Lokshahi Marathi live  Latest Marathi News Update live :
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Update live : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे दीर्घ आजारामुळे निधन

Marathi Live Headlines Updates: आज सोमवार, दिनांक 0८ डिसेंबर २०२५, आजपासून हिवाळी अधिवेशन, राज्यात थंडी गायब, जिल्हा परिषद, महापालिका निवडणुका अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात

सातव्या दिवशीही इंडिगोची सेवा ढगात,जवळपास 650 उड्डाणं रद्द

सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गाजला विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा

अजित पवार आणि धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट

छत्रपती संभाजीनगरमध्ये SDPI संघटनेकडून रेल रोको

भास्कर जाधव आणि मंत्री प्रताप सरनाईक यांची नागपुरात भेट..

आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्ष सज्ज

नागपूरच्या शासकीय आयटीआयचं नामांतर, ITIला श्री संत जगनाडे महाराजांचं नाव देणार.

नागपुरात समग्र शिक्षा संघर्ष समितीचं अन्नत्याग आंदोलन

समग्र शिक्षा संघर्ष समितीच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण आणि अन्नत्याग आंदोलन

समग्र शिक्षा मधील कंत्राटी कर्मचाऱ्याला सरसकट शासनसेवेत समाविष्ट करण्याची संघटनेची मागणी

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात दिव्यांग विभागातील निम्म्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समाविष्ट केले मात्र उर्वरित कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत नाही घेतले...संघटनेचा आरोप

Solapur: सोलापुरातील उड्डाणपूल पाडण्यात येणार उड्डाणपूल कालबाह्य झाल्यामुळे पाडण्यात येणार

सोलापुरातील 103 वर्षांपूर्वीचा असलेला ऐतिहासिक उड्डाणपूल 14 डिसेंबर पासून पाडण्यात येणार आहे.

उड्डाणपूल हे कालबाह्य झाल्यामुळे पाडण्यात येणार आहे.

उड्डाणपूल पडण्यासाठी लागणारी यंत्रणा सज्ज झाली आहे.

त्यामुळे उड्डाण पुलावरून जाणारी वाहतूक वळवण्यात आली आहे.

त्याच ठिकाणी नव्याने 35 कोटी खर्च करून नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे.

Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये बिबट्यांच्या वाढत्या दहशतीमुळे पारनेर तालुक्यात नागरिकांचा रास्ता रोको

नरभक्षक बिबट्याला ठार करावे तसेच इतर बिबट्यांना जेलबंद करावे या मागणीसाठी पारनेर तालुक्यातील किन्ही, बहिरोबावाडी, करंदी ग्रामस्थांचा नगर - कल्याण महामार्गावरील तिखोल फाटा येथे रस्ता रोको आंदोलनाला सुरुवात..

दोन डिसेंबरला बिबट्याच्या हल्ल्यात भागूबाई विश्वनाथ खोडदे या७० वर्षीय महिलेचा झाला मृत्यू..

घटना घडून सहा दिवस उलटले तरी वनखात्याकडून बिबट्याला जेरबंद करण्यात अपयश..

Mira-Bhayander: मिरा-भाईंदरच्या काशिमिरा परिसरात मध्यरात्री तरुणांकडून धिंगाणा

काशिमिरा परिसरात मध्यरात्री धिंगाणा – पोलिसांची तत्काळ कारवाई, तरुणाला अटक

कायद्याचा धाक दाखविण्यासाठी पोलिसांनी त्याची मिरवणूक काढत सार्वजनिकरीत्या माफी मागायला लावले

काशिमीरा परिसरात मध्यरात्रीनंतर कायदा व सुव्यवस्थेला हरताळ फासणारे धक्कादायक चित्र समोर आले आहे. सारंग नावाच्या बारच्या बाहेर काही तरुण मंडळी रात्री उशिरापर्यंत धिंगाणा घालत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

अहिल्यानगरजवळ पुणे–छत्रपती संभाजीनगर ई-बसचा भीषण अपघात

पहाटे पुणे ते छत्रपती संभाजीनगर या मार्गावर धावणाऱ्या ई-बसचा अहिल्यानगरजवळ भीषण अपघात झाला.

बसचा ताबा सुटल्याने ती रस्त्याच्या कडेला जोरात आदळली.

या दुर्घटनेत खाजगी चालक गंभीर जखमी झाला असून त्याचे दोन्ही पाय निकामी झाल्याची माहिती समोर आली आहे.

अपघातानंतर स्थानिकांनी धाव घेत जखमी चालकाला तत्काळ रुग्णालयात हलवले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही..

Pune: पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा अपघात, अपघातात दोन जण जखमी

नवले ब्रिज जवळ एक स्कूल बसने कार कारला पाठीमागून धडक देऊन अपघात केलेला आहे

अपघातामध्ये कारमधील दोन जखमी यांना दवाखान्यात पाठवले आहे

वाहतूक सुरळीत करून घेण्यात आली आहे स्कूल बसमधील दोन-तीन विद्यार्थ्यांना मुक्कामार लागल्याचे कळवत आहेत

सदरील अपघात हा नवले ब्रिज जवळ हॉटेल आशीर्वाद जवळ हायवेवर झालेला आहे

Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकर यांची विरोधकांवर टीका

'विरोधी पक्षनेते पद मिळत नाही म्हणून मानसिकता बिघडली'

'जनतेने तुम्हाला स्विकारले नसेल तर राग व्यक्त करू नका'

गोपीचंद पडळकरांचा खोचक टोला

मारवाडी समाज आता अन्याय सहन करणार नाही, जैनमुनी निलेशचंद्र मुनींचा मनसेला इशारा

राजस्थानी प्रवासी मारवाडी समाजाला जर मनसेने मारहाण केली किवा धक्का लावला तर जश्यात तस उत्तर देऊ

जैनमुन्नी निलेशचंद्र मुन्नी यांचा मनसेला इशारा

मारवाडी समाज आता अन्याय सहन करणार नाही

भाषेचा वाद जर कोणी सोडवेल ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोडवतील बाकी कोणत्या नेत्यात ताकत नाही

Dharashiv: अडचणीच्या काळात धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा

धाराशिव जिल्ह्यातील एकूण ९ लाख ७६ हजार ८२५ खात्यांवर निधी जमा

भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी दिली माहिती

शासनाच्या नवीन निकषांनुसार ३ हेक्टर मर्यादेपर्यंतच्या नुकसान भरपाईसाठीही अनुदान उपलब्ध होणार

अनुदान थेट खात्यावर जमा करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य

शेतकऱ्यांनी केवायसी तात्काळ पूर्ण करण्याचे आवाहन

सिल्लोड तालुक्यातून जाणाऱ्या रेल्वे मार्गाला ग्रामस्थांचा विरोध

नव्याने होणारा जळगाव सोलापूर रेल्वे मार्ग सिल्लोड तालुक्यातून जाणार आहे.

सदरील मार्गास तालुक्यातील शेत जमीन व इतर जमीन नागरी वस्त्याची जमीन या मार्गासाठी संपादन करण्यात येणार असून या संपादनास स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला आहे

Sangli: सांगलीतील शासकीय रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांसाठी शिवसेनेचं आमरण उपोषण सुरू

सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शिवसेना शून्य गटाच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आलाय.

निवृत्त सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काने नोकरी मिळावी तसेच त्यांच्या इतर प्रलंबित मागण्या तातडीने सोडवाव्यात यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

Dadar: मुंबईच्या दादरमध्ये सामाजिक कार्यकर्ते चेतन कांबळेंवर जीवघेणा हल्ला

- दादरमध्ये सामाजिक कार्यकर्ता चेतन कांबळेवर जीवघेणा हल्ला

- काल रात्री राहत्या इमारतीत घुसून केली बेदम मारहाण

- चेतन दादर परिसरात चकाचक दादर नावाने NGO चालवतो

- अंमली पदार्थांची विक्री व जुगार या विरोधात त्याने अनेकदा आवाज उठवला आहे

- हल्ल्याला 12 तास उलटून सुद्धा आरोपी अजून फरार

- या आधी सुद्धा हल्लेखोरांनी दिली होती चेतनला धमकी

मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे बीटिंग रिट्रीट आणि टॅटू सेरेमनीचे आयोजन

भारतीय नौदल आपल्या प्राचीन परंपरा आणि गौरवशाली इतिहासाला प्रोत्साहन देण्यासाठी सतत कार्यरत आहे.

हा कार्यक्रम नवीन पिढीला नौदलाची ओळख, शिस्त आणि अभिमानाशी जोडण्याचा एक मार्ग आहे.

आज, नौदलाची अनोखी शैली, तिचा अभिमान आणि टीमवर्कची भावना प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला जाईल...

तसेच आयएनएस शिकरचा हेलिकॉप्टर फ्लाय-पास्ट आणि ऑपरेशनल डेमो देखील करण्यात येणार आहे...

Australia: ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्सच्या जंगलात भीषण आग

झाडाला धडकल्याने अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू

न्यू साउथ वेल्समधील मध्य किनारपट्टी प्रदेशात सोळा घरे नष्ट झाली….

टास्मानियातील डॉल्फिन सँड्स येथील आगीत १९ घरे जळून खाक झाली

Pune: पुण्यातील भूमकर पुलाजवळ अपघात

दोन ते तीन वाहनांचा अपघात झाल्याचे प्राथमिक माहिती...

एक किरकोळ जखमी..

पुण्याहून सातारा कडे जाताना स्वामीनारायण मंदिराजवळ झाला अपघात..

आज सकाळी याच ठिकाणी झाला होता अपघात..

भूमकर ब्रिज नवले ब्रिज पासून काही अंतरावर

Mira-Bhayander Accident: मीरा भाईंदरमध्ये केबल घेऊन जाणाऱ्या क्रेनचा अपघात

मीरा भाईंदर घोडबंदरवरील वरसावे रोड परिसरात आज मोठी दुर्घटना टळली आहे.

अदानी कंपनीची केबल घेऊन जाणारा एक मोठी क्रेन अचानक पलटली

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही,

घटनास्थळी तात्काळ मदत सुरू करण्यात आली असून क्रेन हटवण्याचे काम सुरू आहे.

वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, परंतु पोलिसांनी आणि संबंधित पथकांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असून अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर 3 विशेष गाड्या धावणार

कोकण रेल्वे मार्गावर 3 विशेष गाड्या धावणार...

नाताळच्या सुट्ट्यांसाठी 3 विशेष रेल्वे...

प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनाचा निर्णय

Solapur: सोलापुरातील 103 वर्षांपूर्वीचा असलेला ऐतिहासिक उड्डाणपूल पाडण्यात येणार

सोलापुरातील 103 वर्षांपूर्वीचा असलेला ऐतिहासिक उड्डाणपूल 14 डिसेंबर पासून पाडण्यात येणार आहे.

उड्डाणपूल हे कालबाह्य झाल्यामुळे पाडण्यात येणार आहे.

उड्डाणपूल पडण्यासाठी लागणारी यंत्रणा सज्ज झाली आहे. त्यामुळे उड्डाण पुलावरून जाणारी वाहतूक वळवण्यात आली आहे.

त्याच ठिकाणी नव्याने 35 कोटी खर्च करून नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा