चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांना थेट निवडणूकप्रमुख पदावरून हटविण्यात आले आहे. त्यांच्या जागी माजी खासदार अजय संचेती यांच्याकडे निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
प्रशांत जगताप यांचा राजीनामा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने स्वीकारला आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी राजीनामा स्वीकारला असून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याने प्रशांत जगताप यांनी काल पक्षाचा राजीनामा दिला होता.
भाजप कोअर कमिटीची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होण्याची शक्यता आहे. भाजपच्या अंतर्गत जागावाटपासंदर्भात या बैठकीत चर्चा पार पडण्याची शक्यता.