छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज मालवणमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येथील राजकोट किल्लावर आज सकाळी 11 वाजता छत्रपती शिवरायांच्या पुतळा उभारणीच्या कामाची पायाभरणी होणार आहे
नागपुरातही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्साह दिसून येतोय.पारंपारिक वेशभूषेत अनेक तरुण आणि तरुणी पालखी सोहळ्यात सहभागी झालेत.
शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला अजिंक्यतारा किल्ल्यावर भव्य मशाल महोत्सव साजरा करण्यात आला. साताऱ्यात शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला अजिंक्यतारा किल्ला शेकडो मशालींनी उजळून निघाला
राज्याला नवे परिवहन भवन मिळणार असून मार्च महिन्यात परिवहन भवनाचं भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
अमरावतीत जीबीएसचा पहिला रुग्ण आढळला असून पुण्यावरून गावी आलेल्या 65 वर्षीय नागरिकाला लागण झाल्याची माहिती मिळत आहे.