ऐन विधानसभा निवडणुकीत भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी शरद पवार गटात दाखल झालेले राजेंद्र मस्के यांची शरद पवार गट बीड जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पद होते. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाने राजेंद्र मस्के यांची नियुक्ती केलीय.
मुंबईतल्या वाढत्या प्रदूषणावर कोर्टानं ताशेरे ओढले आहेत. मुंबईची दिल्ली होऊ देऊ नका, प्रदूषण तज्ज्ञांची नेमणूक करा. न्या. देवेंद्र उपाध्याय आणि गिरीष कुलकर्णी यांनी सरकारला धारेवर धरलं.
नागपूरच्या काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार असून उद्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
भंडाऱ्यात सायबर क्राईम रोखण्यासाठी AI चा वापर करण्यात येणार असून सायबर फसवणूक झालेल्या व्यक्तीला AI उत्तरं देणार आहे. व्हॉटसअॅपवर मॅसेज केल्यावर AI उत्तरं देणार आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50 टक्के जागा महिलांना देण्यात येणार.आढावा बैठकीत शरद पवारांनी पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिलंय.