राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं असून, सर्वच प्रमुख पक्ष निवडणूक रणनिती आखण्यात व्यस्त झाले आहेत. अशातच पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना 52 जागांवर मुंबई महापालिकेची निवडणूक लढविणार असून काल रात्री उशिरापर्यंत 49 उमेदवारांना अर्ज देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
नितीन गडकरी यांच्या घरी भाजप शिवसेनेची बैठक सुरू असून राज्यमंत्री आशिष जयस्वाल , कृपाल तुमाने, किरण पांडव, सूरज गोजे नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.
अजित पवारांच्या जिजाई बंगल्यावर तिकिटासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली असून बंगल्यांच्या बाहेर कार्यकर्त्यांची तिकीट मागण्यासाठी रांग लागली आहे.
आनंदराज आंबेडकरांनी शिंदेंची भेट घेतली आहे. जागा वाटपाची घोषणा झाल्यानंतर रात्री उशिरा ही भेट घेतली असून दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
महानगरपालिका निवडणुकीसाठी हालचालींना वेग आला असून आज उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे.