Lokshahi Marathi Live  
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Update live : पहिल्याच टी-२० सामन्यात भारताचा १०१ धावांनी दमदार विजय

Marathi Live Headlines Updates: आज सोमवार, दिनांक 09 डिसेंबर २०२५, आजपासून हिवाळी अधिवेशन, राज्यात थंडी गायब, आजपासून टी-२० सीरिज, जिल्हा परिषद, महापालिका निवडणुका अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Siddhi Naringrekar

आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस

महाविकास आघाडीचे नेते आज राहुल नार्वेकर आणि राम शिंदेंची घेणार भेट

भाजप आमदार विक्रांत पाटील यांचे सिडकोच्या घरांच्या किंमती कमी करण्यासाठी आंदोलन

काँग्रेस आमदारांवर गुन्हा दाखल

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात आलेल्या अनेक मंत्र्यांनी आणि आमदारांचा पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्काम

भाजप आमदार कृष्णा खोपडे यांना शिवीगाळ करत धमकीचे फोन

पुण्यातील इंडिगो एरलाईन्सचे ७ विमाने आज रद्द

मराठवाड्यासह विदर्भात थंडीचा कडाका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मोठी बैठक

विधान भवनाच्या पायऱ्यांवर गळ्यात कापसाच्या माळा घालून विरोधकांकडून आंदोलन

फलटणमधील डॉक्टर महिला प्रकरणाचा मुद्दा विधानसभेत 

गुटखा विक्रीवर एमसीओसी अंतर्गत कारवाई होणार;  त्यासाठी कायद्यात बदल करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत दिली माहिती

CSMT स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारणार मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

बुलढाण्यात शेतीच्या वादातून घरात घुसून दाम्पत्याला मारहाण

बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील खळेगाव येथील दत्तात्रय वायाळ व मनीषा वायाळ दांपत्याला गावातील पोलीस पाटील असलेले दिलीप वायाळ यांच्यासह इतर नऊ जणांनी घरात येऊन बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे

या बाबत तक्रार बीबी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे,

या तक्रारीवरून नऊ जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

अपघात रोखण्यासाठी वाहन चाचणी कडक, राज्यात नवे निर्देश जारी

राज्यातील वाढत्या रस्ते अपघात आणि मृत्यूंच्या प्रमाणावर नियंत्रण आणण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयाने कायम अनुज्ञप्ती (लायसन्स) देताना वाहनचालक चाचणी प्रक्रिया अधिक कठोर करण्याचे निर्देश जारी केले आहेत.

या मार्गदर्शक तत्त्वांची पायमल्ली करणाऱ्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांवर (RTO) कारवाई केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे,

राज्यातील तब्बल 80 टक्के अपघात हे वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे होत असल्याचे समोर आले आहे.

Municiple Election: महापालिका निवडणुकीच्या यादींबाबत पुन्हा मुदत वाढ

निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ देण्याचा निर्णय

यादी प्रसिद्धीसाठी ५ दिवसांची मुदतवाढ

१० डिसेंबर ऐवजी आता १५ डिसेंबरला मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करणार

मतदार केंद्रांची यादी १५ ऐवजी २० डिसेंबरला प्रसिद्ध करणार

मतदान केंद्र निहाय मतदार याद्या २२ ऐवजी २५ डिसेंबरला प्रसिद्ध होणार

Satara: साताऱ्यात 115 कोटींचे आयटी सेंटर मंजूर; सी ट्रिपल आयटी सेंटरचा प्रस्ताव टाटा कडून राज्य प्रशासनाला सादर

साताऱ्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सेंटर फॉर इव्हेन्शन इनोवेशन इनक्युबॅशन अँड ट्रेनिंग सेंटर (CIIIT) स्थापन करण्याचा प्रस्ताव टाटा टेक्नॉलॉजीने राज्य सरकारकडे सादर केला आहे

हा प्रकल्प 115 कोटी रुपयांचा असून लिंबखिंड नागेवाडी परिसरात हे नवे आयटी पार्क साकारत असून याबाबत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे..

मंत्री माणिकराव कोकाटे बदनामी प्रकरणी कोर्टाने दिली रोहित पवारांना बाजू मांडण्याची मुदत

* मंत्री माणिकराव कोकाटे बदनामी प्रकरणी रोहित पवारांना कोर्टाची १६ डिसेंबरपर्यंत बाजू मांडण्याची मुदत

* स्वतः हजर राहण्याच्या आदेशानंतरही रोहित पवारांनी वकिलांमार्फत मांडली भूमिका

* कोकाटे यांचा ‘रम्मी खेळत’ असल्याचा व्हिडिओ कोणी काढला? पवारांना व्हिडिओ कोणी दिला? या मुद्द्यावर अधिक तपासाची मागणी

* दोन्ही बाजूंच्या वकिलांनी आज नाशिक कोर्टात मांडली आपापली बाजू

Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अंमली पदार्थविरोधी पथकाची कफ सिरप विकणाऱ्यांवर कारवाई

छत्रपती संभाजीनगरातील कर्णपुरा मैदान, रेल्वे स्टेशन रोड परिसरात अमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने छापा टाकत दोन इसमांना अटक केले आहे.

सय्यद फेरोज सय्यद अकबर उर्फ अंधा फेरोज आणि अयान शेख चांद शेख अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

दोघांच्या ताब्यात कोडीन सिरपच्या तब्बल 31 बाटल्या, दोन मोबाईल हँडसेट आणि एक मोटारसायकल असा एकूण 1 लाख 4 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या दोन्ही आरोपींवर छावणी पोलीस ठाण्यात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Solapur: सोलापूर जिल्ह्यात ऊस दराचे आंदोलन पेटले

ऊसाला 3500 रुपये प्रति टन भाव मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचे उपोषण सुरू..

अजित पवारांचा कारखाना सोलापुरातून ऊस घेतो, आणि 3500 भाव देतो...

पण जिल्ह्यातील कारखान्यांचा पंचवीसशे रुपये भाव..

उसाच्या प्रति टन भावासाठी शेतकरी झाले चांगलेच आक्रमक

Nahik: नाशिकमध्ये वीज वितरण कंपनीविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन

मालेगाव–गुजरात महामार्ग शेतकऱ्यांनी रोखला..

वीज वितरण कंपनीच्या अनियमित आणि दुर्लक्षयुक्त कारभाराविरोधात शेतकरी संतप्त..

पोहाणे, रामपुरा, कजवाडे, आठवण परिसरातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन..

कांदा व डाळिंब उत्पादक शेतकरी वेळेवर वीज न मिळाल्याने मोठ्या संकटात.

वेळेप्रमाणे वीजपुरवठा न झाल्याने पिकांचे मोठे नुकसान

राज्यातील महिला आणि बालसुधारगृहचा विषय पुन्हा ऐरणीवर

- राज्यातील महिला आणि बालसुधारगृहाच्या सुरक्षेत त्रुटी असल्याची सरकारची धक्कादायक कबुली

- भाजप आमदार चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर सरकारचं उत्तर

- विधान परिषदेत लेखी उत्तरातून सरकारची कबुली

- सुधारगृहातील अनेक पदे रिक्त असल्याचंही उघड

- बाह्ययंत्रणेच्या भरवशावर महिला आणि बालसुधारगृहाची सुरक्षा नको - चित्रा वाघ

- महिनाभरात सर्व रिक्त पदे भरू - मंत्री अदिती तटकरे यांचे विधान परिषदेत उत्तर

Pune Indigo Flights: पुण्यातील इंडिगो एरलाईन्स चे ७ विमाने आज रद्द

पुण्यातून आज इंडिगो एरलाईन्स चे ४८ विमाने घेणार प्रस्थान

पुणे विमानतळावर कुठला ही गोंधळ नाही, परिस्थिती पूर्ववत होण्याच्या मार्गावर

८ डिसेंबर रोजी पुण्यात तब्बल ११ हजार ८१२ प्रवाशांचे आगमन तर ११ हजार ५६१ प्रवाशांनी ठेवलं प्रस्थान

पुण्यातून ८ डिसेंबर रोजी ७४ विमानांचे आगमन तर ७२ विमानांचे उड्डाण

इंडिगो वगळता कुठल्या ही इतर कंपन्यांचे विमान रद्द नाही

Sidhudurga: सिंधुदुर्गच्या खारेपाणमध्ये घराला आग, दुर्घटनेत लाखोंचं नुकसान

कणकवली तालुक्यातील खारेपाटण बंदरवाडी येथे राहणाऱ्या विनायक धोडपिसे यांच्या राहत्या दुमजली घराला सकाळी आग लागून सुमारे ३.५६ लाखांचे नुकसान झाले.

सुदैवाने घरात राहणाऱ्या व्यक्तींना कोणतीही दुखापत झाली नाही.

परंतु, घरातील फर्निचर व इतर साहित्यासह संपूर्ण छप्पर जळून खाक झाले. बागेतील झाडांवर औषध फवारणीच्या पंपाचा वापर करत आग आटोक्यात आणण्यात स्थानिकांनी यश मिळविले.

दरम्यान, याबाबत महसूल विभागाने पंचनामा केला असून आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

Konkan: कोकणात यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने रस्त्यांची दुरावस्था

कोकणात यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस पडला

पण दुरुस्ती रस्त्यांची अजून करण्यात आलेली नाही

अधिकारी ढगाकडे बोट दाखवत आहेत म्हणजे त्यांना अजून पाऊस हवा

अधिकारी कोकणातील रस्ते दुरुस्त करत नाहीत

कोकणातील रस्त्याचे निकष बदलले पाहिजेत

जे अधिकारी लक्ष देत नाहीत त्यांचा बंदोबस्त करायला हवा

कृष्णा खोपडे यांना धमकी दिल्याप्रकरणी भाजप आमदार आक्रमक

कृष्णा खोपडे यांना धमकी दिली प्रकरणी भाजप आमदार आक्रमक झाल्यानंतर सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब झाले आहे

तुकाराम मुंढे यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता

आमदार समीर कुणावर यांची चौथ्यांदा विधानसभा तालीका अध्यक्ष पदी निवड

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट चे आमदार समीर कुणावर यांची चौथ्यांदा विधानसभा तालीका अध्यक्ष पदी निवड

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली आमदार समीर कुणावर यांच्या नावाची घोषणा

याअगोदर सलग सात तास सभागृहाचे कामकाज चालविण्याचा विक्रमसुद्धा समीर कुणावर यांच्या नावावर आहे नोंद

त्यांच्या तालिका अध्यक्ष पदी निवडीने हिंगणघाट सिंधी रेल्वे मतदारसंघात निर्माण झाले आनंदाचे वातावरण

Navi Mumbai: नवी मुंबईतील सिडकोच्या घरांच्या किंमती कमी करण्याची मागणी

नवी मुंबईतील सिडकोच्या घरांच्या किंमती कमी करण्याची मागणी करत भाजपचे विक्रांत पाटील यांनी आज विधीमंडळ परिसरात लक्षवेधी आंदोलन केले.

सिडकोने बांधलेल्या घरांच्या किंमती मधून जमिनीची किंमत वगळली तर या घरांच्या किमती किमान २० ते २५ लाखांनी कमी होतील, असा दावा आमदार विक्रांत पाटील यांनी केला आहे.

महापालिका निवडणुकीच्या यादींबाबत पुन्हा मुदत वाढ

निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ देण्याचा निर्णय

यादी प्रसिद्धीसाठी ५ दिवसांची मुदतवाढ

१० डिसेंबर ऐवजी आता १५ डिसेंबरला मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करणार

मतदार केंद्रांची यादी १५ ऐवजी २० डिसेंबरला प्रसिद्ध करणार

मतदान केंद्र निहाय मतदार याद्या २२ ऐवजी २५ डिसेंबरला प्रसिद्ध होणार

Manoj Jarange: अधिवेशनात सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करण्याची मनोज जरांगेंची मागणी

अधिवेशनात सगे सोयरेची अंमलबजावणी करा अशी मागणी मराठा नेते मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्याकडे केलीय..

आईची जात ही मुलाला लागली पाहिजे हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला असून, तो चांगला आहेत, त्यानुसार महाराष्ट्रात देखील हा निर्णय झाला पाहिजे....

नात्यात रोटी बेटी व्यवहार होतो, या संदर्भात सेगे सोयरे लागू झाले पाहिजे.....

तसेच आईची जात ही मुलाला मिळाली पाहिजे आणि त्या मुलाला प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे अशी आमची देखील मागणी आहेत असे जरांगे यांनी म्हटलेये

Yavatmal: यवतमाळ येथे ठरणार कर्जमाफी अटी मागण्या भविष्यातील आंदोलनाची दिशा

शेतकरी कर्जमाफीच्या पार्श्वभुमिवर बुधवारी माजी मंत्री बच्चू कडू यवतमाळमध्ये येत आहे.

कर्जमाफी, सक्तीची कर्ज वसुली,कर्जमाफी अटी मागण्या भविष्यातील आंदोलनाची दिशा आणि त्यांच्या भूमिकेवरही ते भाष्य करण्यासाठी ते उद्या यवतमाळच्या जिल्हा दौऱ्यावर आहेत.

Kolhapur Accident: कोल्हापुरातल्या सायबर चौकात भीषण अपघात

सिग्नल ला थांबलेल्या 5 ते 6 चारचाकी आणि दुचाकींना मागून आलेल्या ट्रकने उडवले

यामध्ये 4 ते 5 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती

Solapur Accident: सोलापूर - बार्शी महामार्गावर नान्नज जवळ भीषण अपघात

अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू

एसटी बस आणि दुचाकी मध्ये समोरासमोर धडक

अतुल ऋषिकेश तिवारी, देवेंद्र सिंग शिपाई राम बघेल असे मृत झालेल्या युवकांची नावे

दुचाकीवरील युवक मोबाईलवरती बोलत जात असताना अपघात झाल्याची प्राथमिक माहिती

दोघेही केटरर्स काम करत असल्याचे सांगण्यात आले

गोवा दुर्घटनेनंतर मुंबई महानगरपालिका अलर्ट मोडवर

नवीन वर्षाच्या स्वागता समारंभा निमित्त मुंबईतील सर्व हॉटेल्स पब आणि रेस्टॉरंट मध्ये अग्निशमन दलाकडून केली जाणार तपासणी...

नवीन वर्षाच्या स्वागत समारंभाच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेची ही विशेष मोहीम...

22 डिसेंबर ते 28 डिसेंबर या दरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडून केली जाणार अग्नि सुरक्षेबद्दल तपासणी...

हुरडा पार्टीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी गायलं गाणं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली मनमुराद दाद

मंत्री मंगलप्रभात लोढांनी आयोजित केली होती हुरडा पार्टी

"एक दिन मिट जायेगा माती के मोल"

विधानसभा अध्यक्षांच्या गाण्यावर मंत्र्यांनी ही दिली उत्स्फूर्त दाद

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा