा दावा .
यशोमती ठाकूर यांना वाटते भाजपवर अन्याय झाला पाहिजे नाही...भाजप पक्ष वाढला पाहिजे असं त्यांना वाटते अशी काळजी त्यांना आहे येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टी माझा पक्ष राहणार आहे म्हणून त्यांना हि काळजी वाटते....
मी मुख्यमंत्र्यांसोबत वर्षा बंगल्यावर यशोमती ठाकूर यांची भेट करून देईल
कल्याण पश्चिमेतील पॅनल क्रमांक 6 मध्ये निवडून आलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संकेश भोईरला आदित्य ठाकरे यांनी विडिओ कॉल करून अशा शब्दांत दिल्या शुभेच्छा पॅनल क्रमांक 6 मध्ये माजी महापौर सह दिग्गज नगरसेवक विरोधात उभे असताना संपूर्ण पॅनल हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विजयी झाला.
छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर तणाव निर्माण झाला आहे. गांधी नगर भागात भाजपचे उमेदवार बंटी चावरिया यांच्या घरावर मध्यरात्री हल्ला झाल्याची घटना घडली. पराभूत शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार मिल्लू चावरिया यांच्या समर्थकांनी लाठ्या-काठ्या व दगडफेक केल्याचा आरोप आहे.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत पुणेकर नागरिकांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला असून महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता आणली असून तब्बल ११९ नगरसेवक भाजपचे निवडून आले आहे. तर दुसरीकडे महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्रमक प्रचार केलेला असताना देखील अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २३ मधून भाजपच्या चारही उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपचे प्रमोद राठोड, सत्यभामा शिंदे, बाळासाहेब मुंडे आणि सुरेखा गायकवाड हे चारही उमेदवार विजयी ठरले आहेत. या निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून परिसरात जल्लोष करण्यात येत आहे. विजयाच्या आनंदात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत एकमेकांचे अभिनंदन केले.
भाजपचे उमेदवार दिलीप पवार यांचा पराभव झाल्याच्या नंतर कनान नगर परिसरात दगडफेक
भाजपाचे उमेदवार दिलीप पवार यांना मतदान न केल्याच्या रागातून दोन गट आमने सामने
पोलिसांच्या समोरचा दोन गट एकमेकांना भिडले
पोलिसांचा सौम्य लाठीमार
दोन्हीही जमावाला आवरण्यात पोलिसांना यश
शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांना पोलिसांनी धक्काबुक्की करून काढले मतमोजणी केंद्र बाहेर
जबरदस्त धक्काबुक्की धावपळ आणि गोंधळच गोंधळ
पोलिसांनी मारहाण करून मतमोजणी केंद्र बाहेर काढण्याचा शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा आरोप
फेर मतमोजणी करण्याच्या मागणीसाठी मतमोजणी केंद्राबाहेर कुलभूषण पाटील यांचे ठिय्या आंदोलन सुरू
मानखुर्द चिल्ड्रन होम मतदान केंद्रावरून मतपेटी घेऊन निघालेली बस शिवाजी नगर जंक्शन जवळ थांबून एक मतदान पेटी तिथेच उतरवण्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांचा आरोप...
संबंधित केंद्रावर काँग्रेस उमेदवार शशिकांत पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारल्याने तणाव वाढला
ऐनवेळी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला... लाठी चार्ज करत पोलिसांची कारवाई..
कोल्हापूर महानगरपालिकेसाठी महायुतीला निर्विवाद बहुमत मिळाले आहे. महायुतीच्या नवनिर्वाचित विजयी उमेदवारांचा महा सत्कार सोहळा सुरू झालाय. या कार्यक्रमाला पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि नूतन नगरसेवक उपस्थित झालेत. जे होते मनात... तेच घडले मनपात... आणि भावा आला आपला भगवा.. अशा टॅग लाइन देण्यात आल्यात...
जिल्ह्यात सिकलसेल ॲनिमियाच्या समूळ उच्चाटनासाठी आणि जनजागृतीसाठी आरोग्य विभागाने 'अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान' सुरू केले आहे. ही मोहीम १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबवली जाणार आहे.आयुष्मान आरोग्य मंदिर, नांझा (ता. कळंब) येथे झालेल्या भव्य उद्घाटन कार्यक्रमात मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ झाला.
मूर्तीची अज्ञातानं तोडफोड करून विटंबना केल्याचा प्रकार भंडाऱ्याच्या भावड गावात घडला.
ग्रामस्थांना माहीत होताचं त्यांनी मंदिरात जाऊन मूर्तीची पाहणी करून आरोपीला अटक करण्याच्या मागणीला घेऊन ग्रामस्थांनी भावड ते कोंढा या मार्गावर रास्तारोको सुरू केलं आहे.
जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत ग्रामस्थ रास्तारोको आंदोलनावर ठाम राहील, अशी भूमिका ग्रामस्थांनी सध्या घेतली आहे.
रोष बघायला मिळत असून तणावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे.
शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार नीला देसाई यांचे निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने नीला देसाई यांचे निधन झालं असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
महापालिका निकाल लागताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात असणार असून भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक फडणवीस यांना भेटण्याची शक्यता
अजित पवार शरद पवारांच्या भेटीला गेले असून अजित पवार यांच्यासोबत अमोल कोल्हे देखील उपस्थित आहेत.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व निवडून आलेल्या उमेदवारांना मातोश्रीवर बोलवले आहे. आज सर्व ठाकरेंच्या शिवसेनेचे निवडून आलेले उमेदवार मातोश्रीवर येतील.