महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छत्रपती संभाजीनगरात भव्य डिजिटल सभा होणार आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांची आज पत्रकार परिषद होणार असून ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अहिल्यानगर दौऱ्यावर असणार आहेत. दुपारी दोन वाजता शहरातील पांजरपोळ मैदानावर जाहीर सभा होणार आहे.
मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रचारादरम्यान वाद वाढले आहेत. प्रभाग क्रमांक ५ मधील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार वर्षा जाधव यांच्या भावावर प्रचार करताना हल्ला झाला
मनसे नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात अमित ठाकरेंनी म्हटले आहे की, "गेल्या काही दिवसांपूर्वी सोलापूरमध्ये जे घडलं, ते आजही आमच्यासाठी अविश्वसनीय आहे. आमचा सहकारी बाळासाहेब सरवदे याला ज्या क्रूर पद्धतीने संपवण्यात आले, ते आजही विश्वास बसण्यापलीकडे आहे."
संजय राऊत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला गेले असून 11 तारखेच्या संयुक्त सभेबाबत या भेटीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.
नवी मुंबईत आज पुन्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो आहे. बेलापूर मतदार संघात एकनाथ शिंदे यांचा रोड शो असणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील कन्नड घाटात भीषण अपघात झाला आहे. घाटावरील वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
मोहित कंबोज यांना न्यायालयाचा दिलासा मिळाला असून मनी लाँड्रिंग प्रकरणातील क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारला आहे.