भिवंडी पालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली .परंतु अजून निवडणूक प्रचाराची रंगत चढणे बाकी असतानाच,भिवंडीत आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी माजी महापौर विलास पाटील,त्यांचा मुलगा मयुरेश पाटील व इतर तीन जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला
माजी नगरसेविका शीतल गंभीर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक १९०मधून भाजप कडून शीतल गंभीर यांना उमेदवारी दिली.
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा रंगल्या आहेत.
एकीकडे कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याची शेतकरी ओरड करीत असताना दुसरीकडे मात्र मनमाड,मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठया प्रमाणात उन्हाळ कांद्याची लागवड केली जात आहे..
१९४ वाॅर्डची उमेदवारी आमदार सुनिल शिंदे यांच्या भावाला देत असल्यामुळे प्रभादेवी येथील शिवसेना उबाठा मध्ये नाराजी आली. सुनिल शिंदे यांच्या भावाला जर उमेदवारी दिली तर १९४ बंड करू अशी भुमिका बैठकीत शिवसेनेना उबाठा पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपाकडून आज शहरातील पहिला अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. प्रभाग क्रमांक २४ मधील उमेदवार व निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांचा अर्ज आज दाखल होणार आहे.
तेजस्वी घोसाळकर भाजपकडून उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती मिळत आहे. वॉर्ड क्रमांक 2 मधून तेजस्वी घोसाळकर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.