शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक नवीन नियम लागू केला आहे शेतकरी ओळखपत्र नसेल तर पीएम किसान चे पैसे मिळणार नसल्याची माहिती समोर आल्याने आता शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. सन्माननिधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांसाठी ओळख क्रमांक आता अनिवार्य करण्यात आलेला आहे. हप्त्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आलेल्या आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आत्तापर्यंत झालेल्या तपासाची माहिती घेण्यासाठी धनंजय देशमुख CID अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.
बारामती शहरातील एमआयडीसी परिसरात बेफाम चालवलेल्या दोन 'स्टंट कारच्या' व्हायरल व्हिडीओने बारामतीकरांचा अक्षरशः थरकाप उडाला.हे व्हिडीओ थेट वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यापर्यंत पोहोचले,मग काय? या वाहनांचा वाहतूक पोलिसांचे मर्फतीने शोध घेत अखेर या स्टंटबाजांना बारामती पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विनंतीनंतर साधू महंतांकडून स्नान करण्यास सुरूवात.
मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करणार की नाही हे मुख्यमंत्र्यांनी संध्याकाळ पर्यंत सांगावं. मनोज जरांगेचा फडणवीसांना अल्टिमेटम. मराठ्यांना सुखाने खाऊ दिलं नाही तर आम्हीदेखील सरकारला 5 वर्ष सुखाने खाऊ देणार नाही. जरागेंचा सरकारला इशारा
सातारा, २८ जानेवारी २०२५: कराड शहर पोलिसांनी बेकायदेशीर पिस्टल विक्री करणाऱ्यांना रंगेहात पकडले आहे. पोलिसांनी दोन पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली असून, १.६० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. विश्वसनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा लावून आरोपी आक्या चव्हाण आणि त्याच्या साथीदारांना अटक केली. आरोपीविरोधात भारतीय हत्यार अधिनियम आणि भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'शक्तीपीठ'च्या समर्थनार्थ शेतकरी रस्त्यावर उतरलेत. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा.मोर्चात 12 जिल्ह्यातील शेकडो शेतकरी सहभागी
परभणीच्या गंगाखेड तालुक्यात ग्रामपंचायत कर्मचारी रतन सावंत याना गावगुंडाकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडलीय. तिरंगा झेंड्याचा अपमान करण्याचा उद्देशाने गाव गुंड गोंधळ करत असताना त्याला विरोध केल्याने ही मारहाण केल्याचं आरोप कर्मचाऱ्याकडून केला जातोय.
सुरेश धस यांनी धनंजय मुंडेवर गंभीर आरोप केला आहे. परळी, आंबाजोगाईत कामं न करता त्यांनी बिलं उचलली असल्याच ते म्हणाले.
अशोक धोडी अपहरण प्रकरणात पालघर पोलिसांची मोठी कारवाई
चार संशयीत आरोपींना एलसीबीने घेतलं ताब्यात
संशयितांनी मोठे खुलासे केल्याची पोलिसांची माहिती
'मराठा समाजाशी बोलून उपोषणाची दिशा ठरवणार'
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची माहिती
उद्या दुपारी 12वाजेपर्यंत भूमिका घेण्याची माहिती
फडणवीसांनी मराठ्यांशी गद्दारी केली
नागपूर - अमरावती महामार्गावर ट्रकला भीषण आग.कोळसा घेऊन जाणारा ट्रक आगीत राख.
सांगलीतील विटा येथे बनविण्यात येणाऱ्या एमडी ड्रग्जची मुंबईत देखील विक्री झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. सांगली पोलिसांनी केलेल्या तपासात ही धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.