अजित पवारांना अर्थमंत्रिपद मिळण्याची शक्यता धूसर असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या भाजपकडे राहणार का सवाल उपस्थित होत आहे. वळसे पाटील, हसन मुश्रीफांनाही पुन्हा मंत्रिपद मिळणं अवघड असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
14 डिसेंबरला होणाऱ्या शपथविधीवर भाजप ठाम असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 'महायुतीच्या पक्षातील किती जण शपथ घेतील हे मित्रपक्षांनी ठरवून कळवावं. आमच्या मंत्र्यांचा 14 तारखेला शपथविधी करून घेऊ असं भाजपकडून सांगण्यात येत आहे. भाजपकडून मित्रपक्षांना स्पष्ट संकेत देण्यात येत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
देशात रस्ते अपघातांतील मृत्यूंच्या संख्येत वाढ झाली आहे. वर्षभरात 4 लाख 80 हजार अपघात, 1 लाख 78 हजार मृत्यू झाले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत माहिती दिली आहे. अपघातांमधील 60 टक्के मृत्यू 18 ते 34 वयोगटातील आहेत.
परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना घटनेच्या निषेधार्थ दलित संघटनांकडून आज नांदगाव बंदची हाक देण्यात आली आहे. संपूर्ण नांदगाव शहरात कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. शहरातील सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी जिल्ह्यात आज बंदची हाक देण्यात आली आहे. मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे नागरिक आक्रमक झाले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आतापर्यंत 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्य सूत्रधाराला अटक करून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
राज्यातील काँग्रेसमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. 17 डिसेंबरला नागपुरात काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला हे काँग्रेसचे आमदार आणि पराभूत उमेदवार यांच्याशी संवाद साधणार आहेत. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने ही घेणार बैठक होणार आहे. या बैठकीत महाराष्ट्र आणि मुंबई अध्यक्ष बदलावरही चर्चा होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नव्या टीमच्या बांधणीला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव म्हणून अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मेट्रोवूमन म्हणून कारकीर्द गाजवलेल्या अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून श्रीकर परदेशी यांची नेमणूक करण्यात आली होती.
अल्लू अर्जुनला 'पुष्पा 2' चित्रपटाच्या प्रीमिअर दरम्यान चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे अटक करण्यात आली आहे. या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. न्यायालयाने अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
भाजपकडून राज्यसभेच्या सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे. 16 आणि 17 डिसेंबरला सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी करण्यात आला आहे. राज्यसभेतील भाजपच्या सर्व खासदारांना तीन ओळींचा व्हीप जारी करण्यात आला आहे
अल्लू अर्जुनला 'पुष्पा 2' चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान चेंगराचेंगरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. या प्रकरणी कारवाई करत न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली होती. मात्र, अखेर अल्लू अर्जुनला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे 'सागर' बंगल्यावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. चंद्रशेखर बावनकुळे सागर बंगल्यावर पोहचले आहेत.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सागर बांगल्यावरून निघाले असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्यात अर्धा तास चर्चा झाल्याचं कळतंय.
विवेक फणसाळकर सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. मुंबई पोलीस आयुक्त सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. सागर बंगल्यावर भेटीगाठींचा सिलसिला वाढला आहे.
राजू शेट्टी यांनी अमित शाह यांना एक पत्र लिहून उसाला प्रतिटन 3,700 रुपये भाव मिळावा अशी मागणी केली आहे. यावेळी, त्यांनी साखर कारखानदार आणि साखर व्यापाऱ्यांवर साखरेचे दर पाडल्याचा आरोप केला. शेट्टी यांनी साखर कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा महायुतीकडे नवा प्रस्ताव दिला आहे. केंद्रात मंत्रिपद आणि छोट्या राज्याचं राज्यपालपदाची मागणी केली आहे. नागालँड किंवा अरुणाचल प्रदेशातात राज्यपालपदासाठी आग्रही असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे.
चंद्रकांत पाटील आणि प्रसाद लाड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी सागर बंगल्यावर पोहोचले आहेत.
मंत्रिमंडळ विस्ताराआधी घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला शिंदे दाखल झाले आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात ४० मिनिटे चर्चा झाली. या चर्चेत दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक संवाद झाला असून, रविवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारावर त्यांचे एकमत झाले आहे. यावेळी शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या खात्यांवर चर्चा झाली आणि शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नावाची यादी जवळपास निश्चित झाली आहे. सूत्रांच्या मते, उद्या शिंदे यांच्याकडून या मंत्र्यांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे.