संतोष देशमुख हत्या प्रकरण; परभणीत आज भव्य मूक मोर्चा
केंद्रीय मुरलीधर यांची पुणे आयुक्तासोबत महत्वाची बैठक
केंद्रीय मुरलीधर यांची पुणे आयुक्तासोबत महत्वाची बैठक होणार असून बैठकीला मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह पुण्यातील भाजपचे आमदार उपस्थित राहणार आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून नागपुरात थंडी वाढली आहे
गेल्या दोन दिवसापासून नागपुरात थंडी वाढली आहे. नागपुरात 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून विदर्भात गोंदिया जिल्ह्यात सर्वात कमी 8.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराची घटना
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराची घटना. एसपी कार्यालयावर दगडफेक आणि गोळीबार. हल्ल्यात एसपी आणि पोलीस कर्मचारी जखमी.
'प्रदूषण काळात व्यायाम टाळा' मुंबई महापालिकेचा नागरिकांना आरोग्य सल्ला
मुंबईतील हवेचा स्तर ‘वाईट’ झाला असून या काळात नागरिकांनी आरोग्यविषयक कोणती काळजी घ्यावी, याचीही नियमावली मुंबई महापालिकेने जाहीर केली आहे.
कात्रज कोंढवा रस्त्यासाठी साडेनऊ कोटी मंजूर करण्यात आले असून स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
पुण्यात थंडीला पुन्हा सुरवात
पुण्यात थंडीला पुन्हा सुरवात झाली असून दोन आठवड्यांपासून गायब झालेली थंडी शुक्रवारी पुन्हा परतली आहे.
नांदेड जिल्ह्यात पुन्हा थंडीचा जोर वाढला
नांदेड जिल्ह्यात पुन्हा थंडीचा जोर वाढला.13 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद
अमरावती महानगरपालिकेत आमदार रवी राणा यांची सहा तास मॅरेथॉन बैठक
अमरावती महानगरपालिकेत आमदार रवी राणा यांची सहा तास मॅरेथॉन बैठक घेतली. भुयारी गटार योजना, घनकचरा, रस्ते, स्वच्छता व सौंदर्यीकरण या विषयावर रवी राणा यांनी आढावा घेतला.
धुळे- सोलापूर हायवेवर पोलिसांनी पकडली किंमत 94 लाख 15 हजारांचा गुटखा.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पुण्यातून अटक
भाजप नेते रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली वसईतील अनेक पदाधिकारी आज भाजपमध्ये प्रवेश करणार
मुख्यमंत्री फडणवीस यांनी चंद्रपूरचे पालकमंत्री पद स्वीकारावा - आमदार किशोर जोरगेवार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चंद्रपूर जिल्ह्याचे सुपुत्र असून त्यांनी गडचिरोली सोबतच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारावा अशी इच्छा आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली. जिल्ह्याचा विकास अति वेगाने करायच असेल तर मुख्यमंत्री नक्कीच चंद्रपूर जिल्ह्याला न्याय देतील आणि विकासात पुढे नेतील.
मेडीकल कॉलेजमधील जागा रिक्त ठेवू नका- सुप्रीम कोर्ट
वैद्यकीय महाविद्यालयातील जागा रिक्त ठेवू नका, सुप्रीम कोर्टाचे केंद्र सरकारला निर्देश
राजन साळवी दुपारी एक वाजता उद्धव ठाकरे यांची भेट घेणार
चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट
विजय वडेट्टीवारांची केंद्रासह राज्य सरकारवर टीका
भारतीय जनता पक्ष नितीश कुमार यांचा पक्ष बळकावण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आपला पक्ष हातातून जाईल याकरिता नितीश कुमार टोकाची भुमिका घेण्याच्या विचारात आहेत. आणि त्याच्या हालचालीस सुरूवात झाली असुन याचा केंद्र सरकार वर परिणाम होईल असा तो निर्णय असणार... असा गौप्य स्फोट माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय.
चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सह्याद्री अतिथीगृहावर आज बैठक
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीतून 29 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आल आहे. प्रवेश वर्मा केजरीवालांविरोधात निवडणूक लढवणार आहेत.