लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Updates live: महाविकास आघाडीच्या बैठकीला काँग्रेसच्या नेत्यांमुळे विलंब

shweta walge

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे आज रायगड दौऱ्यावर

अमेरिकेच्या फिलाडेल्फियात विमानाचा भीषण अपघात

अमेरिकेतली फिलाडेल्फिया येथील उपनगरात विमान कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी अगदी वर्दळीच्या भागात झालेल्या या दुर्घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक घरांना आग लागली. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास रुझवेल्ट मॉलजवळ मेडिकल ट्रान्सपोर्ट जेट कोसळले.हे विमान एका तरुण रुग्णाला घेऊन जात होते, तसेच त्याच्याबरोबर विमानात ४ क्रू मेंबर देखील होते अशी माहिती जेट रेस्क्यू एअर अँब्युलन्सने दिली आहे. ही घटना घडल्यानंतर घरांना लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर तात्काळ आपत्कालीन बचाव पथकांनी मदतकार्य केले.

राहुल गांधींना नाशिक कोर्टात हजर राहण्याचे आदेश

राहुल गांधी यांना नाशिक न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी जाहीर सभेत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल याचिकेत जामीन मिळवण्यासाठी राहुल गांधींना उपस्थित रहाव लागणारे.

मुंबई उच्च न्यायालयासह कनिष्ठ न्यायालयांतील अधिकाऱ्यांचं वेतन थकीत

मुंबई उच्च न्यायालयासह कनिष्ठ न्यायालयांतील अधिकाऱ्यांचं वेतन थकीत. कंत्राटी अधिकाऱ्यांना मागील 5-6 महिन्यांना वेतन मिळालेलं नाही. थकीत वेतनावर मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केला तीव्र संताप.

संसदीय अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा!

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा १० मार्चपासून सुरू होत असून या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक घेतली. खासदारांनी विषय ठरवून त्यांचा अभ्यास करून संसदेत त्यावर आवाज उठवावा, असे आदेश ठाकरे यांनी दिले.

शिंदे देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री होते- संजय राऊत

भाजपच्या एका मोठ्या महिली नेत्याच्या मुलीची छेडछाड

विद्यार्थ्यांना ‘सीईटी’च्या अर्जात दुरुस्तीची संधी

शिक्षणशास्त्रांतर्गत येणाऱ्या बीएड (सामान्य व विशेष), बीएड इलेक्टेड, बीएड-एमएड, एमएड या अभ्यासक्रमांना, तर शारीरिक शिक्षणशास्त्रांतर्गत येणाऱ्या बी.पी.एड, एम.पी.एड या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जामध्ये बदल करण्याची संधी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांना ३ ते ५ मार्चदरम्यान आपल्या अर्जाच्या तपशिलात दुरुस्ती करता येणार आहे. त्याचबरोबर अर्धवट असलेले अर्ज किंवा शुल्क भरणे शक्य न झालेल्या विद्यार्थ्यांनाही या कालावधीत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण क्षेत्रात पुरेसा पाणीसाठा असल्याने शहराला यंदा मुबलक पाणी मिळणार आहे.

चंद्रपुरात नगरपंचायतची अतिक्रमण हटाव मोहीम

चंद्रपुरात सिमेंट प्रकल्पामुळे शेती धोक्यात

चंद्रपूर जिल्ह्यातील माणिकगड सिमेंट प्रकल्पामुळे परिसरातील सुपीक जमीन नापीक झाल्याचे भयानक वास्तव समोर आलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथे माणिकगड सिमेंट प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाच्या आजूबाजूला थुटरा आणि गोपालपूर या गावांची शेती आहे. कापूस, सोयाबीन, तूर ही महत्वाची पिके इथे घेतली जातात. मात्र गेल्या काही वर्षापासून ही शेती डोकेदुखी ठरली आहे. याचे कारण म्हणजे सिमेंट प्रकल्पातून बाहेर पडणारी धूळ. त्यामुळे शेतकरी रडकुंडीला आले आहेत. यापेक्षा कंपनीने आमची जमीन घेऊन घ्यावी, अशी विनंती ते करीत आहेत.

नेते संदीप देशपांडे यांनी घेतली मत्स्य विकास मंत्री नितेश राणेंची भेट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील घराबाहेर आंदोलन

महाविकास आघाडीच्या बैठकीला काँग्रेसच्या नेत्यांमुळे विलंब

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Hindi Language : पवन कल्याण यांचे हिंदीवरील वक्तव्य वादात; प्रकाश राज यांनी केली तीव्र टीका

Ravindra Chavan On Thackeray Bandhu : 'म' मतांचाच हे राज्याला कळलंय'; ठाकरेंच्या युतीवर चव्हाणांचे विधान

Chhatrapati Sambhajinagar : भयंकर ! मुलाचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह पाहून आईचा आक्रोश

Ajit Pawar : 'चीनहून होणारी निकृष्ट बेदाण्यांची आयात थांबवा'; उपमुख्यमंत्री अजित पवारांची केंद्राकडे पत्राद्वारे मागणी