मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन,राम शिंदे अहिल्यानगर दौऱ्यावर..पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मुलाच्या लग्न समारंभाला राहणार उपस्थित... दुपारी दीड वाजता होणार आगमन..
राष्ट्रीय सेवा सेवक संघाचे संघ चालक मोहन भागवत यांनी अमरावतीच्या महानुभव पंथाच्या एका कार्यक्रमात महत्त्वाचं वक्तव्य केलं,थोडासा ज्ञानाने फुगलेला त्या माणसाला ब्रह्मदेव सुद्धा समजू शकत नाही,कारण धर्म हे जिगरीच काम आहे, तर धर्म समजावा लागतो,जगामध्ये धर्माच्या नावाखाली जितके अत्याचार झाले ते या चुकीच्या समजुतीमुळे झाले असं महत्त्वाचं वक्तव्य मोहन भागवत यांनी केले, तर म्हणून धर्म समजावण्याचे काम करणारे संप्रदाय असावे लागतात असेही मोहन भागवत म्हणाले.
उद्योग मंत्री झाल्यानंतर उदय सामंत पहिल्यांदाच पाली हॅलिपॅडवर तर ढोलताशे बंजी सहित उद्योग मंत्री उदय सामंत याच्या स्वागतासाठी रत्नागिरीकर उत्सुक कार्यकर्ते दाखल झाले आहेत.
पश्चिम उपनगरात नवीन गृहनिर्माण प्रकल्पांचा धडाका लागला आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात नवीन गृहनिर्माण प्रकल्पांचा धडाका. 6 महिन्यात 200 पेक्षा जास्त नव्या गृहनिर्माण प्रकल्पांची उभारणी.
हिंगोली शहरातील निंबाळा मक्ता भागात असलेल्या कापूस खरेदी केंद्रात कापूस टाकण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र 29 डिसेंबर बंद असणार आहे, हिंगोली शहरात 9 नोव्हेंबर पासून सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे या केंद्रात 16 हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे मात्र या केंद्रामध्ये आता कापूस टाकण्यासाठी जागा शिल्लक नाही त्यामुळे 29 डिसेंबर पर्यंत जिल्ह्यातील कापूस खरेदी बंद असणार आहे...
पंजाबमधील मोहाली येथे शनिवारी रात्री एक बहुमजली इमारत कोसळली. यामध्ये 3 मुले आणि 2 मुली आहेत. एका मुलीला बाहेर काढण्यात आले असून तिला रुग्णालयात दाखल केले आहे. तिच्या प्रकृतीबाबत कोणतीही औपचारिक माहिती मिळालेली नाही. एनडीआरएफसह लष्कराचे पथक घटनास्थळी बचावकार्य करत आहेत.
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा येथील लष्कराच्या चौकीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये 16 पाकिस्तानी सैनिक मारले गेले तर 5 जखमी झाले. अफगाणिस्तान सीमेपासून 40 किमी अंतरावर असलेल्या माकिनमध्ये ही घटना घडली. 2 तास हल्ला सुरू.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे खातेवाटपात चांगली खाती पदरात पडल्याचं चित्र आहे. नगरविकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम खाती खुद्द शिंदेंच्या वाट्याला आली आहेत. तर शालेय शिक्षणमंत्रिपद सेनेच्या दादा भुसेंकडे गेले आहेत. तर उद्योग खातं उदय सामंतांकडे गेल्यानं सेनेची ताकद पुन्हा वाढली आहे. सेनेच्या प्रताप सरनाईकांकडे परिवहन आणि वाहतूक खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेचं पारडं जड असल्याचं चित्र आहे.
हिवाळी आधिवेशनाची सांगता असून आता अर्धसंकल्पीय अधिवेशनाकडे लक्ष लागले आहे. 3 मार्च 2025 रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन घेण्याची राहुल नार्वेकरांकडून राज्यपालांना शिफारस करण्यात येईल.
या बैठकीमध्ये नवीन सरकारला ओबीसींच्या प्रमुख मागण्या सादर करणे व ओबीसी नेते छगन भुजबळ साहेबांना नव्या मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे ओबीसी समाजातील असंतोष विषयावर चर्चा होऊन सायंकाळी 4.30 वाजता ओबीसीचे नेते छगन भुजबळ साहेबांशी चर्चा करण्यासाठी सिद्धगड निवासस्थानी बैठक होऊन पुढील निर्णय ठरविण्यात येईल.
मुंबई सह सर्व उपनगरात हवेच्या गुणवत्तेत प्रचंड घसरण. हवेत वाढलं धुराचं प्रमाण. मुंबईत अनेक ठिकाणी घटली हवेची दृश्यमानता. अनेक ठिकाणी श्वास घेताना जळजळ होण्याचे प्रकार समोर. हवेची गुणवत्ता घसरल्याने आरोग्यच्या नव्या आव्हानाचं संकट. वाढत्या थंडीचा परिणाम?
मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज अतुल सावे पहिल्यांदा छत्रपती संभाजी नगरात दाखल होत आहेत तर संजय शिरसाट आज सांयकाळच्या सुमारास दाखल झाले असून आज जोरदार शक्ती प्रदर्शनाची शक्यता...
अशा माणसांना चोपले पाहिजे. तुम्ही महाराष्ट्रात राहाल इथेच पैसे कमवाल, इथे मोठे व्हाल आणि मराठी माणसालाच अपशब्द वापराल, हे सहन केले जाणार नाही, अशांना चोपले पाहिजे.
भाजप खासदार बन्सुरी स्वराज म्हणतात, "भाजप हा अतिशय लोकशाहीवादी पक्ष आहे. आमचा जाहीरनामा दिल्लीच्या लोकांच्या आशा-आकांक्षा प्रतिबिंबित करायचा आहे... इथल्या रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे... दिल्लीला आता भाजप सरकारची गरज आहे. .."
दिल्लीत होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहीत्य संमलेनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. साहित्य संमलेन संयोजन समितीची माहिती आहे. तर यंदाचे साहित्य संमलेन दिल्लीत होणार आहे.