लोकशाही लाईव्ह ब्लॉग

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोकण दौऱ्यावर

Siddhi Naringrekar

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या आज महाराष्ट्रात सभांचा धडाका

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या आज महाराष्ट्रात सभांचा धडाका पाहायला मिळत आहे. राहुल गांधी आज चंद्रपूर आणि अमरावती दौऱ्यावर आहेत तर प्रियंका गांधी यांच्या गडचिरोली, कोल्हापूर, अहिल्यानगरमध्ये जाहीर सभा होणार आहे.

उत्तर प्रदेशच्या झाशीमध्ये रुग्णालयाला भीषण आग

उत्तर प्रदेशच्या झाशीमध्ये रुग्णालयाला भीषण आग लागली. नवजात शिशु अतिदक्षता विभागाला भीषण आग लागली असून यात 10 चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

पुण्यात दक्षिण भागात आज पाणीपुरवठा बंद

पुण्यात दक्षिण भागात आज पाणीपुरवठा बंद राहणार असून जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

परिवर्तन महाशक्तीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार

परिवर्तन महाशक्तीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार आहे. 'ग्वाही परिवर्तनाची' नावाने जाहीरनामा प्रकाशित होणार असून पत्रकार परिषदेतून हा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्या कल्याणमध्ये आज 2 प्रचारसभा

उद्धव ठाकरे यांच्या कल्याणमध्ये आज 2 प्रचारसभा आहेत. कल्याण पूर्वमध्ये धनंजय बोराडेंच्या प्रचारासाठी सभा घेणार असून दीपेश म्हात्रेंच्या प्रचारासाठी कल्याण ग्रामिणमध्ये सभा घेणार आहेत.

राजनाथ सिंह आज महाराष्ट्र दौऱ्यावर

राजनाथ सिंह आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. मुंबईत आज राजनाथ सिंह यांची प्रचारसभा होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोकण दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोकण दौऱ्यावर आहेत. सावंतवाडी, दापोली, राजापूरमध्ये मुख्यमंत्री शिंदेंची प्रचारसभा होणार आहे.

नागपूर विमानतळावर 1 कोटी 64 लाख रुपयांचे दागिने जप्त

नागपूर विमानतळावर 1 कोटी 64 लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. दोन जण गुन्हे शाखेच्या ताब्यात असून जप्त केलेले दागिने सराफा व्यापाऱ्यांचे असल्याची माहिती मिळत आहे.

रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तांत्रिक कामे करण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे.

गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त

गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. NCB आणि नौदलाने मोठी कारवाई केली असून इराणच्या 8 नागरिकांना अटक करण्यात आली आहे.

मनोज जरांगे पाटील आज येवला दौऱ्यावर

मनोज जरांगे पाटील आज येवला दौऱ्यावर आहेत. येवला तालुक्यातील गावांना ते भेट देणार असून येवल्यात मराठा समाजाची बैठक घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

रोहित शर्माला मुलगा झाला? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाबा झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. रोहितने मुलाच्या जन्मासाठी टीम इंडियातून ब्रेक घेतला होता. तो संघासह ऑस्ट्रेलियालाही पोहोचला नाही. मात्र, मुलाच्या जन्मानंतर तो 22 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पर्थ कसोटीत खेळू शकतो, असे मानले जात आहे.

व्होट जिहाद शब्द वापरुन धार्मिकीकरण करण्याचा प्रयत्न: शरद पवार

व्होट जिहाद शब्द वापरुन धार्मिकीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. व्होट जिहादच्या वक्तव्यावरुन शरद पवारांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. पुण्यात विशिष्ट समाजाचं भाजपला मतदान, व्होट जिहाद समजत नाही. मतदानाला व्होट जिहाद म्हणायचं का? असा सवाल शरद पवार यांनी विचारला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Shubman Gill : शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये ऐतिहासिक दुहेरी शतक; भारतीय क्रिकेटसाठी नवा अध्याय