शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार नीला देसाई यांचे निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने नीला देसाई यांचे निधन झालं असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
महापालिका निकाल लागताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्यात असणार असून भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक फडणवीस यांना भेटण्याची शक्यता
अजित पवार शरद पवारांच्या भेटीला गेले असून अजित पवार यांच्यासोबत अमोल कोल्हे देखील उपस्थित आहेत.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व निवडून आलेल्या उमेदवारांना मातोश्रीवर बोलवले आहे. आज सर्व ठाकरेंच्या शिवसेनेचे निवडून आलेले उमेदवार मातोश्रीवर येतील.