Lokshahi Marathi live  
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Updates live: सैफ अली खान हल्ला प्रकरणात आतापर्यंत 14 जणांची चौकशी

Team Lokshahi

शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम; राज्यव्यापी आंदोलनाची हाक

सिडको अध्यक्ष संजय शिरसाठ यांची उचल बांगडी

विजापूर आणि तेलंगाणाच्या सीमेवर पोलिसांची मोठी कारवाई

विजापूरच्या जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत सुरक्षा दलांनी आतापर्यंत 12 नक्षलवाद्यांना ठार केल्याची माहिती समोर आली आहे.

बीड: मयत सरपंच देशमुख हत्या प्रकरणात; सरपंचाचा भाऊ आणि पत्नीचा घेतला जाणार जबाब

मयत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचा आज जबाब घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयात 164 प्रमाणे संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि पत्नी अश्विनी देशमुख यांचा जबाब घेतला जाणार आहे त्यातील धनंजय यांचा आज जबाब घेतला जाणार आहे त्यानंतर संतोष देशमुख यांच्या पत्नीचा देखील जबाब होणार आहे.

धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात धोरण कशासाठी बदलले; हायकोर्टाने राज्य सरकारला मागितले स्पष्टीकरण

२०२३ मध्ये राज्य सरकारला कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात बदल करण्याची गरज का पडली, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केली आहे. यासंदर्भात राजेंद्र मात्रे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेतील आरोपात तथ्य असल्याचे निरीक्षण नोंदवीत न्या. नितीन सांबरे आणि न्या. वृषाली जोशी यांच्या खंडपीठाने सरकारला दोन आठवड्यांत स्पष्टीकरण मागितले आहे. कृषी विभागाने ५ डिसेंबर २०१६ रोजी कृषी साहित्य खरेदीसाठी डीबीटी योजना सुरू केली होती. २०२३ मध्ये मुंडे हे कृषीमंत्री असताना यात बदल झाला.

सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी पोलिस अॅक्शन मोडवर 

उज्ज्वल निकम यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

उद्यापासून दोन दिवस राष्ट्रवादी पक्षाचं शिर्डीत अधिवेशन होणार

पाकचे माजी पंतप्रधान इमरान खानला 14 वर्षांचा तुरुंगवास

पाकचे माजी पंतप्रधान इमरान खानला 14 वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात आला आहे. इमरान खानच्या पत्नी बुशरा बीबी यांनाही 7 वर्षांची शिक्षा सुनवण्यात आली आहे. अल-कादिर ट्रस्टमधील भ्रष्टाचार प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पुणे- नाशिक महामार्गावर भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू

पुणे- नाशिक महामार्गावर भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या मालेगाव दौऱ्यावर

भाजप नेते किरीट सोमय्या मालेगाव दौऱ्यावर आहेत. रोहिंग्या प्रकरणात अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. मालेगावातील रोहिंग्या प्रकरणात SIT गठीत केल्याची माहिती मिळत आहे.

तर माझा भाऊ वाचला असता- धनंजय देशमुखांची खंत

त्याचवेळी पोलीस कारवाई झाली असती, तर माझा भाऊ वाचला असता अशी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी खंत व्यक्त केली आहे.

लीलावती हॉस्पिटलमध्ये खासदार संजय दिना पाटील दाखल झालेले आहेत

सरकारने आम्हाला माती खायला लावू नये - मुनगंटीवारांचा सरकारला इशारा

चंद्रपूर शहराला लागून असलेल्या दुर्गापूर गावातून वीज केंद्राला रोप वे च्या माध्यमातून कोळसा पुरवला जातो. हा रोप वे चाळीस वर्षे जुना आहे. त्यामुळे कोळशाची धूळ आणि आवाज याचा त्रास येथील लोकांना सहन करावा लागतो आहे. चंद्रपूरच्या जनतेने वीज निर्मितीसाठी सहकार्य करायचे आणि सरकारने आम्हाला माती खायला लावायची, असे चालणार नाही, असा खरमरीत इशारा भाजप नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्याच सरकारला दिला.

कृषी साहित्य खरेदीत घोटाळ्याचा आरोप; धनंजय मुंडे अडचणीत?

शेतकऱ्यांसाठीच्या कृषी साहित्य खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आल्याने कृषीमंत्री धनंजय मुंडे अडचणीत येण्याची शक्यता आहे. डीबीटी योजना का बंद केली? असा नागपूर खंडपीठामध्ये दाखल याचिकेवर सरकारला सवाल विचारण्यात आला आहे.

सैफ अली खान हल्ला प्रकरणी पोलिसांनी करिना कपूरचा जबाब नोंदवला

सैफ अली खान हल्ला प्रकरणी पोलिसांनी करिना कपूरचा जबाब नोंदवला आहे. हल्ला झाला त्यावेळी घरामध्ये नक्की कोण कोण होतं. या संदर्भात पोलिसांनी करीना कपूर हिला विचारणा केली. यावेळी करीनाने हल्ल्याच्या वेळी घडलेली संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली.

सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो समोर

सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो समोर आला आहे. वांद्रे स्टेशनवर हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ओळख लपवण्यासाठी आरोपीने कपडे बदलले होते असल्याची माहिती समोर आली आहे.

सैफ अली खान हल्ला प्रकरणात आतापर्यंत 14 जणांची चौकशी

सैफ अली खान हल्ला प्रकरणात आतापर्यंत 14 जणांची चौकशी करण्यात आली आहे. सैफच्या घरात काम करणारे सुरक्षा रक्षक, नोकर सर्वांची चौकशी करण्यात आली आहे. घटनेच्या दिवशी सर्व व्यक्ती कुठे होती? पोलिसांनी माहिती घेतली आहे. सर्व व्यक्तींचे पोलिसांनी कॉल रेकॉर्ड घेतल्याची माहिती मिळत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai Mega Block : मुंबईकरांनो! आज लोकलचं वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा; तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

Wadala Vitthal Mandir : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विठुरायाच्या चरणी नतमस्तक; प्रति पंढरपुरात पांडुरंगाची केली महापूजा

Latest Marathi News Update live : कोकण किनारपट्टीला आज ऑरेंज अलर्ट, ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

Ashadi Ekadashi 2025 : शेतकरी, कष्टकरी, सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना