लोकशाही लाईव्ह ब्लॉग

नांदेड मतदारसंघात 3 उमेदवारांना निवडणूक आयोगाची नोटीस

Siddhi Naringrekar

नांदेड मतदारसंघात 3 उमेदवारांना निवडणूक आयोगाची नोटीस

नांदेड उत्तर मतदारसंघातील उमेदवारांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगाची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय बल्क मॅसेज प्रसारित केल्याने ही नोटीस बनवण्यात आली आहे. त्यामध्ये नांदेड उत्तर मतदारसंघातील ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार संगीता पाटील डक, शिंदे गटाचे उमेदवार आमदार बालाजी कल्याणकर आणि अपक्ष उमेदवार मिलिंद देशमुख यांचा समावेश आहे.

बोरीवलीत गोपाळ शेट्टींचे कार्यकर्ते आक्रमक

बोरीवलीत गोपाळ शेट्टींचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अमित शाहांच्या सभेनंतर कार्यकर्त्यांचा राडा पाहायला मिळाला. उमेदवारीवरुन गोपाळ शेट्टींची नाराजी कायम? शेट्टींना उमेदवारी न मिळाल्यानं कार्यकर्ते नाराज.

आज वरळीतील जांबोरी मैदानात राज ठाकरे यांची सभा

आज वरळीतील जांबोरी मैदानात राज ठाकरे यांची सभा आहे. याच्याआधी 7 नोव्हेंबरला वरळी कोळीवाड्यात राज ठाकरे यांची सभा झाली होती.

दक्षिण मध्य महाराष्ट्रात उद्यापासून पावसाचा अंदाज

दक्षिण मध्य महाराष्ट्रात उद्यापासून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तमिळनाडूच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुर्तीजापूरमध्ये सभा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज मुर्तीजापूरमध्ये सभा आहे.

आदित्य ठाकरे यांच्या प्रचारार्थ तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी मैदानात

आदित्य ठाकरे यांच्या प्रचारार्थ तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी मैदानात उतरणार आहेत. रेवंथ रेड्डी आणि आदित्य ठाकरे वरळीकरांशी संवाद साधणार आहेत.

वर्ध्यात चंद्रशेखर बावनकुळे यांची जाहीर सभा

वर्ध्याच्या मोठी आंजी येथे चंद्रशेखर बावनकुळे यांची जाहीर सभा होणार आहे. भाजपा उमेदवार राजेश बकाने यांच्या प्रचारार्थ ही सभा पार पडणार आहे. देवळी विधानसभेतून राजेश बकाने यांना देण्यात आली उमेदवारी देण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या 3 ठिकाणी जाहीर सभा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या 3 ठिकाणी जाहीर सभा आहेत. धुळे, जळगाव आणि परभणीत या जाहीर सभा होणार आहेत.

नितीन गडकरी आज चंद्रपूर दौऱ्यावर

नितीन गडकरी आज चंद्रपूर दौऱ्यावर आहेत. गडकरींची जाहीर सभा होणार असून सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आले आहे.

बीड आणि परभणीत अजित पवारांची सभा

बीड आणि परभणीत अजित पवारांची आज सभा आहे. महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी अजितदादा मैदानात उतरले असून बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात ही सभा आयोजित करण्यात आली आहे.

शरद पवार आजपासून पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर

शरद पवार आजपासून पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. शरद पवारांची जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि भोसरीमध्ये सभा होणार आहेत.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज मुंबई दौऱ्यावर

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज मुंबई दौऱ्यावर आहेत. विविध व्यावसायिकांसोबत नड्डा चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे.

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान असून पहिल्या टप्प्यात 43 मतदारसंघात मतदान होणार आहे.

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या संयुक्त जाहीर सभा

परळी मतदारसंघातील बर्दापूर आणि उजनी पाटी या दोन ठिकाणी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या संयुक्त जाहीर सभा होणार आहेत.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची आज जाहीर सभा

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची आज जाहीर सभा आहे. काँग्रेसचे लातूर शहर उमेदवार अमित देशमुख आणि लातूर ग्रामीण मतदारसंघ उमेदवार धीरज देशमुख यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आले आहे.

उद्धव ठाकरेंच्या कोकणात आज तीन सभा

उद्धव ठाकरेंच्या कोकणात आज तीन सभा आहेत. कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडीत ठाकरेंच्या सभा होणार आहेत.

अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराकरिता अमित शाहांचा महाराष्ट्र दौरा आहे. आज धुळे, जळगाव आणि परभणीत जाहीर सभा होणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा