Lokshahi News Live 
लोकशाही लाईव्ह ब्लॉग

Latest Marathi News Updates live: पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा भागात पुन्हा दहशतवादी हल्ला

Team Lokshahi

मतदानात महिलांची टक्केवारी वाढली

मतदानात महिलांची टक्केवारी वाढली. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची टक्केवारी वाढली असल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

एक्झिट पोलनंतर भाजप अॅक्शन मोडवर

एक्झिट पोलनंतर भाजप अॅक्शन मोडवर आली आहे. दिल्लीमध्ये भाजपाने बैठक बोलवली आहे. महाराष्ट्र आणि झारखंडमधील मतदानानंतर बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे.

महाविकास आघाडीकडून बंडखोर अपक्ष उमेदवारांशी संपर्क

महाविकास आघाडीकडून बंडखोर अपक्ष उमेदवारांशी संपर्क सुरु झाला आहे. विजयाची शक्यता असलेल्या उमेदवारांन थोरवे आणि जयंत पाटील यांच्याकडून फोन करण्यात येत आहेत.

राष्ट्रवादीच्या 35 ते 40 जागा निवडून येतील- अमोल मिटकरींचा दावा

राष्ट्रवादीच्या 35 ते 40 जागा निवडून येतील असा अमोल मिटकरींनी दावा केला आहे. महायुतीचे सरकार येणार हे निश्चित असल्याचा मिटकरींनी विश्वास व्यक्त केला आहे.

मतपेट्या वाहतुकीमुळे धाराशिव जिल्ह्यातील वाहतूक सेवा विस्कळीत

मतपेट्या वाहतुकीमुळे धाराशिव जिल्ह्यातील वाहतूक सेवा विस्कळीत झाल्या आहेत. लांब पल्ल्याच्या बसच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत.

सिल्लोड येथील मतदान केंद्रावर राडा

सिल्लोड येथील मतदान केंद्रावर राडा झाला आहे. बोगस मतदान होत असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेने आरोप केला आहे. राड्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

पुण्यात झळकले अजित पवारांचे बॅनर

पुण्यात अजित पवारांचे बॅनर झळकले आहेत. बॅनरवर अजित पवारांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. 'विकासाचा वादा, अजितदादा', बॅनरवर आशय आहे.

राहुल गांधींचा उद्योगपती अदानींवर पुन्हा हल्लाबोल

राहुल गांधींचा उद्योगपती अदानींवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. अदानींना आजच अटक करण्याची राहुल गांधी यांनी मागणी केली आहे. सेबी अध्यक्ष माधवी बूच यांची चौकशी करा. 'अदानींना अटक केल्यास मोदी पंतप्रधान राहणार नाहीत' असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं आहे.

राहुल गांधींच्या आरोपांना भाजपचं प्रत्युत्तर

राहुल गांधी यांच्या आरोपांना भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेसनेही अदानी कंपनीसोबत करार केला असल्याचे संबित पात्रा यांनी म्हटलं आहे. तेलंगणामध्ये काँग्रेसने अदानी कंपनीसोबत 12,400 कोटींचा करार केला आहे. राहुल गांधी आधी आरोप करतात नंतर माफी मागत असल्याचा दावा पात्रा यांनी केला आहे.

मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणी आरोपीला जामीन मंजूर

मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणी मुख्य आरोपी चेतन पाटीलला जामीन मंजूर करण्यात आला आहे. 25 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय घेतला आहे.

रेल्वे रुळांवरील मृत्यू टाळण्यासाठी विशेष मोहीम

रेल्वे रुळांवरील मृत्यू टाळण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. मुंबई उपनगरात 205 ब्लॅक स्पॉट्स शोधण्यात येणार आहेत. 180 पेक्षा जास्त ठिकाणी सुरक्षा भिंत बांधण्यात येणार आहेत.

नवी मुंबईत अनधिकृत दर्ग्यावर कारवाई

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या समोरील डोंगरावर असलेल्या दर्ग्यावर कारवाई करण्यात आली आहे. अनधिकृतपणे डोंगरावर दर्गा उभारण्यात आला होता. विमानतळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सिडको आणि पनवेल पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. दर्गा आणि तिथे राहण्यासाठी बांधण्यात आलेल्या रूम तोडल्या आहेत.

दिल्लीतील दाट धुक्याचा पुणे विमातळाला फटका

दिल्लीतील दाट धुक्याचा पुणे विमातळाला फटका बसला आहे. पुण्यातून दिल्लीला जाणारी 5 विमानं रद्द करण्यात आली आहेत. अनेक विमानं विलंबाने उड्डाण घेत असल्याची माहिती मिळाली आहे.

श्रीनगरमधील तापमान शून्याच्याखाली

श्रीनगर शहरात या मोसमात पहिल्यांदाच शून्याच्याखाली तापमानाची नोंद करण्यात आली आहे. श्रीनगर शहरात 0.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. धुक्याच्या दाट चादरीने परिसर आच्छादला आहे. यामुळे वाहनांना ये-जा करणे अवघड झाले होते. गुलमर्ग येथे उणे ०.६ अंश सेल्सिअस, तर पहलगाम येथे उणे ३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा भागात पुन्हा दहशतवादी हल्ला

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा भागात मोठा हदशतवादी हल्ला झाला आहे. या हल्यात 32 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच 11 पेक्षा जास्त नागरिक जखमी जखमी झाले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे वाहतूक बंद

Latest Marathi News Update live : पुण्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला जाईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार