लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Updates live: मनसेचा यंदाचा वर्धापन दिन पिंपरी चिंचवडमध्ये होणार

shweta walge

मुंबईच्या घाटकोपरमध्ये इमारतीला भीषण आग

घाटकोपर मध्ये पंतनगर जवळील इमारतीला लागली होती आग

डोंबिवलीतील खंबारपाडा येथे पालिकेची कारवाई

डोंबिवलीतील खंबारपाडा येथे पालिकेची कारवाई. उद्यानासाठी राखीव जागेवर अनधिकृत बांधकाम. बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल

आज नियती उद्धव ठाकरेंनाच राजकारणातून कायमचं उठविण्याचा प्रयत्न करतेय - रामदास कदम

पहिल्या दिवसापासून या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड हाच- सुरेश धस

पालघरमध्ये यु.एस.फार्मा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला भीषण आग

कोल्हापुरात शाहू जन संघर्ष सेना आक्रमक

इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना चार दिवसापूर्वी नागपूर येथील प्रशांत कोरटकर नामक व्यक्तीने जीवे भरण्याची धमकी दिली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य केल. यानंतर कोल्हापुरात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात प्रशांत कोरटकर विरोधात गुन्हा दाखल झाला असून गेल्या चार दिवसांपासून प्रशांत कोरटकर फरार आहे या सर्व घटनेविरोधात शाहू जन संघर्ष सेनेच्या वतीने आज कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरण आंदोलन करण्यात आलं

उत्तराखंडमधील हिमस्खलनात चार कामगारांचा मृत्यू

उत्तराखंडमधील हिमस्खलनात चार कामगारांचा मृत्यू झालाय. हिमकडा कोसळल्याने 57 कामगार अडकले होते. आतापर्यंत 47 कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्‍यात यश मिळाले आहे. 24 तासांहून अधिक काळ उल बचावकार्य सुरूच आहे.

अजित पवार यांच्या उपस्थितीत कालवा समितीची बैठक सुरु

बीडचे खासदार बजरंग सोनवणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी विधान भवन पुणे या ठिकाणी आले आहे. बीडच्या कालवा समितीच्या बैठकीसाठी सोनवणे आले असल्याची माहिती.

125 वर्षातील सर्वाधिक उष्ण फेब्रुवारी

यंदाचा फेब्रुवारी महिना मागील १२५ वर्षातील सर्वाधिक तापमान नोंदवला गेलेला महिना ठरला आहे. पुढील काही महिन्यांसाठी देखील हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे.

नवी दिल्ली : देशभरात फेब्रुवारी महिना सर्वाधिक तापमान असलेला महिना ठरला. १९०१ पासून देशात तापमान नोंदी सुरू करण्यात आल्या. १९०१ पासून यंदाचा २०२५ चा फेब्रुवारी महिना सर्वात उष्ण महिना ठरला आहे. यानुसार मागील १२५ वर्षांतील सर्वात उष्ण फेब्रुवारी महिन्याचा विक्रम केला आहे.

जालन्यात प्रशांत कोरटकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल.

जालन्यात प्रशांत कोरटकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोरटकर यांच्याविरुद्ध कलम 152 प्रमाणे कदिम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. प्रशांत कोरटकर यांनी मा. साहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान करत त्यांच्या बद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं होतं.

मनसेचा यंदाचा वर्धापन दिन पिंपरी चिंचवडमध्ये होणार

मनसेचा यंदाचा वर्धापन दिन पिंपरी चिंचवडमध्ये होणार. 9 मार्चला रामकृष्ण मोरे सभागृहात होणार मेळावा. राज्यभरातील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते राहणार उपस्थित

मंत्री नितेश राणे मढी मध्ये दाखल

नितेश राणे हिंदू धर्म सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष. सभेनंतर कानिफनाथ महाराज मंदिरात करणार महाआरती आमदार संग्राम जगताप आणि सागर बेग यांचीही उपस्थिती

कोकणवासियांसाठी खूशखबर!

होळीपूर्वी कशेडी बोगद्यातील दुसरी लाईन सुरू होणार आहे. बोगद्यातील काम युद्ध पातळीवर सुरू सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी काम सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर बोगद्यातील काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. त्यामुळे होळीआधी कोकणवासियांचा कशेडी बोगद्याच्या दोन्ही लाईनने प्रवास सुरु होणार आहे.

तेलंगणात बोगद्यात अडकलेले चार जण सापडले.

मंत्री कृष्णा राव यांनी दिली महत्त्वाची माहिती दिली आहे. एसएलबीसी बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. 11 एजन्सींचे अधिकारी बचाव कार्यात सहभागी झाले होते. तेलंगणातील नागरकुरनूल येथे बोगद्याचा एक भाग कोसळल्याने अनेक कामगार जवळपास एक आठवडा अडकले होते

मनसे नेते राजू पाटील यांचा शिवसेनेवर निशाणा

फडणवीसांचं कौतुक करत शिवसेनेवर टीका अडीच वर्षात जे टेंडर घोटाळे झाले आहेत. त्याच्या चौकशीसाठी 5 वर्षे देखील कमी पडतील राजू पाटीलांनी शिवसेना टीका केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Heavy Rain Alert : महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात धुवांधार पावसाची एंट्री! येणारे चार दिवस सलग झोडपणार; 'या' जिल्ह्यांमध्ये IMD ने जारी केला अलर्ट

Saath Nibhana Saathiya Gopi Bahu : 'साथ निभाना साथिया' फेम 'गोपी बहू'ने गुपचुप केले लग्न, जाणून घ्या कोण आहे? जियाचा नवरा

GST Slab : आता अनेक वस्तूंवरील कर दर कमी होणार! GST चे चार पैकी दोन स्लॅब रद्द होणार; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Uttar Pradesh Crime : नोरा फतेहीसारखी फिगर मिळवण्यासाठी पतीने केला पत्नीचा छळ; नेमकं प्रकरण काय?