अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक आहे. ब्लॉक मुख्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर घेण्यात येणार असून रविवारी प्रवासासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांचा 'खोळंबा' होणार आहे. हा ब्लॉक सकाळी ११ ते दुपारी ३:३० या कालावधीत अप आणि डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पाकच्या काही भागांमध्ये अफगाणिस्तानच्या लष्करानेही हल्ले केल्याचे अफगाण संरक्षण मंत्रालयाने शनिवारी म्हटले. मात्र पाकिस्तानचे किती नुकसान तसेच जीवितहानी झाली याचा तपशील उघड केला नाही.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची प्रमुख उपस्थिती असमार आहे. भाजपचे १२ जानेवारीला शिर्डी येथे प्रदेश अधिवेशन होणार आहे. अधिवेशनात रवींद्र चव्हाण यांच्या नावावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
27 वर्षीय महिला शिक्षकाने 17 वर्षे विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केला. सतरा वर्षे विद्यार्थी हा पुण्यातील गंजपेठ येथील एका नामांकित शाळेत दहावी वीत शिकायला आहे.. याच शाळेतील महिला शिक्षिका या विद्यार्थ्याला प्रेमाचं भुरळ काढून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला या प्रकरणी आरोपी महिला शिक्षिका हिच्या विरोधात खडक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
संभाजीनगरमधील पाणीपुरवठ्यावरुन खासदार संदीपान भुमरे आणि मंत्री अतुल सावे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलंय. पैठण ते छत्रपती संभाजीनगर रोड आणि शहर पाणीपुरवठा योजना या दोन्ही प्रकल्पांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि नॅशनल हायवे अॅथॉरिटी ऑफ इंडियाने थट्टा चालविली आहे का, असा संतप्त सवाल जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समितीच्या बैठकीत खासदार संदीपान भुमरे आणि अतुल सावे यांनी केलाय.
बीड जिल्ह्यात 16 गुन्हे नोंद असलेल्याकडे शस्त्र परवाना असल्याचे समोर आले होते. शिवाय जिल्ह्यातील 260 जणांवर गुन्हा दाखल असून त्यांचा परवाना रद्द करण्याबाबत पोलीस प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. मात्र जिल्हा प्रशासनाकडून हे परवाने रद्द करण्यासाठी चालढकल केली जात होती. अखेर 26 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील गुन्हे नोंद असलेल्या तब्बल 260 जणांना नोटीस देण्यात आलीय. त्यामुळे हे शस्त्र परवाने रद्द होणार असल्याचे दिसत आहे.
बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांचे विरोधात केल्याने गुन्हा दाखल केला आहे. रूपाली पाटील यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भातील वादग्रस्त चाट रुपाली पाटील यांनी ट्विट केल होत.
मुंबईच्या महालक्षी इथल्या हिरा पन्ना परिसरात आग लागल्याची घटना. हिरा पन्ना परिसरात असलेला एका गोडाऊनला आग. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या व वॉटर टँकर चार दाखल. शॉर्टसर्किट मुळे आग लागली असल्याची प्राथमिक माहिती.
अंजली दमानिया यांनी फरार आरोपीच्या संदर्भात जो मृत्यूचा दावा केला आहे, त्याचे स्पष्टीकरण करण्याची नोटीस द्वारे सूचना देण्यात आली आहे. बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांची नोटीस देण्यात आली आहे. ज्या मोबाईल नंबरवरून व्हॉइस मेसेज आलेत तो मोबाईप नंबर, व्हॉइस मेसेज, इतर माहिती आणि पुरावे देण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.
बारामती ते इंदापूर मार्गे बार्शीकडे निघालेल्या बस प्रवासामध्ये अनोळखी युवकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला आहे. रमेश सुब्राव बनसोडे नामक आरोपीला बार्शी शहर पोलिसांच्या ताब्यात घेतल गेल आहे.
भगवा उंचीवर फडकवलाय. भारतीय लष्कराने पूर्व लडाखमध्ये भारत चीन सीमेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारला असून नुकतेच या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. हा पुतळा चीनबरोबरच्या सीमेवरील वास्तविक नियंत्रण रेषेच्या जवळ पँगॉन्ग तलावाच्या किनार्यावर १४,३०० फुट उंचीवर उभारण्यात आला आहे.
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात बुमराहने विकेट्सचं द्विशतक पूर्ण करत भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवलं आहे. जसप्रीत बुमराहने दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेडला आऊट करून ही खास कामगिरी केली. कसोटी क्रिकेटच्या 148 वर्षांच्या इतिहासात कोणत्याही गोलंदाजाला जे जमले नाही ते एका भारतीय फलंदाजाने केलं आहे. कसोटीत 20 पेक्षा कमी सरासरीने 200 बळी घेणारा बुमराह हा जगातील पहिला गोलंदाज आहे.
महाराष्ट्रातील यशानंतर राष्ट्रवादीचं मिशन दिल्ली. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.