महायुतीचे तिन्ही पक्षप्रमुख आज दिल्लीला जाणार आहेत. दिल्लीत राज्याच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती मिळत आहे.
पुण्यात आज मनसेची आत्मचिंतन बैठक होणार असून पराभूत उमेदवारांशी राज ठाकरे चर्चा करणार आहेत.
पुणे शहरातील कमाल आणि किमान तापमानात घट होत असल्याने थंडीचा जोर वाढल्याचे पाहायला मिळत आहे. यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच दहा अंश सेल्सियसपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली असून, थंडीमुळे रात्रीबरोबर दिवसाही हुडहुडी जाणवू लागली आहे.
जालना जिल्ह्यात मागील आठवड्यापासून थंडीचा जोर अधिकच आहे, आणि अशातच 2 दिवसांपासून तापमानाचा पारा अजूनच घसरल्याने जिल्ह्यात हुडहुडी वाढली.
नागपूरात कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली असून अपघातात दोन्ही वाहनाचे चालक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा होती. याच धर्तीवर आता मतपत्रिकेवर निवडणुका व्हाव्यात या मागणीसाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली यात्रा काढण्यात येणार असून मतपत्रिकेवर निवडणुका व्हाव्यात या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार आहे.
हेमंत सोरेन यांच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा आज आहे. दुपारी चार वाजता शपथविधी सोहळा पार पडणार असून इंडिया आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
उल्हासनगरचा पाणी पुरवठा उद्या बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात थंडीच्या लाटेची शक्यता असून पुढील दोन दिवसांत नाशिक, नगर, पुण्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.
राज ठाकरेंची आज पुण्यात पत्रकार परिषद होणार असून विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करण्याची शक्यता आहे.
काँग्रेस पक्षाच्या पराभूत उमेदवारांची आज बैठक होणार असून दुपारी 1 वाजता नाना पटोलेंच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला. बुधवारी रात्री 9च्या सुमारास हा फोन आल्याची माहिती मिळत आहे.
सागर बंगल्यावर फडणवीसांना भेटण्यासाठी रीघ. धनंजय मुंडे, जयकुमार रावल, नवनीत राणा, रवी राणा फडणवीसांच्या भेटीला दाखल