उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या भेटीला दाखल झाले आहेत. दोघांमध्ये एक तास चर्चा झाल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे.
पालकमंत्री पदासाठी नववर्षाचा मुहूर्त ठरला आहे. पालकमंत्री पदाचा निर्णय एक जानेवारीनंतर होणार असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे.
उद्धव ठाकरे जानेवारीच्या पहिला आठवड्यात बीड आणि परभणी दौऱ्यावर जाणार आहेत. सोमनाथ सूर्यवंशी आणि देशमुख कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार आहेत.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. CIDचे अप्पर पोलीस महासंचालक बीडमध्ये दाखल झाले आहेत.
अंजली दमानियांकडून आणखी एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा एकत्र प्रवासाचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. धनंजय मुंडेंच्या हातात पिस्तुल असल्याची दमानिया यांनी पोस्ट केली आहे.
मोहिनी वाघ यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी
लष्कर कोर्टाने ३० डिसेंबरपर्यंत सुनावली कोठडी
धुळ्यातल्या वरखेडी रोडवरील कचरा डेपोला दुपारच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. घडलेल्या घटनेची माहिती मनपाच्या अग्निशामक दलाला मिळताच अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी बंबासह जात आग आटोक्यात आणली आहे. नेमकी आग कशामुळे लागली हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.
कोकणातील बहुचर्चित रिफायनरी प्रकल्पाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र सावध पावित्रा घेतलाय. रिफायनरी प्रकल्प ग्रीन रिफायनरी असेल असे सांगण्यात आले होते. याशिवाय सुरूवातीला मोठ्या प्रमाणात गुंतवणूकीची अपेक्षा होती तेवढी गुंतवणूक येते का? ते पाहावं लागेल.
देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. सूत्रांच्या हवाल्याने पीटीआयने हे वृत्त दिले आहे.
कल्याण अत्याचार प्रकरणात ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा
अत्याचार करणाऱ्या आरोपीवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी
ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून फडणवीसांविरोधात घोषणाबाजी