'केंद्रात मंत्रिपद आणि छोट्या राज्याचं राज्यपालपद द्या' असा प्रस्ताव देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीने महायुतीकडे मांडला आहे अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. नागालँड किंवा अरुणाचल प्रदेशात राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यामुळे तिथले राज्यपाल पद मिळावे अशी मागणी केल्याची माहिती मिळाली आहे.
एकनाथ शिंदे यांना ७ कॅबिनेट तर ३ राज्यमंत्री पदे दिली जाणार अशी माहिती मिळाली आहे. गुलाबराव पाटील, दादा भुसे, शंभूराज देसाई, उदय सामंत, यांच्यासह मंगेश कुडाळकर, भरत गोगावले, राजेश क्षिरसागर अर्जुन, खोतकर, संजय शिरसाट हे संभाव्य मंत्री असण्याची शक्यता.
उपराष्ट्रपती जगदीप धनखर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यसभा एलओपी मल्लिकार्जुन खरगे, लोकसभा लोपी राहुल गांधी, केंद्रीय एचएम अमित शहा, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा, किरेन रिजिजू आणि इतर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी संसद भवन परिसरात दाखल.
दिल्लीतील 4 शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे. शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाले असून अद्याप काहीही संशयास्पद आढळले नसल्याची दिल्ली पोलिसांची माहिती आहे.
या परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यातूनही 5122 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, तर विद्यापीठांतर्गत नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्र असणार आहेत ,यातील सर्वाधिक आठ केंद्र हे नांदेड जिल्ह्यातील असतील, परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी 28 डिसेंबर रोजी परीक्षेला वेळेवर उपस्थित राहण्याच आवाहन विद्यापीठ प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
उडाण योजनेंतर्गत २०२४ मध्ये पुण्यातून १२ नवीन ठिकाणी विमानसेवा सुरू करण्यात आली. यामुळे विमान प्रवाशांना देशांतर्गत प्रवासासाठी सोयीचे झाले असून, यातून वर्षभरात १ हजार १८० विमान उड्डाणे झाली आहेत. त्यातून ६९ हजार ६४६ प्रवाशांनी प्रवास केला आहे.यामध्ये भावनगर, सिंधुदुर्ग, नांदेड, जळगाव, किशनघर आणि प्रयागराज येथे सेवा सुरू आहे.
पुण्यातील ९१ बांधकाम प्रकल्पांचे काम थांबवले. बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी वारंवार सूचना देऊनही महापालिकेच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले. महापालिकेच्या बांधकाम विभागाने कडक पावले उचलले. एका दिवसात शहरातील १५८ बांधकाम प्रकल्पांना नोटिसा ते त्यातील ९१ बांधकामांचे थेट कामच थांबवले असून महापालिकेच्या या कारवाईमुळे बांधकाम क्षेत्रात खळबळ माजली आहे.
राज्यात रविवारपासूनपुन्हा ढगाळ वातावरण, तर थंडी कमी होण्याचा अंदाज वर्तावला जात आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ढगाळ वातावरण होणार अशी हवामान विभागाने माहिती दिली.
तब्बल ७० वर्षांनंतर राजधानी दिल्लीमध्ये फेब्रुवारी २०२५मध्ये होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अधिकृतरीत्या निमंत्रित करण्यात आले आहे. पंतप्रधानांनी हे निमंत्रण स्वीकारल्यास सुरक्षेच्या दृष्टीने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विज्ञान भवनात उद्घाटन सोहळा करण्याचे नियोजन आहे.
प्रार्थना स्थळांबाबत नवी याचिका दाखल करून घेण्यास किंवा सध्या दाखल याचिकांवर सर्वेक्षणासह कोणतेही अंतरिम किंवा अंतिम आदेश देण्यास देशभरातील न्यायालयांना सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे.
भारताच्या गुकेश दोम्माराजूने बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीमध्ये चीनच्या डिंग लिरेनवर १४व्या आणि शेवटच्या डावात थरारक मात केली आणि १८व्या वर्षी बुद्धिबळ इतिहासातील सर्वांत युवा जगज्जेता बनण्याचा मान पटकावला. महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदनंतरचा गुकेश हा दुसराच भारतीय जगज्जेता ठरला.
पुणे वाघोलीत आर्यन बारमध्ये दारू पिल्यानंतर वादावादी झाली. तसेच तरुणाने रस्त्यावर गोळीबार केला. गोळीबार करणारा विशाल कोलते पोलिसांच्या ताब्यात आहे. बकोरी रस्त्यावर असलेल्या बारमध्ये हा थरार झाला आहे. बारमध्ये व्यसनमुक्तीची गाडी आल्यानंतर जमीनीवर फायरींंग केली.
नागपूर आज पासुन खासदार सांस्कृतिक महोत्सवास सुरूवात. अभिनेत्री काजोल यांच्या हस्ते कार्यक्रमांचे उद्घाटन पार पडणार असून यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहतील, सोबत मुख्यमंत्री देवेंद फडणवीस ,चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहण्याची शक्यता
14 डिसेंबरला होणाऱ्या शपथविधीवर भाजप ठाम असल्याची सुत्रांची माहिती आहे. 'महायुतीच्या पक्षातील किती जण शपथ घेतील हे मित्रपक्षांनी ठरवून कळवावं',आमच्या मंत्र्यांचा 14 तारखेला शपथविधी करून घेऊ, असा भाजपकडून मित्रपक्षांना स्पष्ट संकेत देण्यात आला आहे.