लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Updates live: मणिपूरमध्ये सीआरपीएफ आणि दहशतवाद्यांमध्ये मोठा संघर्ष

Team Lokshahi

मणिपूरमध्ये सीआरपीएफ आणि दहशतवाद्यांमध्ये मोठा संघर्ष

मणिपूरमध्ये सीआरपीएफ आणि दहशतवाद्यांमध्ये मोठा संघर्ष झाल्याची माहिती समोर आली आहे. तर कुकी समाजाचे ११ संशयित दहशतवादी गोळीबारात मारले गेले आहेत. जिरीबम पोलिस स्टेशनच्या हद्दीत सीआरपीएफ आणि दहशतवाद्यांमध्ये झाला आमने सामने गोळीबार झाला आहे.

धनंजय महाडिक यांना विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्यास बंदी घालण्याची मागणी 

भाजप खासदार धनंजय महाडिक यांना विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्यास बंदी घालावी अशी मागणी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा यांनी केलीये. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी मुख्य निवडणूक आयोगाकडे महिला काँग्रेसची मागणी.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर आहेत. दौऱ्याआधी पुण्यात नरेंद्र मोदींच्या ताफ्याची रंगीत तालीम झालीये. ज्या मार्गावरून नरेंद्र मोदी जाणार आहेत तिथे रंगीत तालीम घेण्यात आली आहे.

देवेंद्र भुयार यांच्या रोड शो ला अजित पवारांची धावती भेट

आमदार देवेंद्र भुयार यांच्या रोड शो ला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धावती भेट दिलीये. वरुड मधील रोड शोमध्ये अजित पवार फक्त दहा मिनिट सहभागी झाले होते. मात्र सभा न घेता अजित पवार पुढील दौऱ्यासाठी रवाना झाले.

हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी पुण्यात

हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी पुण्यात दाखल झाले आहेत. नायबसिंग सैनी भाजपसाठी प्रचार करणार आहेत. नायबसिंग सैनी यांनी महात्मा फुले वाड्याला भेट दिली आहे.

गुजरातच्या त्या चार लोकांपासून सावध राहा माजी मुख्यमंत्री भुपेश बघेल यांचा मोदी-शहा आणि अदानी-अंबानी यांच्याकडे इशारा

गुजरातवरून निघालेल्या चार लोकांनी देशाचं वाटोळं केलं आहे, अशी टिका छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी गडचिरोली जिल्ह्यातील प्रचारसभेत केली. दोघे जण देश विकत आहे आणि दोघे खरेदी करत आहे असे म्हणत त्यांनी कोणाचेही नाव न घेता मोदी-शहा आणि अदानी-अंबानी यांच्याकडे इशारा केला. त्यांच्यापासून सावध राहा, असे आवाहनही त्यांनी केले.

संविधान अजून 100 वर्षे तरी बदलणार नाही- प्रकाश आंबेडकरांची काँग्रेससह भाजपवर टीका

'राहुल गांधी, मोदी डुप्लिकेट संविधान वापरत आहेत', संविधान चा कलर लाल आहे निळा आहे हे सदन मध्ये बघावं,ते सर्वना मुर्ख बनविण्याच काम करत आहेत. आज आपण बघत आहे जेव्हा जेव्हा वेळ मिळते नरेंद मोदी डोक्याला लावतो. घटना बदल होणार नाही अस सांगत असतात,संविधान अजून 100 वर्ष बदल होणार नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Anjali Damania On Dhananjay Munde : 'ती' फाईल गायब केली' दमानियांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप

Share Market News : रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांना दिलासा; सेंसेक्स आणि निफ्टीत वाढ

Himachal Monsoon : हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर! आत्तापर्यंत 276 नागरिकांचा मृत्यू