आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील पाचव्या सामन्यात ए ग्रुपमधील 2 कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या शेजारी देशांमध्ये महामुकाबला होणार आहे. क्रिकेट विश्वाला या सामन्याची गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा होती. आता या सामन्याला अवघे काही तास शिल्लक आहेत. दोन्ही संघांचा या मोहिमेतील दुसरा सामना आहे.
नाशिकमधील काठे गल्ली परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ कारवाई प्रकरण...सकल हिंदू समाजाकडून सुरू करण्यात आलेलं आंदोलन 7 दिवसांसाठी स्थगित करण्यात आलाय. हिंदू संघटनांनी या दर्ग्यासमोर बजरंगबलीचे मंदिर उभारण्याचा दिला होता इशारा...सात दिवसात अनधिकृत दर्ग्यावर कारवाई केली नाही तर पुन्हा हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरणार आहेत.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज विधिमंडळ कामकाज समितीची बैठक...सकाळी ११ वाजता विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीचे आयोजन...अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाची रूपरेषा आखली जाणार... ३ मार्चपासून सुरू होणार अर्थसंकल्पीय अधिवेशन...तर १० मार्च रोजी अजित पवार मांडणार देवेंद्र फडणवीस ३.० सरकारचा अर्थसंकल्प...
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभामध्ये आतापर्यंत ६० कोटी भाविकांनी स्नान केल्याचा दावा उत्तर प्रदेश सरकारने शनिवारी केला. कुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर स्नान केल्यास मोक्ष मिळतो अशी अनेक भाविकांची समजूत आहे. मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी, १३ जानेवारीला सुरू झालेला हा महाकुंभ बुधवारी, २६ फेब्रुवारीला समाप्त होणार आहे.
रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पंतप्रधानांचे प्रधान सचिव (दोन) म्हणून नियुक्ती करण्यात आली. भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी पी.के.मिश्रा हे सध्या पंतप्रधानांचे मुख्य सचिव म्हणून काम पाहात आहेत. दास हे तमिळनाडू केडरचे भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृृत्त अधिकारी असून, पंतप्रधानांच्या कार्यकाळापर्यंत किंवा नव्याने आदेश जारी होईपर्यंत ते या पदावर असतील.
शिमग्यानिमित्त कोकणकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. होळी सणानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने सीएसएमटी ते नागपूर, मडगाव, नांदेड आणि पुणे ते नागपूर दरम्यान 28 स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या स्पेशल ट्रेनच्या तिकिटासाठी प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
जीबीएसची लागण मोठ्या प्रमाणात होत असल्याचं सध्या समोर येत आहे. या आजाराची लागण होऊन मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतचं चाललेली आहे. अशातच राज्यात जीबीएसचे शनिवारी दोन नवीन संशयित रूग्ण मिळाले असून राज्यात आतापर्यंत आढळलेल्या 215 संशयितांपैकी 186 मध्ये जीबीएसची पुष्टी झाली आहे.