दिल्लीतील नवीन संसद भवनाप्रमाणे महाराष्ट्रातही नवीन विधानभवन तयार करणार...राहुल नार्वेकरांची लोकशाही मराठीला माहिती...
ओडिशातून गांजा घेऊन येणाऱ्या दोन तस्करांना अटक करण्यात आली. अमरावतीच्या गुन्हे शाखा युनिटकडून अटक करण्यात आली. दोघांकडून 26 किलो गांजा जप्त करण्यात आला.
'महादेव बेटींग अॅप'ची 388 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. मुंबई, मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
अमेरिका आणि युरोप खंडातील अनेक देशांमध्ये बॅलेट पेपरवर मतदान होतं. देशामध्ये निवडणूक पद्धतीत बदल केला पाहिजे. शरद पवार यांनी मागणी केली आहे.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर EVMच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं. सदाभाऊ खोत आणि गोपिचंद पडळकर यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं.
अभिजीत बिचुकले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल केला आहे. "मोदींनी रामाला स्मरून सांगावं की EVM मध्ये घोटाळा नाही. शरद पवार यांचा एवढा दारूण पराभव महाराष्ट्रात होऊ शकत नाही. बिचुकले यांनी पुढे म्हटलं की, शरद पवार यांनी यावर ठोस पाऊल उचलावं आणि मी त्यांच्या मागे उभा आहे.
नव्या मंत्र्यांना शिपाई आणि चोपदारांची कमतरता भासणार आहे, असा दावा सूत्रांनी केला आहे. सामान्य प्रशासन विभागात फक्त 30 शिपाई कार्यरत आहेत, अशी माहिती समोर आली आहे. 1998 पासून शिपाई पदाची भरती झालेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे नव्या मंत्र्यांना शिपाई आणि चोपदारांच्या कामकाजासाठी अडचणी येऊ शकतात.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मराठवाड्यातील दुष्काळावर चर्चा केली. त्याचबरोबर, मराठवाड्यातून होणाऱ्या स्थलांतरावरही चर्चा झाली. पंकजा मुंडे यांनी या समस्यांवर उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगितले.
सुषमा अंधारेंना पाटण कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात अंधारेंना दिलासा मिळाला आहे. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी शंभूराज देसाईंच्या बदनामी प्रकरणी दिलासा मिळाला आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील आठवड्यात होणार आहे. मंत्र्यांच्या संख्येवरून महायुतीत चर्चा सुरू आहे. मात्र, अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. महायुतीत कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं मिळतील यावर चर्चा सुरू आहे.
पुणे जिल्ह्यातील महाविकास आघाडी (मविआ) चे पराभूत उमेदवार ईव्हीएमविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहेत. मविआचे सर्व पराभूत उमेदवार उद्या दिल्लीमध्ये दाखल होणार असून, मंगळवारी ते सुप्रीम कोर्टाच्या वकिलांची भेट घेणार आहेत. या भेटीच्या दरम्यान, ईव्हीएमविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष आपल्या संघटना मजबूत करण्यासाठी सक्रिय आहे. या जिल्ह्यातील 6 पैकी 5 जागांवर काँग्रेसचा पराभव झाला होता. यामुळे काँग्रेस पक्षाने पुढील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली आहे. काँग्रेसने बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचा ठराव मांडला आहे.