छत्रपती संभाजी नगरात हजारो शेतकऱ्यांनी पिक विमा च्या नावाखाली घोटाळा केल्याचे समोर आल आहे. जे पीक पिकवले नाही त्याच पिकाचा पिक विमा आणि एक एकराची फळबाग असेल तर दोन एकरांचा पीक विमा करत असे तब्बल दहा हजार शेतकऱ्यांनी घोटाळा केल्याचे समोर आला आहे. या घोटाळ्यासंदर्भात कृषी अधिकारी यांनी धक्कादायक माहिती दिली.
एमबीबीएस परिक्षेची प्रश्नपत्रिका ई-मेलद्वारे केंद्रांवर पोहोचणार आहेत. प्रश्नपत्रिका लीक होण्याचं प्रमाण वाढत असल्याने प्रशासनाने निर्णय घेतला आहे. उर्वरित परिक्षेसाठी आरोग्य विद्यापीठाने खबरदारीचा उपाय घेतला आहे. पूर्वी पाठवलेल्या प्रश्नपत्रिका रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ई-मेलद्वारे नवीन प्रश्नपत्रिका पाठवून परीक्षा घेण्याचा ठरवण्यात आलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार सागर निवासस्थानी दाखल झाले आहेत. अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले आहेत. दिल्ली दौऱ्याआधी अजित पवार आणि फडणवीसांमध्ये खलबतं झाल्याचं पाहायला मिळालं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आज दिल्लीत जाणार आहेत. मोदी-शाह आणि नड्डांची भेट घेणार आहेत. राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
समृद्धी महामार्गाला आज 2 वर्ष पूर्ण झाली आहेत. महामार्गावरून आतापर्यंत 1 कोटी 52 लाख वाहनांनी प्रवास केला आहे. 140 अपघातांमध्ये 233 प्रवाशांनी प्राण गमावले आहेत. रस्ते विकास महामंडाळाकडून 1 हजार 102 कोटींचा महसूल गोळा झाला आहे.
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचे कॅनडातही पडसाद उमटले आहेत. हिंदूंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ कॅनडात हिंदूंची निदर्शनं करण्यात आली आहेत. टोरंटोमधील बांगलादेश वाणिज्य दूतावासाबाहेर हिंदूंनी निदर्शनं केली आहेत.
बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर आता एसटी महामंडळ खडबडून जागं झालं आहे. आज एसटी महामंडळाची महत्वाची बैठक बोलावली आहे. आज दुपारी चार वाजता बैठक बोलावली आहे. एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि आमदार भरत गोगावले बैठक घेणार आहेत. नियमांची काटेकोर अंबलबजावणी करण्यासंदर्भात बैठक बोलावली आहे.
रायगड जिल्हयात शेकापला मोठा धक्का बसला आहे. अॅड. आस्वाद पाटील यांची पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. अॅड. आस्वाद पाटील यांचा जिल्हा चिटणीस पदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून अॅड. आस्वाद पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आस्वाद पाटील हे जयंत पाटील यांचे भाचे आहेत. यानिमित्ताने पाटील कुटुंबातील गृहकलह चव्हाट्यावर आला आहे.
दिल्लीतून हिरवा कंदील मिळाल्यानंतरच मंत्री मंडळ विस्तार होणार आहे. काही खात्यांवर महायुतीत समन्वय होत नसल्याने विस्तार लांबणीवर पडला आहे. पुढील 48 तासांसाठी शपथविधी लांबणीवर पडला आहे. भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीतील इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. तर यावरुन संजय राऊत यांनी टीका केली आहे.
विरोधी पक्षनेते पदासाठी अद्याप अर्ज नाही. विरोधकांकडून अर्ज आल्यानंतर विचार केला जाणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी विरोधकांकडे आवश्यक संख्या बळ नाही. विधानसभा अध्यक्षच विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय घेतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले होते.
शिवसेनेतील आमदारांना फिरती मंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे. आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी अडीच-अडीच वर्षांची फिरती मंत्रीपदं देण्याचा प्लॅन असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.
आसाराम बापूला पुन्हा पॅरोल मिळाला आहे. आसाराम बापूला राजस्थान उच्च न्यायालयाकडून 17 दिवसांचा पॅरोल मिळाला आहे. पुण्यातील खासगी रुग्णालयात आसाराम बापूवर उपचार केले जाणार आहेत. आसारामला उपचारासाठी १५ दिवस आणि प्रवासासाठी २ दिवसांची मुदत मिळणार आहे.
विधानसभेतील विजयानंतर भाजप मविआला धक्का देण्याच्या तयारीत आहे. मविआचे काही खासदार भाजपच्या गळाला लागण्याची शक्यता आहे.
आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 2 हजार लोकांसह हल्ला करण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रसाद लाड यांची पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
संविधानाचा अवमान केल्याप्रकरणी आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाले आहेत. आंबेडकरी अनुयायांकडून आज परभणी बंदची हाक देण्यात आली आहे. संविधानाचा अवमान केल्याप्रकरणी आंदोलन करण्यात आलं आहे.
मविआ ईव्हीएम आणि निकालाबाबात सुप्रिम कोर्टात एकत्र याचिका दाखल करणार आहे. शुक्रवारपर्यंत सुप्रिम कोर्टात एकत्र याचिका दाखल करणार असल्याची प्रशांत जगताप यांनी माहिती दिली आहे.
मुंबईत मंगळवारी तापमानाचा पारा वाढला आहे. पुढील 3-4 दिवस पारा चढताच राहणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवण्यात आला आहे.