अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता हातात घेताच धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या एका निर्णयाची सध्या सरकारी नोकरदार वर्गात मोठी चर्चा आहे.
मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाची मोठी कामगिरी
12 बांगलादेशींना घेतलं ताब्यात
जुहू येथून बांगलादेशींना अटक
आरोपींकडून पासपोर्ट आणि कागदपत्रेही जप्त
एकूण 5 महिला 4 पुरुष 3 बालकांचा समावेश
सांगलीच्या एमडी ड्रग्जचे गुजरात आणि मुंबई कनेक्शन. ड्रग्जचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी तपासाचा वेग वाढला. 30 कोटींचं एमडी ड्रग्ज आणि साहित्य जप्त.
शिवसेना मुस्लिम लीग बरोबर आणि काँग्रेसबरोबरही गेली होती. त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार ती शिवसेनेची भूमिका होती. राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंच्या भूमिकेच्या समर्थनाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली.
विधानसभेच्या निकालावर राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. लोकांनी आपल्याला मतदान केलं ते आपल्यापर्यंत आलं नाही कुठेतरी गायब झालं असल्याचं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे.
विधानसभेचे निकाल अनाकलनीय आहेत. निकालानंतर संघाचे लोक म्हणाले इतना सन्नाटा क्यो हे भाई अजित पवारांचे 42 आमदार कसे निवडून आले. निवडून आलेल्यांचाही विश्वास बसत नाही असा राज ठाकरेंनी हल्लाबोल केला आहे.
सत्याला सत्य म्हटलं तर त्याचं स्वागत केलं पाहिजे, इलेक्शन कमिशनचा कायदा बदलला जातोय, उद्धव ठाकरेंच्या भूमिकेचं राज ठाकरेंकडून समर्थन
मनोज जरांगेंकडून उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. उपोषण स्थगित करतोय, बंद नाही अशी माहिती जरांगे यांनी दिली आहे.
दिल्लीत सर्वपक्षीय बैठक सुरु झाली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा सुरू आहे.
रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे. धंगेकर उद्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार असल्याची लोकशाही मराठीला सूत्रांनी माहिती दिली आहे.
प्रसिद्ध उद्योजक अभिषेक वर्मा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे. शिवसेनेचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. राष्ट्रीय स्तरावर शिवसेना मजबूत होईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.