पुण्यात कात्रज-कोंढवा रस्त्यावर बर्निंग बाईक चा थरार
दुपारी एक वाजता दोन दुचाकींना लागली आग
आगीत दुचाकी जळून खाक…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय बाबुराव चांदेरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, चांदेरे पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आहेत. चांदेरे यांनी काल विजय रौंदळ या नागरिकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. जमिनीच्या वादातून चांदेरे यांनी विजय यांना चापट मारत उचलून आदळले असल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या मारहाणीत विजय रौधळ यांच्या डोक्याला व गुडघ्याला जखम झाली.
GBS आजारासंदर्भात महत्वाचे निर्णय... 'गुलियन बॅरी सिंड्रोम' अर्थात जीबीएस या आजाराच्या रुग्णांची पुणे शहरातील वाढती संख्या लक्षात घेता काही महत्त्वाचे निर्णय महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्याशी चर्चा करून घेतले आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे,या मागण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे सामूहिक आमरण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून आमदार संदीप क्षीरसागर यांनी भेट घेतली असून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे.
=
टोरेस घोटाळ्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
तैसीफ रियाझ उर्फ जॉन कार्टर याला आर्थिक गुन्हे शाखेने केली अटक
लोणावळा वरून करण्यात आली रियाझला अटक
विधानसभेच्या निवडणुकीत ज्यांना मतदारांनी ‘डिलीट’ केलं त्यांनी आता कोस्टल रोडचं ‘क्रेडिट’ घेण्याचा केविलवाणा प्रयत्न चालवला आहे. काम करणाऱ्यांचं ‘मेरिट’ जनतेला माहित आहे. त्यामुळे घरात बसून फक्त ‘क्रेडिट’चं राजकारण करणाऱ्यांना मुंबईकर येत्या निवडणूकीत कायमचं ‘डिलीट’ करतील.