Lokshahi Marathi Rudra Exit Poll 
Vidhansabha Election

Lokshahi Marathi Rudra Exit Poll: लोकशाही मराठी 'रूद्र'च्या एक्झिट पोलनुसार महायुती की मविआ सत्ता स्थापन करणार?

राज्यात सरासरी 58 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. लोकशाही आणि 'रुद्र'चा अचूक आणि वेगवान एक्झिट पोल आता आपण लोकशाही मराठीवर पाहणार आहोत.

Published by : Team Lokshahi

लोकशाही आणि 'रुद्र'चा अचूक आणि वेगवान एक्झिट पोल आता आपण लोकशाही मराठीवर पाहणार आहोत. यासाठी आपल्याकडे चर्चेसाठी मान्यवर उपस्थित असून आपण त्यांचाशी एक्झिट पोलवर सखोल चर्चा करुन ती आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. राज्यात सरासरी 58 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे.

Exit Poll of Lokshahi Marathi And Rudra

राज्यात सत्तापालट होणार की महायुती सत्तेत कायम राहणार?

महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागा आहेत. लोकशाही मराठी आणि रूद्र रिसर्च अनलॅटिक्सच्या एक्झिट पोल महाराष्ट्रात महायुतीला १२८-१४२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसेच महाविकास आघाडीला १२५-१४० जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अपक्ष आणि इतर पक्षाला मिळून १८-२३ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आता नेमका निकाल काय येणार आहे याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलं आहे.

Party Wise Polls For Vidhansabha Elections

महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांना किती जागा मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर महाराष्ट्रातील जनतेचा नेमका कल कोणाकडे आहे हे निकालानंतरच कळू शकेल. 

महायुतीतील घटक पक्षाला किती जागा मिळण्याचा अंदाज?

भाजप- ८०-८५

शिवसेना (एकनाथ शिंदे) - ३०-३५

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - १८-२२

महाविकास आघाडीतील घटक पक्षाला किती जागा मिळण्याचा अंदाज?

काँग्रेस - ४८-५५

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) - ३९-४३

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) - ३८-४२

मनसे - ००

वंचित विकास आघाडी - ००

इतर - १८-२३

लोकशाही-रुद्रच्या एक्झिट पोलनुसार भाजप ठरणार मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे.

  • महायुतीला 128 ते 142 जागा मिळण्याची शक्यता

  • मविआला 125 ते 140 जागा मिळण्याचा अंदाज

  • भाजपला ८० ते ८५ जागा मिळण्याची शक्यता

  • शिवसेनेला ३० ते ३५ जागा मिळण्याचा अंदाज

  • ठाकरेंच्या शिवसेनेला 39 ते 43 जागा मिळण्याची शक्यता

  • राष्ट्रवादीला १८ ते २२ जागा मिळण्याचा अंदाज

  • राष्ट्रवादी SPला 38 ते 42 जागा मिळण्याचा अंदाज

  • काँग्रेसला 48 ते 55 जागा मिळण्याची शक्यता

Partywise Vote Sharing Percentage

महाराष्ट्रामध्ये वोट शेअरिंगची टक्केवारी किती असणार आहे?

भाजप - २३ %

शिवसेना - ११ %

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - ०७ %

काँग्रेस - १४ %

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) - १२ %

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) - १२ %

मनसे - ०२ %

वंचित - ०३ %

इतर - १६ %

लोकशाही मराठी आणि 'रुद्र'चा अचूक आणि वेगवान एक्झिट पोल पाहण्यासाठी क्लिक करा-

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा