मविआ EVM आणि निकालाबाबात एकत्र सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करणार आहे. शुक्रवारपर्यंत सुप्रिम कोर्टात एकत्र याचिका दाखल करणार असल्याचं प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या पराभूत उमेदवारांची बैठक संपली. बैठकीत मविआ EVM आणि निकालाबाबात एकत्र सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बांगलादेशने 15 सेकंदसाठी सीमा खुली करावी, त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असं आव्हान नवनीत राणा यांनी सरकारला केलं आहे. बांगलादेशमध्ये हिंदू सुरक्षित नसल्याचं म्हणत राणा आक्रमक झाल्या आहेत.
'बांगलादेशला संपवायला मोदींना 48 तास लागतील. भारताला सुरक्षित ठेवण्यासाठी जागरुक राहा असं वक्तव्य निलेश राणे यांनी केलं आहे. हिंदूंच्या मिरवणुकींवर महाराष्ट्रात दगडफेक होते. गोहत्या करणाऱ्यांना सोडणार नसल्याचा निलेश राणे यांनी इशारा दिला आहे.
आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि शरद पवारांची यांची दिल्लीत भेट झाली आहे. इंडिया आघाडीच्या कामकाजावर चर्चा झाली आहे. केजरीवाल यांनी शरद पवारांचं स्वागत केलं आहे.
- महायुतीचे समन्वयक आणि विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून, मनीष निकोसे नावाच्या इसमाने आमदार लाड यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ देखील केली आहे.
जालन्यातील मंठा शहर बंदची हाक देण्यात आलीय, बांगलादेश मध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज मंठा शहर कडकडीत बंद पाळण्यात येत असून,या बंदला व्यापारी वर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळतोय..यावेळी मंठा शहरात सकल हिंदू समाजाकडून निषेध रॅली काढत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
अमरावतीमध्ये आज हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. बांगलादेशातील हिंदुंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. हिंदुत्वासाठी मोर्चात सहभागी होण्याचं नवनीत राणांनी आवाहन केलं आहे. संध्याकाळी 4 वाजता अमरावती शहरात मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.
उद्योगपती गौतम अदानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. गौतम अदानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री झाल्याबद्दल अदानींनी फडणवीसांचं अभिनंदन केलं आहे. अभिनंदनपर भेटीनंतर अदानी सागर निवासस्थानावरून रवाना झाले आहेत.
कुर्ल्यातील अपघातग्रस्त बेस्ट बस ऑलेक्ट्रा कंपनीची असल्याचं समोर आलं आहे. 'बेस्ट'चा ऑलेक्ट्रा कंपनीसोबत 2,400 बसेसचा करार झाला होता. ऑलेक्ट्राच्या भारतातील बसेस चीनी बनावटीच्या असल्याची माहिती समोर आली आहे. 'ऑलेक्ट्रा'चा चीनमधील कंपनी BYD मोटर्ससोबत करार झाला होता.
कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यातील मंदिर-मस्जिदबाबतचा निकाल लागला आहे. दुर्गाडी किल्ल्यातील जागा मंदिरच, कल्याण न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. 1971 सालापासून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे मंदिर की मस्जिद यावर सुरू होती. हिंदू संघटनांनी न्यायालयाच्या निकालाचं स्वागत केलं.
शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला दाखल झाले आहेत. हेमंत पाटील सागर निवासस्थानी दाखल झाले आहेत. शिवसेनेकडून हेमंत पाटील हे मंत्री पदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे.