छत्रपती संभाजीनगर आगामी महापालिका निवडणुकीत युती करण्याच्या दृष्टीने भाजप आणि शिंदेसेनेच्या कोअर कमिटीची बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीत प्रभागनिहाय जागांवर प्राथमिक चर्चा झाली मात्र जागावाटपाचा अंतिम निर्णय होऊ शकला नाही. आज दुपारी १ वाजता पुन्हा बैठक होणार आहे बैठकीला शिंदेसेनेचे खासदार, आमदार व स्थानिक नेते, तर भाजपकडून मंत्री अतुल सावे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित असतील. या बैठकीनंतर जागावाटपावर स्पष्टता येण्याची शक्यता आहे.
पुण्यात एकुलता एक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार बापू पठारे यांचा मुलगा सुरेंद्र पठारे हा आता तुतारी सोडून हाती कमळ घेत आहे... गेल्या अनेक दिवसांपासून सुरेंद्र पठारे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या अखेर याला आज मुहूर्त मिळालेला आहे... बाप राष्ट्रवादीचा आमदार असताना मुलगा भाजपामध्ये का जातोय अशी चर्चा आता मतदारसंघात रंगली आहे.
मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)चे अध्यक्ष राज ठाकरे आज आणि उद्या मुंबईत दोन दिवसीय विशेष दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी मुंबई शहराचा आढावा घेऊन मनसेच्या आगामी राजकीय योजना ठरवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुका 2 डिसेंबर रोजी पार पडल्या. मात्र, त्यापैकी 23 नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आज त्या उर्वरित 23 नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे मतदान होणार आहे. निकाल उद्याच म्हणजे 21 डिसेंबर रोजी लागेल. 23 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यांचे भविष्य आज ठरणार आहे
निवडणूक आयोगाने आज गुजरात आणि तामिळनाडूमध्ये एसआयआर मोहिमेनंतर प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. तामिळनाडूमधून तब्बल 97 लाख आणि गुजरातमधून 73.73 लाख मतदारांची नावे वगळण्यत आली आहेत. गुजरातमध्ये यापूर्वी 5.08 कोटी मतदार होते. त्यातून 73.73 लाख नावे वगळण्यात आल्यानंतर मतदार संख्या 4.34 कोटी झाली आहे. तामिळनाडूमध्ये हा आकडा 97 लाखांनी घटून 5.43 कोटींवर आला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या मतदार यादी पडताळणी प्रक्रियेत धक्कादायक माहिती समोर आली असून, शहरात तब्बल दीड लाख दुबार मतदार असल्याचे निष्पन्न झाले आहे.
१६ जिल्ह्यांतील २४ नगरपालिका व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसह सर्व सदस्यपदांसाठी आणि ७६ नगरपालिका व नगरपंचायतींमधील १५४ सदस्यपदांच्या जागांसाठी आज मतदान होणार आहे.