महाविकास आघाडी (मविआ) सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून अडकविण्याच्या कटकारस्थानाची विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) माध्यमातून चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी मुंबई पोलीस सह आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ‘एसआयटी’ स्थापन करण्यात आली आहे.
जळगाव मध्ये आढळला गुलियन बॅरी सिंड्रोम आजाराचा पहिला रुग्ण
जळगावात आढळला 'गुइलेन बरे सिंड्रोम'चा पहिला रुग्ण आढळला आहे . रुग्ण आढळताच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णावर उपचार सुरू
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी लोकसभेत आर्थिक पाहणी अहवाल सादर केला
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी लोकसभेत आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. या अहवालानुसार आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी GDP वाढीचा दर हा ६.३ ते ६.८ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या बजेटकडे उद्योजक, व्यावसायिकांपासून ते सर्वसामान्यापर्यंत सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्रीय अर्थमंत्री सकाळी 11 वाजता बजेट सादर करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय कॅबिनेटची बैठक होईल. संसद भवनात होणाऱ्या या बैठकीत बजेटला मंजुरी दिली जाईल.
आजपासून रिक्षा , टॅक्सीचा प्रवास 3 रुपयांनी महागला. रिक्षाचे भाडे किमान 26 रुपये, तर टॅक्सीचं किमान भाडं 31 रुपये असेल.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थमंत्रालयाच्या दिशेने रवाना
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अर्थ मंत्रालयात दाखल
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण राष्ट्रपती भवनाकडे रवाना
रत्नागिरी जिल्ह्यातील तीन माजी आमदार लवकरच शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. जिल्ह्यातील चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील माजी आमदार सुभाष बने आणि लांजा-राजापूर विधानसभाचे माजी आमदार गणपत कदम लवकरच शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
बजेट सादर करण्याआधी राष्ट्रपतींनी अर्थमंत्र्यांना भरवलं दहीसाखर
थोड्याच वेळात अर्थसंकल्प सादर होणार
अर्थसंकल्पाआधी शेअर बाजारात मोठी तेजी
अर्थसंकल्पाआधी शेअर बाजारात मोठी तेजी; सेन्सेक्स 950 अंकानी वधारला
अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच विरोधकांच्या घोषणा
अर्थसंकल्पाचे लोकसभेच वाचन सुरु
Union Budget 2025 : अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्या भाषणाला सुरुवात