महायुतीत शिंदेंची कोंडी झाली आहे. भाजपनं आश्वासन न पाळल्यानं आणि मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं शिंदे मनानं कोलमडले असल्याचा खासदार संजय राऊत यांनी दावा केला आहे.
राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखे, काही लोक ठरवून आरोप करतात, पंकजा मुंडे यांनी राजकारणातील टीका-टिप्पणीवर व्यक्त खंत केली आहे.
समरजीत घाटगेंनी कागलमधील शासकीय जमिनी बळकावल्या असल्याचा मंत्री हसन मुश्रीफ यांनी गंभीर आरोप केला आहे. संबंधित जमिनी ताबडतोब परत न केल्यास जन आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
जळगावमध्ये इंजिनीयर संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे. इंजिनीयर संघटनेचं 52वं राष्ट्रीय अधिवेशन होत आहे. अधिवेशनात गुलाबराव पाटील यांचा सहभाग असणार आहे. गुजरात आणि मध्य प्रदेशातील इंजिनीयर देखील सहभागी होणार आहेत. अधिवेशनात वेतन वाढीसह विविध मुद्द्यांवर चर्चा
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पार्किंगमध्ये अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला आहे. अपघातात 5 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सहार पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे.
आमदारांचा शक्तिपीठ महामार्गाला विरोध नाही. मूठभर लोकांचा विरोध असल्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला आहे.
संभाजीनगरात लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळाला आहे. स्ट्रेचरसाठी चाव्या आणि मोबाईल घेण्याची घाटी रुग्णालयातील पद्धत बंद करण्यात आली आहे.
जालन्यात भाजपचे आमदार बबनराव लोणीकरांच्या गावात गोळीबार झाला आहे. परतुर तालुक्यातील लोणी गावातील धक्कादायक घटना घडली आहे. बंडू खरात आणि त्याच्या दोन साथीदारांकडून हवेत गोळीबार करण्यात आला आहे. हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आरोपींना आष्टी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
शिवसेना खासदार नरेश म्हस्के भाजपासाठी दिल्लीच्या मैदानात उतरले आहेत. नरेश म्हस्केंकडून दिल्ली विधानसभेसाठी भाजपचा प्रचार सुरू आहे.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्याला गालबोट लागलं आहे. मॅट प्रकारात शिवराज राक्षेनं पंचांना ओढत लाथ मारली. पाठच टेकली नसून अन्याय झाल्याचा शिवराज यांनी दावा केला आहे.
नवी मुंबईत गणेश नाईक यांच्याकडून उद्या जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम जनता दरबारातून केलं जाणार आहे. प्रशासन आणि नागरिक एकाच व्यासपीठावर येणार आहेत.