उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. विधान परिषदेसाठीचे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दोन्ही नेते फडणवीसांच्या भेटीला गेले असून भेटीचे कारण अस्पष्ट आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी केली आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे पत्र देऊन घोषणाबाजी करण्यात आली. गळ्यामध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल चे रुमाल घालून हिंदुत्ववादी संघटना आल्या होत्या.
नागपूरच्या महाल परिसरात दोन गटात दगडफेक करण्यात येत आहे. काही नागरिक आणि दोन पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांचा फौज फाटा घटना स्थळी दाखल झाली असून सध्या तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून शांततेच आवाहन करण्यात येत आहे.