सिंधुदुर्गात लवकरच एसटी महामंडळाच्या मिनी बसेस दाखल होणार आहेत. जिल्ह्यातील काही बसस्थानकांची डागडुजी व सुशोभीकरण करण्यात येणार आहे. यासंदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भिमणवार यांची विधानभवनातील आपल्या दालनात बैठक घेऊन चर्चा केली.
मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे त्यामुळे महाराष्ट्रात वास्तव्य करण्यासाठी बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा आलीच पाहिजे. मराठी माणूस, मराठी भाषा ह्याचा उत्कर्ष आणि संरक्षण यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायमच आग्रही आणि कटीबद्ध आहे. अशा प्रकारची वक्तव्य कुणी करू नयेत.
वकिलाने त्याच्या मुलीला खेळायला बोलवायला आलेल्या शेजारच्या एका ११ वर्षीय मुलीला खोटे बोलून घरात घेतले आणि तिच्यावर अत्याचार केला. जिल्हा सत्र न्यायालयासमोर त्या वकिला विरोधात भंडाऱ्यातील नागरिकांनी काळ्या फीत बांधून निषेध आंदोलन केले.
ट्रम्प यांची हमासला धमकी: ओलिसांना सोडा अन्यथा तुम्हाला मारले जाल:
ज्यांची तुम्ही हत्या केली त्यांचे मृतदेह सोपवा, नाहीतर तुमचे काम संपेल
मुंबई उच्च न्यायालयाने गुरूवारी मुंबईचे माजी पोलीस अधिकारी सचिन वाजे यांनी अँटिलिया बॉम्बस्फोट प्रकरणातील अटकेला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली, अशी माहिती बार आणि खंडपीठाने दिली.
IRS अधिकारी समीर वानखेडेंना मोठा दिलासा!
समीर वानखेडे यांचा मुंबईहून चेन्नई येथे झालेला बदली आदेश केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरणाने रद्द केला.
मे 2022 मध्ये वानखेडे यांची बदली मुंबईहून चेन्नईला करण्यात आली होती.
आष्टीचा आका सुरेश धस बोका आहे. नुसती सतीश भोसले वरती कार्यवाही करू नका तर आका सुरेश धसवर देखील कार्यवाही करा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जोपर्यंत आमदार सुरेश धस यांच्या वरती कार्यवाही होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीत ग्रामस्थ आक्रमक.
अशी भाषा त्यांनी अहमदाबादमध्ये जाऊन करावी कर्नाटकात, तामिळनाडूमध्ये, बंगालमध्ये आणि केरळमध्ये जाऊन करून दाखवावी त्याचसोबत दक्षिण भारतात अशी भाषा करून सुखरूप येऊन दाखवावं. मराठी माणूस हा सहहृदयशील आहे दिलगिरी आहे म्हणून कोणी ही याव आणि टपली मारून जाव अशी परिस्थिती झाली आहे. भाषावर प्रांत रचना झाले आणि मुंबईची गल्ली रचना करत आहेत का? आणि मग तोडा फोडा आणि राज्य करा अशा प्रकारची विकृत वृत्ती पुढे आलेले आहे. अशा प्रकारचे वृत्तीना सरकारने वेळीच ठोकले पाहिजे.