नांदेडच्या एमआयडीसी भागात कंपनीला आग लागली आहे. तिरुमला ऑइल कंपनीला भीषण आग लागली आहे. आगीत कंपनी मालकासह पाच जण गंभीर जखमी.
मुंबईत शरद पवार संजय राऊत सुप्रिया सुळे आणि इतर व्यक्तिसोबत जी बैठक झाली त्यात ईव्हीएम विरोधात लढा तीव्र करण्यासंदर्भात चर्चा झालीय.या संदर्भात इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक होणार आहे. पुण्यात बाबा आढाव यांनी जे आंदोलन केले तोच लढा पुढे घेऊन जाण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झालीय.
ठाण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ठाण्यामध्ये मनसेला मोठा धक्का बसलेला पाहायला मिळत आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी पराभवाची जबाबदारी घेत ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.
दिल्ली विधानसभा 'आप' स्वतंत्र लढवणार
काँग्रेससोबत निवडणूक न लढवण्याचं 'आप'चं ठरलं
हरियाणा, महाराष्ट्राच्या निकालानंतर 'आप'चा मोठा निर्णय
एकनाथ शिंदे ठाण्यात दाखल
दोन दिवसांनंतर शिंदे ठाण्यात दाखल
शिंदे पक्षातील काही नेत्यांची भेट घेण्याची शक्यता
आज शिंदे ठाण्याच्या निवासस्थानीच थांबणार असल्याची माहिती
राष्ट्रवादी SPच्या गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड
मुख्य प्रतोद म्हणून रोहित पाटील यांची नियुक्ती
पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची घोषणा