लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Updates live: आम्ही राजीनामा मागून काय फायदा- सुरेश धस

Prachi Nate

2026 च्या पावसाळ्यापूर्वी मुंबईतील रस्त्यांचं काँक्रीटीकरण पूर्ण होणार...

2026 सालच्या पावसाळ्यापूर्वी मुंबईतील रस्त्यांचं काँक्रीटीकरण पूर्ण होणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांची दिलीये...येणा-या पावसाळ्या पर्यंत रस्त्याचं काम करण्यासाठी वेळ मिळाला असून त्यानंतर मिळणा-या आठ महिन्यांत मुंबईतील रस्त्यांचं काँक्रीटीकरणाचं काम पूर्ण होणार असल्याचा दावा त्यांनी केलाय...

अशोक धोडी हत्या प्रकरणात मोठी अपडेट

शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरण . फरार आरोपींनी राजस्थान कडे पळून जाण्यात वापरलेली स्कार्पिओ गाडी पालघर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती...मध्यरात्रीच्या सुमारास राजस्थानच्या पाली येथून पालघर पोलिसांनी गाडी ताब्यात घेतल्याची माहिती . अशोक धोडी यांच्या हत्येनंतर फरार आरोपींनी राजस्थान कडे जाण्यासाठी स्कार्पिओ गाडीचा वापर केल्याची माहिती

कॅनडामधील पंजाबी गायक प्रेम ढिल्लन यांच्या घराबाहेर गोळीबार

कॅनडामधील गायक प्रेम ढिल्लन यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारानंतर पंजाबी मनोरंजन उद्योगात पुन्हा धोक्यात आला आहे. पंजाबी मनोरंजन उद्योगावर पुन्हा एकदा भीती आणि दहशतीचे ढग दाटून आले आहेत. सोमवारी पंजाबी गायक प्रेम ढिल्लन यांच्या कॅनडा येथील घराबाहेर गोळीबार झाल्याचा दावा अलिकडच्या वृत्तांतात करण्यात आला आहे.

जीबी सिंड्रोमचा फैलाव रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज.

नांदेड जिल्ह्यात जीबी सिंड्रोमचा एकही रुग्ण नाहीय.परंतु नांदेडहुन पुणे आणि मुंबई येथे येजा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.त्यामुळे खबरदारी म्हणून जीबी सिंड्रोमचा फैलाव रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील आरोग्य येंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर यांनी दिली.

धनंजय मुंडेंनंतर आता अंजली दमानिया यांची पुन्हा पत्रकार परिषद

मुंडेंनी मला बदनामिया म्हटलं त्यांनी मला पुराविया म्हणायला हवं होत- अंजली दमानिया 

बदनाम लोकांचे पुरावे देत असताना काहीही नाव द्या- अंजली दमानिया 

धनंजय मुंडेना मी त्यांची जागा दाखवली- अंजली दमानिया 

महापालिकेच्या फंडातून तयार झालेले 55 लाखांचे रस्ते अवघ्या पाच महिन्यात झाले गायब !

जळगाव शहरात पाच महिन्यांपूर्वी जोशीपेठ व बागवान मोहल्ला भागात महापालिकेच्या फंडातून केलेल्या निकृष्ट दर्जाच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे. तब्बल ५५ लाखांचा निधी खर्च झालेला हा रस्ता अवघ्या पाचच महिन्यात उद्ध्वस्त झाला आहे.

धनंजय मुंडेंनी त्यांच्या मामींची जागा ही लाटली- अंजली दमानिया 

साईबाबा संस्थानांच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल

शिर्डीतील दुहेरी हत्याकांड झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल करण्यात आली आहे. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकरांची माहिती दिली आहे. सकाळी 6 ते दुपारी 2 दुपारी 2 ते रात्री 10 असा बदल करण्यात आले आहेत.

रथसप्तमीच्या निमित्ताने अंबाबाई देवीचे विशेष अलंकारिक पूजा

साडेतीन शक्तीपीठापैकी एक महत्त्वाचं पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई देवीची आज रथसप्तमीच्या निमित्ताने विशेष अलंकारिक पूजा कऱण्अंयात आला. अंबाबाई देवीचा गाभारा हा विविध रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आला आहे.

मी राजीनामा मागत नाही मी फक्त वर्णन करतो- सुरेश धस 

धनंजय मुंडेच उद्या आले तर मी त्यांच स्वागत करेन, मी त्याचा राजीनामा मागत नाही मी फक्त वर्णन करतो. अजित पवार त्यांच्या मागे ठाम उभे आहेत. आम्ही राजीनामा मागून काय फायदा असं सुरेश धस म्हणाले आहे.

जामीन मिळाल्यावर सूरज चव्हाण 'मातोश्री'वर दाखल

जामीन मिळाल्यानंतर सूरज चव्हाण यांनी 'मातोश्री'वर जाऊन आदित्य ठाकरेंची गळाभेट घेतली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा