लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Updates live: नव्या वर्षात सलून, ब्युटी पार्लरच्या दरांमध्ये वाढ

Team Lokshahi

सातपुडा गारठला! सातपुडा पर्वतरांगात पसरली धुक्याची चादर...

नंदुरबार जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला असून सातपुडा पर्वतरांगात दव बिंदू गोठायला सुरुवात झाली आहे. तापमानाचा पारा घसरल्याने अनेक ठिकाणी बर्फाची चादर पसरली आहे. सातपुड्याच्या कुशीतील डाब परिसर, धडगाव परिसर आणि तोरणमाळ येथे तापमानांचा निच्चांक गाठल्यामुळे धुक्याची चादर पसरून ठिकठिकाणी बर्फ जमायला सुरुवात झाली आहे..

पडळकरांनी केली शरद पवारांवर एकेरी भाषेत टीका

भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी मारकडवाडीमध्ये शरद पवारांवर एकेरी भाषेत टीका केली. त्यावर बोलताना भाजपला पडखळकरांची शरदपवारांवर टीका मान्य नसल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत. त्याचबरोबर ती पडखळकरांची वैयक्तिक टीका असल्याचंही सांगत त्यांनी याबाबत दखल घेणार असल्याचं म्हटलंय.

मुख्यमंत्री सहायता निधी विभाग प्रमुख पदी रामेश्वर नाईक यांची नियुक्ती

मुख्यमंत्री सहायता निधी विभाग प्रमुख पदी आरोग्यदूत रामेश्वर नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशींनी नियुक्ती पत्र दिले. तसेच रामेश्वर नाईक यांकडे उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची जबाबदारी होती, आता धर्मादाय रुग्णालयात गरिब रुग्णांना मदत मिळवून देण्यात नाईक यांचे मोठे काम आहे.

पोहरादेवीच्या महंतांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट...

नवीन मंत्रिमंडळात संजय राठोड यांना पुन्हा एकदा मंत्रीपद मिळावं त्यासाठी पोहरादेवींच्या महंतांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणे केले आहे. तेव्हा संजय राठोड यांची पुन्हा एकदा मंत्रिमंडळात वर्णी लागावी यासाठी पोहरादेवीच्या महंतांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेतली आहे.

छेडछाडीला कंटाळून महाविद्यालयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या..

छेडछाडीला कंटाळून महाविद्यालयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जालना जिल्ह्यातील अंबड येथे घडली आहे. मृत मुलीच्या नातेवाईकांकडून अंबड तहसील कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं आहे. आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मृत मुलीच्या नातेवाईकांची मागणी आहे तर या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दूध दरवाढीसाठी 23 डिसेंबरपासून सातारा जिल्ह्यात बेमुदत आंदोलन

दुधाला योग्य दर न मिळाल्यामुळे शेतकरी संघटनेनं आंदोलनाचा इशारा दिलाय. चारा महाग झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा खर्चही वसूल होण्यास अडचण येत आहे. त्या्मुळे प्रशासनाने दूध दरात वाढ करावी,अन्यथा बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा दिलाय.

परभणीतील घटनेच्या निषेधार्थ वसमतमध्ये आंबेडकरी जनता आक्रमक

परभणीच्या घटनेच्या निषेधार्थ हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत मध्ये सुद्धा आंबेडकरी जनता आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले आहे. घटनेच्या निषेधार्थ आज वसमत शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

ईव्हीएमविरोधात आता सर्वोच्च न्यायालयात लढा

ईव्हीएमविरोधात आता सर्वोच्च न्यायालयात लढा

- मविआ सर्वोच्च न्यायालयात जाणार

- शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी विरोधकांची बैठक

नव्या वर्षात केशकर्तनालय, सलून आणि ब्युटी पार्लरच्या दरांमध्ये वाढ

नव्या वर्षात सलून, ब्युटी पार्लरच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. दाढी कटींगसह ब्युटी पार्लरच्या दरांमध्ये 25 ते 30 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र सलुन ब्युटी पार्लर असोसिएशेने निर्णय घेतला आहे. सलुनसाठी लागणाऱ्या वस्तू आणि जीएसटी दरांमुळे दरवाढ केल्याचे असोसिएशनचं म्हणणं आहे.

'अमरावतीत राहणाऱ्या बांगलादेशींना हाकलून लावा' सुनील खराटे

अमरावतीत राहणाऱ्या बांगलादेशींना हाकलून लावा अन्यथा शिवसेना स्टाईल चोप दिला जाईल असा इशारा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी दिला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप