संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींचं बँक खातं गोठवलं. वाल्मिक कराडचही बॅंक खातं गोठवण्यात आल्याची माहिती LOKशाही मराठीला सुत्रांनी दिली आहे.
वाल्मिक कराडची नार्को टेस्ट करा, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या....बीड प्रकरणावरून विजय वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
21.59 कोटी लांबवणाऱ्या हर्षकुमार क्षीरसागरने संभाजीनगरच्या क्रीडा अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. क्रीडा उपसंचालकांसह बँक कर्मचाऱ्यांच्या सांगण्यावरूनच निधी लंपास केल्याचं आरोपीने पोलिसांना पत्र दिलं आहे.
प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. सागर बंगल्यावर प्राजक्ता माळीने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. सुरेश धस यांनी माफी मागावी असं प्राजक्ता माळीने निवेदन दिलं आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 10 माजी नगरसेवक बंडाच्या तयारीत असल्याची सूत्रांनी माहिती दिलीये. 10 माजी नगरसेवक शिवसेना,भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. त्यामुळे मनपा निवडणुकीपूर्वीच उद्धव ठाकरेंना धक्का बसण्याची शक्यता आहे.
देवेंद्र फडणवीसांची आज सह्याद्री अतिथिगृहावर बैठक होणार आहे. 7 विभागांच्या 100 दिवसांच्या आराखडा सादरीकरणाचा आढावा घेणार असून दुपारी 2 वाजता LNG प्रकल्पाबाबत आढावा बैठक घेणार आहेत.
अंजली दमनिया यांचे बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत. सत्यशोधक आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार दिल्ली दौऱ्यावर आहेत. नितीश कुमार आणि भाजपमध्ये तणाव असल्याची चर्चा आहे. आज नितीश कुमार एनडीएच्या नेत्यांनाही भेटणार आहेत.