विमानाच्या अपघातात 5 जणांचा मृत्यू
टेक्सासमध्ये मदत मोहिमेवर असताना अपघात
मेक्सिकन नौदलाचे विमान कोसळून 5 जणांचा मृत्यू
मुंबईतील हवेच्या प्रदूषणावरून मुंबई उच्च न्यायालयाच पालिका आयुक्तांना समन्स
खराब हवेच्या गुणवत्तेसंदर्भात अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या निष्क्रियतेवरून मुंबई उच्च न्यायालयाने बजावल समन्स
पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या सचिवांना उद्याच्या सुनवणीला हजर राहण्याचे निर्देश
हवेच प्रदूषण रोखण्यात अधिकाऱ्यांना आलेल्या अपयशाबद्दल उच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त
मुंबईतील खालावणाऱ्या हवेच्या गुणवत्तेवरून मुंबई उच्च न्यायालयाने दाखल करून घेतली आहे सुओ मोटो याचिका
- काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव आणि माजी नगरसेवक राहुल दिवे यांचा राजीनामा
- काँग्रेस पक्षाचा पदाचा आणि सदस्य पदाचा दिला राजीनामा
- तसेच माजी नगरसेवक आशा तडवी यांनी देखील दिला राजीनामा
- स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यासाठी मुभा दिला जात नसल्याने माजी नाराजी
- महापालिका निवडणुकांसाठी मनसे सह इतर पक्षासोबत आघाडी करण्याची आमची इच्छा होती
- मात्र पक्षाने परवानगी नाकारली आघाडी झाली नाहीत तर नुकसान होईल ही आमची भूमिका आम्ही मांडली होती
- भाजप किव्हा शिंदेच्या शिवसेनेत जाण्याची कार्यकर्त्यांची इच्छा
- आज संध्याकाळी बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार
उद्या दुपारी 12 वाजता ठाकरेबंधूच्या युतीची घोषणा... खासदार संजय राऊतांची ट्विट टाकत दिली माहिती
न्यायालयाने देखील त्या परिसरातील दुर्गंधी नियंत्रणात आणण्यासाठी अल्पकालीन उपाय योजना सुचविण्याचे दिले आदेश आहेत. शुद्ध हवं मिळणे हा मूलभूत अधिकाराचा भाग असल्याची न्यायालयाची टिप्पणी. वाढत्या प्रदूषणावर धोरण ठरवण्यासाठी आय आय टी दिल्ली आणि मुंबई यांच्याशी बोलणे सुरू असल्याचे सरकारी वकिलांनी सांगताच न्यायालयाने असमाधान व्यक्त केले. मात्र आजूबाजूला राहणारे नागरिक देखील याप्रकांमुळे त्रस्त असल्याचे पहिला मिळत आहे
राज्यभरात जिंकून आलेल्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा दादरमध्ये होणार सत्कार. शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या नवनिर्विचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा करणार सत्कार. दादरच्या सावरकर स्मारक येथे हा सत्कार सोहळा दुपारी २ च्या सुमारास होणार असल्याची सू्त्रांची माहिती. सत्कार सोहळ्यानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्षांसह नगरसेवक हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ येथे अभिवादनासाठी जाणार.
पार्कसाइट परिसरात आज सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेचा CCTV व्हिडीओ समोर आला आहे. बुर्का घालून फिरत असलेल्या एका व्यक्तीला ‘बालचोर’ समजून जमावाने मारहाण केली. नंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याची ओळख तौसीफ मोहम्मद शेख (वय 33), रिक्षाचालक व स्थानिक रहिवासी अशी पटली.