विक्रमसिंह पाचपुते हे विधानसभेत बनावट पनीर घेऊन आले आहेत. एकीकडे पनीर, तर दुसरीकडे पनीर सारखे दिसणारे अॅनॉलॉग चीज आहे. विधानसभा अध्यक्षांकडे बनावट पनीर दिले. लहान मुलांना आपण अन्न म्हणून पनीर च्या नावाखाली विष खाऊ घालत आहे. हे तेलाचे गोळे आहेत.
४०० पेक्षा जास्त मुली ‘लव्ह जिहाद’ची शिकार
त्यातील केवळ ४१ युवती परत आल्यात.
भाजपा नेते पीसी जॉर्ज हे याआधीही वादग्रस्त विधान
लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित करत त्यांचा ख्रिश्चन समाजाला इशारा
ख्रिश्चन समाजातील आई वडिलांनी त्यांच्या मुलींचं लग्न वयाच्या २४ वर्षाआधीच करण्याचा भाजपा नेते पीसी जॉर्ज यांचा सल्ला.
औरंगजेबबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकऱणी आझमी यांच्याविरोधात मुंबईत गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. आझमी यांनी सत्र न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामिनासाठी तो अर्ज केला होता. सत्र न्यायालयाने त्यांच्या अर्जाची दखल घेऊन त्यांना अटकेपासून दिलासा दिला, तसेच १२ ते १५ मार्चदरम्यान तपास अधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते त्यानुसार आझमी मरीन लाईन पोलिस स्थानकात उपस्थित राहिले आहेत
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाचा दिलासा
पोलिसांनी केलेली विनंती कोर्टाने फेटाळली
17 मार्चपासून दररोज होणार सुनावणी
प्रशांत कोरटकरला 17 मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा
स्वारगेट एसटी स्थानकात तरुणीवर बलात्कार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडे याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले.त्यावेळी त्याला 26 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
मिरजेत प्लास्टिक भंगार कारखान्याला आग लागून 15 ते 20 लाखाचे भंगार जळून खाक, अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल , आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू