Lokshahi Marathi News LIVE  
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Updates live: मागाठाण्यात सापडलेले पैसे प्रकाश सुर्वे यांचे असल्याचा आरोप

Team Lokshahi

मागाठाण्यात सापडलेले पैसे प्रकाश सुर्वे यांचे असल्याचा आरोप

मागाठाण्यात मोठ्या प्रमाणात पैसे सापडले आहेत. पोलिसांकडून पैसे कोणाचे याचा तपास सुरु आहे. तसेच शिवसेना उमेदवार प्रकाश सुर्वे यांचे पैसे असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.

विरार कॅशवरुन राहुल गांधी-तावडेंमध्ये ट्विटरवॉर

विरार कॅशवरुन राहुल गांधी-तावडेंमध्ये ट्विटरवॉर पाहायला मिळालं आहे. 'मोदीजी, हे 5 कोटी कुणाच्या तिजोरीतून निघालेत?' तावडेंप्रकरणी राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना सवाल विचारला आहे. नालासोपाऱ्यात या, सीसीटीव्ही तपासा असं आव्हान तावडेंनी राहुल गांधीना केलं आहे.

पंजाबी गायक गॅरी संधू यांच्यावर हल्ला

पंजाबी गायक गॅरी संधू यांच्यावर ऑस्ट्रेलियात एका कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादानंतर हल्ला करण्यात आला. संधूच्या शोमध्ये आलेल्या एका चाहत्याने त्याला मारण्याचा प्रयत्न केला.

छत्रपती संभाजी नगरात 29 कोटींचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजी नगरात 29 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आचारसंहिता लागल्यानंतर पोलिसांनी ही तगडी कारवाई केली असल्याची माहिती संभाजीनगरच्या पोलिसांनी दिली आहे.

ऑगस्ट क्रांती एक्सप्रेसमधून तब्बल 42 लाखांची रोकड जप्त

मुंबईमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोकड जप्त करण्याचे सत्र सुरूच आहे. ऑगस्ट क्रांती एक्सप्रेसमधून तब्बल 42 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

रशियाचा युक्रेनवर 120 क्षेपणास्त्रे आणि 90 ड्रोनचा हल्ला

रशियाने रात्री उशिरा युक्रेनवर 120 क्षेपणास्त्रे आणि 90 ड्रोनसह मोठा हल्ला केला. रशियन हल्ल्यात युक्रेनच्या वीज यंत्रणेला लक्ष्य करण्यात आले आहे. अनेक पॉवर प्लांट आणि ट्रान्सफॉर्मर खराब झाले असून, त्यानंतर देशात वीज कपात जाहीर करण्यात आली आहे.

गुजरातमधील भरुचमध्ये भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू

गुजरातमधील भरुचमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. 4 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. कारची रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे.

राज्यात आतापर्यंत 660 कोटींची मालमत्ता जप्त

आचारसंहिता काळात आतापर्यंत 660 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. 2019 च्या तुलनेत 5 पट मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

वायूदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संरक्षणमंत्र्यांनी घेतली बैठक

वायूदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बैठक घेतली. यावेळी वायूदल प्रमुख आणि सीडीएस अनिल चौहान उपस्थित होते. कमांडर्स कॉन्फरन्समध्ये हवाईदलाच्या कार्याचा आढावा घेण्यात आला.

बहुजन विकास आघाडीने केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपावर विनोद तावडे यांची प्रतिक्रिया समोर

विनोद तावडे प्रतिक्रिया देत म्हणाले, निवडणूका आहेत तर पोलिस तपासणी करो, त्यांच्याकडून तपासणी होऊ देत, नाही तर सीसीटीव्ही फुटेज घेऊ देत. त्याच्यात वास्तव जे आहे... मी तर 40 वर्षांपासून पार्टीमध्ये आहे. अप्पा ठाकूर मला ओळखतात, क्षितिज ठाकूर मला ओळखतात सगळे मला ओळखतात. तर त्यामुळे जी वास्तविकता आहे ती सगळ्यांना माहित आहे. निवडणूक आयोगाने निष्पक्ष तपासणी केली पाहिजे असं माझ मत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Peanut Kadhi Recipe : आषाढीच्या उपवासाला तयार करा चविष्ट शेंगदाण्याची कढी

गरमागरम डाळ, भात अन् त्यावर तूप घालून खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या

Sanjay Raut : 'राज्याच्या सामाजिक, राजकीय वातावरणात नवे बदल घडणार'; संजय राऊतांचं विजयी मेळाव्याबाबत सूचक वक्तव्य