मनसेची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 45 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. माहिममधून अमित ठाकरेंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे तर वरळीमधून संदीप देशपांडे यांची वर्णी लावण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा महत्वकांक्षी नागपूर ते गोवा हा शक्तीपीठ महामार्ग अखेर सरकारने रद्द केला आहे. त्याची अधिसूचना 15 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत आज माहिती देत शेतकऱ्यांना त्याची प्रत सुपूर्द केली. या महामार्गाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला होता. लोकसभेच्या 12 जागांवर याचा फटका बसला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हा महामार्ग रद्द करण्याची घोषणा केली होती. तर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी हा महामार्ग रद्द केला नाही तर आमदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता.
विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. यातच आज भाजपला मोठा धक्का बसला आहे. आज मुंबईतील कुर्ला मतदारसंघातील भाजपचे महामंत्री स्वप्नील येरूनकर यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.
अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी पक्ष प्रवेशावरून साधला निशाणा साधला आहे. ज्याप्रकारे पक्ष प्रवेश सुरु आहे, त्यावरून "शरदचंद्र पवार" गटाची ओळख "भाजप गट" म्हणून होईल. अशी टीका त्यांनी केली आहे.
एकीकडे भाजपला विरोध, तर दुसरीकडे त्यांच्याच लोकांचा पक्षप्रवेश करायचा.
उपदेश देणाऱ्यांनी पुरोगामी विचारधारा सोडली का? याला विचारांची गद्दारी म्हणायचं का? संदीप नाईक प्रवेशावरून सुरज चव्हाण यांनी शरदचंद्र पवार गटाला सुनावले आहे.
भाजप नेत्यांचा अर्ज भरण्याचा मुहूर्त ठरला. पहिल्या यादीतील नेते 24 तारखेपासून भरणार उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती आहे. शेवटच्या आठवड्यात भरणार दिग्गज नेते उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
वक्फ विधेयकाबाबत आज (मंगळवार) झालेलया संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजप खासदार अभिजीत गंगोपाध्याय आणि तृणमूल काँग्रेसचे नेते कल्याण बॅनर्जी आपसात भिडले, यामध्ये कल्याण बॅनर्जी जखमी झाल्याची माहिती आहे. यामध्ये मर्यादेबाहेरचं कृत्य केल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांना निलंबित करण्यात आलं आहे.
छगन भुजबळ 24 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज भरण्याआधी येवल्यात भव्य रॅली काढून भुजबळ शक्तिप्रदर्शन करतील. या रॅलीत 20 हजारांपेक्षा जास्त नागरिक सहभागी होणार आहेत. महायुतीचे उमेदवार म्हणून छगन भुजबळ अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक लढतील.
नागपूरमध्ये एक्सप्रेसचा अपघात झाला आहे. शालिमार एक्सप्रेसचे 2 डबे रुळावरून घसरले आहेत. एक्सप्रेसचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांच्यात जागावाटपाबाबत अडीच तास चर्चा झाली. या चर्चेनंतर बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आमच्यात कोणताही वाद नाही, मविआच्या पुढच्या बैठकीत चर्चा करु अस म्हणाले.
नवी मुंबईत भाजपला संदीप नाईक यांचा रामराम पाहायला मिळतो आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठवला असून भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व प्राथमिक सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला आहे. तसेच ते शरद पवार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. शरद पवार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत ते आता शरद पवार राष्ट्रवादीमधून निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहेत. नुकतेचं त्यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत तुतारी हाती घेतली आहे.
छगन भुजबळ यांचा पुतण्या समीर भुजबळ लवकरच मविआत जाणार असल्याची शक्यता आहे. शरद पवार गटाचा उद्धव ठाकरेंकडे असा प्रस्ताव मांडण्यात आलेला सुत्रांकडून कळत आहे. छगन भुजबळ यांचा पुतण्या समीर भुजबळ यांना ठाकरे गटामधून उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच समीर भुजबळ यांना ठाकरे गटात घेऊन नांदगावमध्ये उमेदवारी द्या अशी मागणी करण्यात आली आहे. नाशिकमधील नांदगाव विधानसभा ठाकरे गटाला मिळणार यामुळे समीर भुजबळ यांना आपल्याकडे घेऊन मशालीवर उमेदवारी द्यावी असा शरद पवार गटाचा प्रस्ताव असल्याची माहिती समोर आली आहे.
नवी मुंबई भाजपमध्ये बंडखोरी होणार आहे. संदीप नाईक यांचा भाजपला रामराम पाहायला मिळतो आहे. भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व प्राथमिक सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला आहे आणि आता ते शरद पवार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे संदीप नाईक आता वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहेत. ते शरद पवार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत ते आता शरद पवार राष्ट्रवादीमधून निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती आहे.
निलेश राणे शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत. उद्या संध्याकाळी 4 वाजता निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करणार असून निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे.
धनंजय महाडिक फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. धनंजय महाडिक यांचे बंधू अमल महाडीक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, त्यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक यांना उमेदवारी मिळावी यासाठी धनंजय महाडिक फडणवीस यांच्या भेटीसाठी सागरवर दाखल झाल्याची माहिती मिळत आहे.
महाराष्ट्रात एक नोव्हेंबर पासून स्वस्त धान्य दुकाने राहणार बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे. वितरण दर वाढवून द्यावा अशी मागणी करण्यात येत असून ऐन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेला बंदमुळे गोरगरीब लोकांची दिवाळी अडचणीत जाणार आहे.
पुणे महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी अभिजित कटके यांच्या घरी इनकम टॅक्सची रेड पडली असल्याची माहिती मिळत असून वाघोलीतील घरावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे.
भाजपचे माजी खासदार संजय काकडे सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. पक्षात काम करण्यास संधी मिळत नसल्याची काकडेंनी नाराजी व्यक्त केली होती. काकडे यांची नाराजी दूर होणार का?
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी उद्या अर्ज भरणार आहेत. वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात येणार असून यावेळी सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत.
बोरीवली मतदारसंघात भाजपमध्ये पक्षांतर्गत रस्सीखेच सुरु असून विद्यमान आमदार सुनील राणे यांचे तिकीट कापण्याची शक्यता असल्याने इच्छुकांची गर्दी पाहायला मिळत आहे. गोपाळ शेट्टी, शिवानंद शेट्टी, स्नेहल शाह आणि शरद साटम यांची नावे चर्चेत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता पक्षश्रेष्ठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
दिंडोरी विधानसभेत महायुतीत बंडखोरीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेनेचे धनराज महाले निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. धनराज महाले 24 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती मिळत आहे.
जुन्नर विधानसभेतील राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे सत्यशील शेरकर पवारांची भेट घेणार आहेत. मविआत जुन्नरची जागा पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून सकारात्मक चर्चा झाल्यास शेरकर हाती तुतारी घेण्याची शक्यता आहे.
जुन्नरमधून अतुल बेनकेंची उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे. अतुल बेनके यांना राष्ट्रवादीकडून एबी फॉर्म मिळाला. बेनके यांची उमेदवारी फायनल झाली असून 24 ऑक्टोबरला अतुल बेनके आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळत आहे.
बडनेरा मतदार संघातून सलग तीन वेळा निवडून आलेले युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आमदार रवी राणा हे पुन्हा चौथ्यांदा युवा स्वाभिमान संघटनेकडून निवडणूक रिंगणात उतरणार आहे. 29 तारखेला युवा स्वाभिमान पक्षाच्यावतीने रवी राणा उमेदवारी अर्ज दाखल करणार.
कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात पावसाला सुरुवात झाली असून परतीच्या पावसानं कोल्हापुरात जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. वादळी वाऱ्यासह कोल्हापुरात तुफान पाऊस पडत आहे. कोल्हापूर जिल्ह्याला भारतीय हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
पुण्यात खासगी वाहनात कोट्यवधीची रोकड जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. खेड शिवापूरच्या परिसरात खासगी वाहनातून ही मोठी रक्कम जप्त करण्यात आली आहे. या वाहनामध्ये पाच कोटी रुपयांची रोकड पोलिसांना आढळून आली.
शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांची आज यादी जाहीर होणार आहे. रायगडसह सांगोल्यातील 8 जागा जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातील 4 आणि सांगोल्यासह साधारण 8 जागांवर शेकाप लढण्याची शक्यता आहे. जयंत पाटील दुपारी 3 वाजता उमेदवारांची घोषणा करणार असल्याची माहिती मिळत आहे.
हिंगोली जिल्ह्यात अनेक वेळा भूकंपाचे धक्के जाणवत आहेत, हिंगोलीच्या वसमत कळमनुरी तालुक्यातील अनेक गावा मध्ये आज सकाळी पाच वाजून 52 मिनिटांनी भूकंपाचे सोम्य जाणवले आहेत. भूकंपाचं मुख्य केंद्रबिंदू नांदेड असून 3.8 रिश्टर स्केल मीटर भूकंपाची नोंद भूकंप भूमापक केंद्राकडे झाली आहे. भूकंपाचे मुख्य केंद्रबिंदू नांदेड असल्याने नांदेड सीमा वरती भागातील कळमनुरी वसमत या भागातील अनेक गावात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत.
आमदार अमोल मिटकरी देवगिरीवर दाखल झाले आहेत. अमोल मिटकरींना अजित पवारांकडून बोलावणं आल्याची माहिती मिळत आहे.
विधानसभेचा रणसंग्राम आजपासून सुरु होणार असून उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात होणार आहे. विधानसभा निवडणुकीची खरी प्रक्रिया आजपासून सुरु होणार आहे. यातच अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर असून 26 आणि 27 ऑक्टोबरला शासकीय सुट्टी असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना अवघे 6 दिवस मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.
काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी लांबणीवर पडणार असल्याची चर्चा सुरु असून ही यादी 25 ऑक्टोबरला जाहीर होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या काँग्रेसच्या यादीच 50पेक्षा जास्त नावं असल्याची माहिती मिळते आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत 63 जागांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
छत्तीसगड सीमेवरील कोपर्शीच्या जंगलात पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाल्याची माहिती मिळत असून 5 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांना मोठं यश आलं आहे.
निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आजपासून उमेदवारी अर्ज भरता येणार असून 29 ऑक्टोबर उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.
आज मनसेची पहिली यादी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहिती मिळत असून यामध्ये अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचं तसेच संदीप देशपांडे, स्नेहल जाधव यांच्या नावाची चर्चा रंगली आहे.
निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची मुंबईत पुन्हा जागावाटपाबाबत बैठक होणार आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नसल्याचे पाहायला मिळत आहे.